Monday , September 21 2026
Breaking News

राज्य स्पर्धेत यश मिळविलेल्या शिक्षकांचा सत्कार

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील तालुका नोकर संघटनेच्या वतीने येथील पाटील गार्डन सभागृहातील शिक्षकाच्या गौरव सोहळा सत्कार सोहळ्यात मराठी शाळेचे शिक्षक रमेश कवळेकर यांनी शरीरसौष्ठव स्पर्धेत, कबनाळी शाळेचे शिक्षक बापू दळवी यांनी वेटलिफ्टिंग स्पर्धेत, तर खानापूर चिरमुरकर गल्लीतील मराठी शाळेचे शिक्षक व तालुका नोकर संघटनेचे खजांची जे. पी. पाटील यांनी कुस्ती स्पर्धेत या तिघांनी राज्यस्तरीय स्पर्धेत भरघोस यश संपादन केल्याबद्दल बेळगांव जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष जयकुमार हेब्बळी यांच्याहस्ते शाल, श्रीफळ, मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी खानापूर तालुका नोकर संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी, तसेच आजी माजी प्रतिनिधी व शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तीन्ही शिक्षकांनी राज्य स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल खानापूर तालुक्यातून अभिनंदन होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *