Wednesday , December 17 2025
Breaking News

Belgaum Varta

दूधगंगा नदीचे पाणी पुन्हा पात्राबरोबर

  कोगनोळी : कोगनोळी येथून राष्ट्रीय महामार्ग जवळ असणार्‍या दूधगंगा नदीचे पाणी पात्राबरोबर आले आहे. शनिवार तारीख 6 व रविवार तारीख 7 रोजी पडलेल्या जोरदार पावसामुळे दूधगंगा नदीपात्रात पाण्याची वाढ झाली आहे. दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कोगनोळी, सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ, करनूर, वंदूर आदी गावच्या लोकांना पुराचा धोका वाढला …

Read More »

आमदार अनिल बेनके यांच्याकडून श्रीनगर नाला व किल्ला तलावाची पाहणी

  बेळगांव : दिनांक 08 ऑगस्ट 2022 रोजी बेळगांव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांनी श्रीनगर नाला व किल्ला तलावाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी आमदार अनिल बेनके यांनी श्रीनगर येथील नाल्यांची चोकअप साफ करण्याच्या आणि सुरळीत पाण्याच्या प्रवाहासाठी राष्ट्रीय ध्वजाजवळील किल्ला तलाव स्वच्छ करा, अशा संबंधित अधिकार्‍यांना सुचना दिल्या.

Read More »

नूतन तहसीलदार प्रवीण कारंडे यांचा रयत संघटनेतर्फे सत्कार

  निपाणी (वार्ता) : येथील तहसीलदार कार्यालयात नूतन तहसीलदार म्हणून प्रवीण कारंडे यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त त्यांचा चिकोडी जिल्हा रयत संघटनेतर्फे अध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रारंभी रमेश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राजू पोवार यांनी, निपाणी शहर आणि ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या विविध समस्या सोडवण्याचे …

Read More »

सार्वजनिक वाचनालयाचा आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार साहित्यिक महादेव मोरे यांना जाहीर

  बेळगाव : सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेतर्फे दरवर्षी देण्यात येणारा यंदाचा प्रतिष्ठेचा ‘आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार-2022’ साहित्यिक श्री. महादेव मोरे (निपाणी) यांना जाहीर करण्यात येत आहे. या पुरस्काराचे स्वरुप रुपये पंचवीस हजार, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे आहे. याआधी ‘पानीपत’कार विश्वास पाटील (मुंबई), श्री. अरुण साधू (मुंबई), डॉ. जयसिंगराव पवार …

Read More »

अलमट्टी धरण 95 टक्के भरले, 72 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु

  कोल्हापूर : अलमट्टी धरणात 95 टक्के पाणीसाठा झाल्याने 72 हजार क्युसेक्सने विसर्ग सुरु करण्यात आला आहे. आज सकाळपासून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून जोरदार दमदार पावसाने आज धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढवण्यात आला आहे. यापूर्वी 6 हजार क्युसेक्सने विसर्ग सुरु होता. अलमट्टी धरणाची पाणी क्षमता 123.01 …

Read More »

लक्ष्य सेन चमकला; बॅडमिंटनमध्ये भारताला आणखी एक सुवर्ण

  बर्मिंगहॅम : बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या 22व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूनी चमकदार कामगिरी केली आहे. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारताची महिला बॅडमिंटनपटू सिंधूने सुवर्णपदक पटकावले. तिच्यापाठोपाठ लक्ष्य सेननेदेखील धडाकेबाज खेळू करून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. लक्ष्यने पुरुष एकेरीचे विजतेपद पटकावले आहे. त्यामुळे बॅटमिंटनमध्ये भारताला यावर्षीचे दुसरे सुवर्णपदक मिळाले आहे. …

Read More »

मुसळधार पावसातही म. ए. समितीची निदर्शने

  बेळगाव : मराठी भाषिकांना कायद्यानुसार मराठी भाषेतच सरकारी कागदपत्रे देण्याच्या मागणीसाठी मुसळधार पावसातही शेकडोंच्या संख्येने जमलेल्या मराठी भाषिकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. पावसाच्या अस्मानी संकटाला तोंड देत न्याय्य हक्कांसाठी लढण्याचा वज्रनिर्धार पुन्हा एकदा दाखवून दिला. सीमाभागातील मराठी भाषिकांना सरकारी कागदपत्रे मराठीत देण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश असताना आणि …

Read More »

पीव्ही सिंधूने राष्ट्रकुल स्पर्धेत मिळवले पहिले सुवर्ण

  बर्मिंगहॅम : इंग्लंडच्या बर्मिंगहॅम शहरामध्ये 22वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. बर्मिंगहॅममधील अलेक्झांडर स्टेडियममध्ये 28 जुलैपासून सुरू झालेली ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारताची महिला बॅडमिंटनपटू सिंधूने धडाकेबाज कामगिरी केली आहे. सिंधूने महिला एकेरीचे विजतेपद पटकावले आहे. त्यामुळे बॅटमिंटनमध्ये भारताला यावर्षीचे पहिले …

Read More »

बेळवट्टी येथील प्राथमिक शाळेची संरक्षण भिंत कोसळून नुकसान

  बेळगाव : बेळवट्टी भागात सततचा मुसळधार पाऊस पडत असल्याने सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेची संरक्षण भिंत (कंपाऊंड) काल दि. 7 ऑगस्ट रोजी कोसळली. भिंत कोसळून आर्थिक नुकसान झाले आहे. सदर घटनेची माहिती बीआरसी, गट शिक्षणाधिकार्‍यांना दिली आहे. तरी याची पाहणी करून शिक्षण खात्याने संरक्षण भिंतीसाठी अनुदान लवकरात लवकर मंजूर …

Read More »

चिकोडी हज वक्फ बोर्ड संचालक पदी निवडीबद्दल अरिफ बादशाह मुल्ला यांचा सत्कार

  सौंदलगा : येथील भाजप कार्यकर्ते अरिफ बादशाह मुल्ला यांची चिकोडी जिल्हा हज वक्फ बोर्डामध्ये संचालक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र सत्कार व अभिनंदन होत आहे. अरिफ मुल्ला म्हणाले की, खासदार अण्णासाहेब जोल्ले, हज वक्फ व धर्मादाय मंत्री शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली व सौंदलगा-भिवशी भाजप प्रेमी कार्यकर्ते यांच्या सहकार्याने माझी …

Read More »