Wednesday , December 17 2025
Breaking News

Belgaum Varta

हर घर तिरंगा, निपाणीचा तिरंगा!

16 हजार ध्वजांचे उत्पादन : साळुंखे गारमेंटच्या उपक्रम निपाणी (विनायक पाटील) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशभरात ’हर घर तिरंगा’ मोहीम राबविली जात आहे. घरोघरी तिरंगा डौलाने फडकणार आहे. या ध्वजाच्या निर्मितीमध्ये निपाणीकरांचा वाटा महत्त्वाचा ठरत आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमाभागात पुरविल्या जाणार्‍या ध्वजांचे उत्पादन निपाणी येथील …

Read More »

चिक्कोडी, निपाणी तालुक्यातील 8 पूल पाण्याखाली

बेळगाव : महाराष्ट्रातील कोकण भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे चिक्कोडी, निपाणी तालुक्यातील 8 पूल पाण्याखाली गेले आहेत. चिक्कोडी तालुक्यातील कृष्णा व तिच्या उपनद्या वेदगंगा व दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत 4 फुटांनी वाढ झाली आहे. राजापूर बॅरेजमधून 41167 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सदलगा येथील दूधगंगा नदीत 16245 क्युसेक्स पाण्याचा …

Read More »

भारतनगर, अनगोळ येथे घरे कोसळली

बेळगाव : बेळगावात गेल्या तीन-चार दिवसांपासून पुन्हा मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तशातच घरे कोसळण्याचे सत्र पुन्हा सुरु झाले आहे. भारतनगर तसेच अनगोळ येथील वाडा कंपाऊंड येथील एक दुमजली घर आज सकाळी कोसळल्याची घटना घडली. गेल्या बेळगाव परिसरात तीन-चार दिवसांपासून पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. …

Read More »

ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या कैद!

  बेळगाव : गोल्फ कोर्स परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी सहा पिंजरे आणि पंधरा ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत. दरम्यान गोल्फ मैदानाजवळील ट्रॅप कॅमेरामध्ये बिबट्या कैद झाला आहे. मात्र सर्वांना धडकी भरवणारा बिबट्या वन खात्याच्या पिंजऱ्यात केव्हा कैद होणार याचीच सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. गेले तीन दिवसांपासून बिबट्या शोधासाठी अथक …

Read More »

हंदूर येथील घर कोसळून झाले दोन महिने पण नुकसानभरपाईसाठी महसूल खाते निद्रिस्त

  खानापूर (विनायक कुंभार) : सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसामुळे कोसळलेल्या घराला महसूल विभागाकडून कोणतीही नुकसान भरपाई देण्यात आली नाही. महसूल विभाग हे अतिसंवेदनशीलतेची भूमिका बजावत असते. त्याच्या विरोधात येथील महिलेने सरकारी अधिकाऱ्यांना भावनिक आवाहन करून पडझड झालेल्या घराचा पुन्हा एकदा पंचनामा करून घर देण्याची मागणी केली. केरवाड (ता.खानापूर) ग्रामपंचायत क्षेत्रातील …

Read More »

बेळगाव शहर, तालुका, खानापूर तालुक्यातील शाळांना सुट्टी

  बेळगाव : गेल्या तीन दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे बेळगाव शहर तालुका आणि खानापूर तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक शाळांना व अंगणवाडी केंद्रांना सुट्टी देण्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. बेळगाव जिल्हा माहिती खात्याला दिलेल्या प्रतिनिधी पत्रकात नितेश पाटील यांनी सोमवारी या शाळांना सुट्टीची घोषणा केली आहे. तीन दिवसापासून बेळगाव आणि खानापूर तालुक्यामध्ये …

Read More »

भारतीय फिरकीपटूंसमोर विंडीजचे लोटांगण; भारताचा 4-1 ने मालिका विजय

  फ्लोरिडा : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पाचवा टी20 सामना भारताने 88 धावांनी जिंकत मालिकाही 4-1 ने जिंकली आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारताने 189 धावाचं लक्ष्य वेस्ट इंडीजला दिलं, जे पार करताना वेस्ट इंडीज 100 धावांच सर्वबाद झाले आणि भारत जिंकला. विशेष म्हणजे भारताकडून 10 च्या 10 गडी …

Read More »

गोल्फ कोर्स परिसरात बिबट्याचा वावर असल्याने शाळांना सुट्टी

  बेळगाव : गोल्फ कोर्स परिसरात बिबट्याचा वावर असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गोल्फ कोर्स परिसरातील एक किलोमीटर परिघातील मधील शाळांना सोमवारी सुट्टी देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री बारा वाजताच्या दरम्यान ट्रॅप कॅमेरा बिबट्याची छायाचित्रे आल्यानंतर वन खात्याने शोध मोहीमेचा केंद्रबिंदू गोल्फ कोर्स परिसर केला आहे. गोल्फ कोर्स …

Read More »

मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ अध्यक्षपदी रमाकांत कोंडुस्कर

बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांची सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या अध्यक्षपदी तर देवस्थान कमिटी पंच रणजीत चव्हाण पाटील कार्याध्यक्षपदी निवड झाली. पाटील गल्ली येथील सिद्धनाथ जोगेश्वरी मंदिराच्या सभागृहात रविवारी सायंकाळी मध्यवर्ती गणेश महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये 2022-23 साठी कोंडुस्कर यांची सर्वानुमते महामंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात …

Read More »

तरूण भारतच्या “त्या” चूकीच्या बातमीमुळे चंदगड राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त; सोशल मिडीयावर पत्रकाराचा खरपूस समाचार

  चंदगड (एस. के. पाटील) : तरुण भारतमध्ये प्रसिद्ध झालेल्या चंदगडला घड्याळाच्या काट्याची बदलणार दिशा? या बातमीचे तीव्र पडसाद चंदगड विधानसभा मतदारसंघात उमटले. आज दिवसभर या चूकीच्या वृत्ताबद्दल संबंधीत पत्रकाराचा फोन व सोशल मिडीयावरून सर्व राष्ट्रवादी कार्यकर्ते व आमदार राजेश पाटील समर्थकांनी उद्धार केल्याचे समजते. चंदगडचे कार्यसम्राट आमदार राजेश पाटील …

Read More »