Friday , April 17 2026
Breaking News

हिरण्यकेशीचे बाॅयलर प्रदीपन…

Spread the love

 

संकेश्वर (महंमद मोमीन) : हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याचा ६२ वा बाॅयलर प्रदीपन सोहळा उत्साही वातावरणात संपन्न झाला. बाॅयलर प्रदीपन कार्यक्रमाला निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींचे दिव्य सानिध्य लाभले. श्रींची पादपूजा संचालक सुरेश बेल्लद यांनी केली. हुन्नूर विठ्ठल मंदिराचे बिरप्पा पुजेरी दांपत्याच्या हस्ते पूजा करण्यात आली. बाॅयलर प्रदीपन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कारखान्याचे अध्यक्ष निखिल कत्ती यांनी भूषविले होते. श्रींच्या आणि हिरण्यकेशी साखर कारखाना संचालक मंडळ आणि मान्यवरांच्या हस्ते बाॅयलर प्रज्वलित करण्यात आले. यावेळी कारखाना उपाध्यक्ष श्रीशैलप्पा मगदूम, संचालक अशोक पट्टणशेट्टी, शिवनायक नाईक, अप्पासाहेब शिरकोळी, बाबासाहेब आरबोळे, सुरेश बेल्लद,बसवराज कल्लट्टी, प्रभुगौडा पाटील, बसप्पा मरडी, सुरेंद्र दोडलिंगण्णावर, कारखाना व्यवस्थापक संचालक सातप्पा कर्किनाईक, के.बी. पाटील, शशीराजे पाटील, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, प्रशांत पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गजानन क्वळी, सुनिल नेरली, बसवराज बस्तवाडी, कलप्पा चौगुला, जयसिंग सनदी, नगरसेवक अमर नलवडे, संजय शिरकोळी, गुरु कुलकर्णी, सुभाष पाटील, पवन पाटील, हुक्केरी विद्युत संघाचे पदाधिकारी, विविध संघ संस्थांचे संचालक, अनेक मान्यवर सभासद उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत व्यवस्थापक संचालक सातप्पा कर्किनाईक यांनी केले. आभार संचालक सोमगोंडा आरबोळे यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

संकेश्वरातील बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला ३० वर्षे कारावास; १ लाख रुपये दंड

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर शंकर नगर येथील आरोपी दर्शन भगवंत हुणश्याळी (वय २३) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *