Wednesday , December 17 2025
Breaking News

Belgaum Varta

हर घर तिरंगा अभियानांतर्गत नवहिंद क्रीडा केंद्रांच्या वतीने ध्वजारोहण

  बेळगाव : येळ्ळूर येथील सामाजिक सेवाभावी संस्था नवहिंद क्रीडा केंद्रांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घरोघरी तिरंगा या शासनाच्या अभियानांतर्गत नवहिंद भवन येळ्ळूर येथे तिरंगा ध्वज नवहिंद मल्टीपर्पज सोसायटीचे चेअरमन श्री. डी. एन. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रारंभी बाळू दणकारे यांनी परेड मार्च घेतला. यावेळी नवहिंद …

Read More »

आगळी वेगळी जनसेवा करणारे काद्रोळकर

  खानापूर (विनायक कुंभार) : खानापूर शहरातील पोलीस ठाण्यात नेहमीच अपघात, आत्महत्या, खून आशा घटना घडल्या की कोणत्याही वेळी आपली ट्रॅक्स घेऊन सेवेला हजर राहणारे समाजसेवक म्हणून सदानंद तुकाराम काद्रोळकर हे वयाच्या 77 वर्षे आपली सेवा प्रामाणिकपणे करतात. तालुक्यात कुठेही अपघात घडला, कुठेही खून झाला, कुठेही आत्महत्या केलेल्या मृतदेह राहूदे …

Read More »

खानापूर तालुक्यातील दक्षिण भागात गेल्या 8 दिवसापासून वीजपुरवठा खंडित

  खंडित वीजपुरवठ्यामुळे  लोकांचे आरोग्य धोक्यात खानापूर (विनायक कुंभार) : खानापूर तालुक्यातील नागरागाळी भागातील अनेक गावांत गेल्या 5 ऑगस्टपासून वादळी पावसामुळे विजेचा पुरवठा पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे येथील परिसरात लोकांना अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे. तालुक्यातील नागरगाळी, बामनकोप, कृष्णानगर, कुंभार्डा, तारवाड, कोडगई, सुवतवाडी, चिंचेवाडी, मुंडवाड, पिंपळे, मांजरपै, माचाळी, सतानाळी, …

Read More »

लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये चाकूहल्ला

न्यूयॉर्क : वादग्रस्त लेखनाबद्दल इराणकडून मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेले प्रख्यात लेखक सलमान रश्दी यांच्यावर पश्चिम न्यूयॉर्कमध्ये चाकूहल्ला झाला आहे. शुक्रवारी रात्री करण्यात आलेल्या या हल्ल्यात रश्दी जखमी होऊन कार्यक्रमस्थळीच कोसळले. हल्लेखोराला लगेच ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची प्रकृती कितपत गंभीर आहे हे लगेच कळू शकले नाही. चौताकुआ इन्स्टिट्यूशन या संस्थेतर्फे …

Read More »

‘हर घर तिरंगा’ उपक्रमासाठी ‘रवळनाथ’तर्फे निपाणीत ध्वज वितरण

निपाणी (वार्ता) : भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आजरा येथील श्री रवळनाथ को-ऑप हौसिंग फायनान्स सोसायटीच्या येथील शाखेतर्फे निपाणी शहरात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत ध्वजांचे मोफत वितरण करणेत आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन देशवासियांना केले …

Read More »

तरुणांनी खरा इतिहास समजून घ्यावा

कॉ. उमेश सूर्यवंशी  : निपाणीत क्रांतिदिनानिमित्त व्याख्यान निपाणी (वार्ता) : १९४२ साली महात्मा गांधीजी व अन्य नेत्यांनी इंग्रजांविरोधात करेंगे या मरेंगे अशी हाक देत क्रांतीचा नारा दिला. यातून देश स्वांतत्र्याला गती मिळाली. आजच्या तरुणांनी स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचा आदर्श घेऊन वाटचाल करणे आवश्यक आहे. अशावेळी खरा इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे. …

Read More »

राज्य जल धोरण २०२२ ला मंत्रिमंडळाची मंजुरी

  राज्य जलसंपत्ती प्राधिकरणाची स्थापना, नवीन एरोस्पेस धोरणाला मंजुरी बंगळूर : मंत्रिमंडळाने शुक्रवारी मंजूर केलेल्या नवीन जल धोरणात जलस्रोत व्यवस्थापनाला पुरेसे बळकट करण्यासाठी आंतरविभागीय राज्य जलसंपत्ती प्राधिकरण तयार करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. मंत्रिमंडळाने नवीन एरोस्पेस धोरणालाही मंजूरी दिली, अशी माहिती कायदा मंत्री जे. सी. मधुस्वामी यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकाराना …

Read More »

संकेश्वर-नांगनूर ब्रिज पाण्याखालील…

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर परिसरात गेल्या ४८ तासांत बरसलेल्या संततधार पावसाने हिरण्यकेशी नदी दूथडी भरुन वाहत असून नदीवरील संकेश्वर-नांगनूर ब्रिज पाण्याखाली आलेला दिसत आहे. संकेश्वरच्या हाकेवर महाराष्ट्रातील नांगनूर गाव वसलेले असल्याने हिरण्यकेशी नदीवर संकेश्वर नदी गल्ली ते नांगनूर गावाला जोडणारा ब्रिज उभारण्याचे काम राज्याचे वन आहार व नागरी …

Read More »

संकेश्वरात हर घर तिरंगा अभियानांतर्गत आठ हजार तिरंगा घरपोच…सोबत कत्ती सावकारांची जिलेबी भेट..

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात आज नगरसेवकांनी देशप्रेमी युवकांनी हर घर तिरंगा अभियांतर्गत आठ हजार तिरंगा ध्वज, कत्ती सावकारांनी जिलेबी भेट घरपोच करण्याचे कार्य केले. आज सकाळपासून घरोघरी तिरंगा ध्वज पोचविण्याचे कार्य जोमात होतांना दिसले. संकेश्वर पालिका आणि राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं माजी खासदार …

Read More »

निपाणी पालिकेची गोंधळात अर्धा तासात सभा गुंडाळली! 

पत्रिकेवरील विषयांना मंजुरी: चर्चेसाठी वेळ न दिल्याचा विरोधकांचा आरोप निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेची सभा सात महिन्यानंतर शुक्रवारी (ता.१२) सकाळी पार पडली. यावेळी मागील सभेच्या प्रोसिडिंगला मंजुरी देण्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यावरून सभेत गोंधळ उडाला. त्यानंतर सत्ताधारी गटाने सर्व विषय मंजूर म्हणत केवळ अर्धा तासात सभा गुंडाळली. तर विषय …

Read More »