Saturday , March 7 2026
Breaking News

Belgaum Varta

जांबोटी माध्यमिक विद्यालयाच्या खेळाडूंना एस. पी. साऊंडकडून गणवेश प्रदान

  खानापूर : जांबोटी ता. खानापूर येथील माध्यमिक विद्यालयाच्या मुलांच्या कब्बडी व व्हॉलीबॉल संघाची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांसाठी निवड झाली. त्याबद्दल एस. पी. साऊंडचे मालक श्री. रवींद्र रवळनाथ गुरव यांनी खेळाडूंना गणवेश देऊन गौरव केला. खानापूर तालुका क्रीडा स्पर्धांमध्ये माध्यमिक विद्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ठ कामगिरी करून यश संपादन केले. म्हणून राजवाडा जांबोटी …

Read More »

जिल्हा पोलिस प्रमुख संजीव पाटील यांच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट

  बेळगाव : जिल्हा पोलिस प्रमुख संजीव पाटील यांच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट काढून जनतेकडून पैसे उकळल्याची घटना समोर आली आहे. आपण अश्या कोणत्याही प्रकारचे खाते उघडले नाही कोणीतरी आपल्या नावाचा व फोटोचा गैरवापर करत आहे तरी जनतेने कोणताही पैशासंबंधी व्यवहार करू नये, असे आवाहन संजीव पाटील यांनी केले आहे. …

Read More »

खानापूरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विविध योजनांचे पत्रक वितरण

  खानापूर (प्रतिनिधी) : आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवासाचे औचित्य साधुन दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने सेवा पंधराव्या साजरा करण्यात येत आहे. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध योजनाचे पत्रक वितरण करण्यात आले. वितरण प्रसंगी तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल, …

Read More »

कर्मवीर अण्णांनी शिक्षणाची “गंगोत्री” खेड्यापाड्यात नेली : सहकार रत्न रावसाहेब पाटील

सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार रत्न व अरिहंत संस्थेचे संस्थापक रावसाहेब पाटील दादा हे होते. ते अध्यक्षीय भाषणात म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजे शिक्षणाचा प्रसार करणारे महान कर्मयोगी होते. रयत …

Read More »

शेवटच्या दिवशीही विधानसभेत वादावादी, गोंधळ

सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब बंगळूर : बीएमएस सार्वजनिक शिक्षण विश्वस्थ घोटाळ्यात उच्च शिक्षण मंत्री डॉ. सी. एन. अश्वथनारायण यांचा हात आहे. यासाठी त्यांनी राजीनामा द्यावा आणि सीबीआय किंवा सीओडी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी करत धजदच्या सदस्यांनी आजही विधानसभेत ठिय्या मांडला, त्यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिणामी कोणतेही …

Read More »

हिशेब चुकता…! भारत 6 गड्यांनी विजयी

नागपूर : भारतानं नागपूरचा दुसरा टी20 सामना जिंकून मोहालीतल्या पराभवाचं उट्ट काढलं. आधी अक्षर पटेलनं गोलंदाजीत कमाल केली आणि मग रोहित शर्मा एका बाजूनं किल्ला लढवत भारताला निर्णायक विजय मिळवून दिला. ओल्या आऊटफिल्डमुळे हा सामना 8-8 ओव्हरचा खेळवण्यात आला. त्यात ऑस्ट्रेलियानं दिलेलं 91 धावांचं आव्हान भारतानं अखेरच्या ओव्हरमध्ये 6 गडी …

Read More »

कावळेवाडीच्या कुस्तीपटुंची राज्यस्तरावर निवड

  बेळगाव : कावळेवाडी, बेळगाव येथे जिल्हास्तरावर संपन्न झालेल्या शालेय कुस्ती क्रीडास्पर्धेत गावातील गुणवंत कुस्तीपटू पै. रवळनाथ श्रीधर कणबरकर याने 65 वजन गटात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरावर गरुडझेप घेतली आहे. रवळनाथ हा इयत्ता आठवीत असून बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी येथे शिकत आहे. मठमती कुस्ती आखाडा, सावगाव येथे सराव करीत आहे. …

Read More »

संकेश्वरात २४ तास पाणी कोठे आहे?

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात २४ तास पाणीपुरवठा नसताना मिटर रेडिंगनुसार पाण्याची बिले आकारणी कशासाठी? असा प्रश्न नगरसेवकांनी पालिका सभेत उपस्थित करताच मुख्याधिकारी आर. सी. चौगुला, अभियंता आर. बी. गडाद यांची गोची झालेली दिसली. सर्वच २८ सदस्यांनी संकेश्वरातील अन्यायकारक पाणीपट्टी त्वरीत थांबवून वर्षाकाठी २ हजार रुपये पाणीपट्टी आकारणी करण्याची …

Read More »

वडगाव भागात अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी

  बेळगाव : शाळकरी मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने शहरातील प्रमुख मार्गावर बंदी घातली असली तरी उपनगरातून अवजड वाहनांची वाहतूक चालूच आहे. यामुळे अनेकवेळा उपनगरातील प्रमुख रस्त्यावर देखील वाहतुकीची कोंडी होत आहे. सकाळच्या वेळेत अशाप्रकारची वाहतूक कोंडीमुळे शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशीच वाहतूक कोंडी …

Read More »

श्री शंकरलिंग सौहार्दला ५६ लाख रुपये नफा : सभासदांना २५ टक्के लाभांश जाहीर

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री शंकरलिंग क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. सभेचे अध्यक्षस्थान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळकृष्ण हतनुरी यांनी भूषविले होते. सभेच्या प्रारंभी हुक्केरीचे लोकप्रिय आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री दिवंगत उमेश कत्ती यांच्या प्रतिमेचे पूजन करुन श्रध्दांजली …

Read More »