Tuesday , September 17 2024
Breaking News

Belgaum Varta

म्युनिसिपल शाळेसाठी रस्त्यावर उतरणार!

डोंगरी भागातील माजी विद्यार्थ्यांचा निर्धार : ग्रामीण भागात बैठका निपाणी (संजय सूर्यवंशी) : निपाणी शहरासह ग्रामीण आणि डोंगरी भागाच्या सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या मुलांच्यासाठी कामधेनू ठरलेल्या निपाणी येथील मुन्सिपल हायस्कूल सरकारकडे हस्तांतरण करण्याचा घाट काही मंडळींनी घातला आहे. त्यामुळे भविष्यकाळात सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी आणि पालकांची हेळसांड होणार आहे. त्यामुळे हस्तांतराचा …

Read More »

दहावी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी बेळगाव तालुक्यातील शिक्षकांना मार्गदर्शन

बेळगाव : येत्या सोमवार दिनांक 19 व गुरुवार दिनांक 22 जुलै 2021 रोजी होणाऱ्या इयत्ता दहावीच्या वार्षिक परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी म्हणून बेळगाव तालुक्यातील सर्व पी.ई. शिक्षक व स्काऊट अँड गाईड शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी मच्छे येथील डिवाइन मर्सी स्कूलमध्ये गुरुवार दिनांक 15 जुलै रोजी बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बेळगाव तालुक्याचे …

Read More »

खानापूरात पावसाची संततधार सुरूच

खानापूर (प्रतिनिधी) : आज चौथ्या दिवशीही खानापूर शहरासह तालुक्यात पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे तालुक्यातील नद्या, नाल्याच्या पात्रात पाण्याची पातळी वाढली आहे.तालुक्यातील खेडेगावात भात रोप लागवडीचे काम अजुन बऱ्याच ठिकाणी व्हायचे आहे. त्यामुळे भात रोप लागवडीला जोर आला आहे. यंदा पावसाने योग्य साथ दिली नाही. त्यामुळे रोप लागवडीचे काम रेंगाळले …

Read More »

आरोग्य अधिकारी डॉ. नांद्रेचा नगरपंचायतीच्यावतीने सत्कार

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूरात नगरपंचायतीच्यावतीने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय नांद्रे यांचा सत्कार नुकताच करण्यात आला.गेल्या दोन वर्षापासुन देशभरात कोरोनाच्या महामारीमुळे सर्वत्र हाहाकार उडाला. अनेकाचे संसार उघड्यावर पडले, कित्येकांना आपला जीव गमवावा लागला. त्याच बरोबर अनेकांना नोकरी गमवावी लागली. कित्येकाचे रोजगार गेले. अशावेळी कोरोनाच्या विरूद्ध लढण्यासाठी देशभरात कोरोना लसीकरण सुरू …

Read More »

खानापूर तालुक्यातून दहावी परीक्षेला २३ केंद्रात ४२१४ विद्यार्थी बसणार

खानापूर (प्रतिनिधी) : सन २०२१-२२मधील दहावीची परीक्षा जुलैच्या १९ व २२ रोजी होणार आहे.सदर दहावी परीक्षेला तालुक्यातून जवळपास ४२१४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यासाठी तालुक्यात दहावी परीक्षेसाठी २३ परीक्षा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. तर ३७१ परीक्षा खोल्यांचे आयोजन करण्यात आले.या दहावीच्या परीक्षेत १९०० मुले, १७८५ मुली, असुन बहिस्थ विद्यार्थ्यामधून …

Read More »

मारूती नगरातील नागरी समस्या सोडवा; नगरपंचायतीला निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील विविध भागात समस्यांचा डोंगर आहे. विद्यानगरात रस्ता, गटारी, डुक्कराची वर्दळ अशी समस्या असतानाच आता मारूतीनगरातील रस्ता, गटारी व पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवा या मागणीसाठी भाजपचे नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मजहर खानापूरी व स्थायी कमिटी अध्यक्ष मादार व मुख्याधिकारी विवेक बन्ने यांना निवेदन …

Read More »

खानापूर युवा समिती पाठवणार पंतप्रधानांना अकरा हजार पत्रे!

खानापूर : सीमाप्रश्नाच्या संदर्भातील प्रत्येक लढ्यात जांबोटी भागातील कार्यकर्ते नेहमीच अग्रभागी होते. म्हणूनच या भागाला महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. मात्र अलीकडे चळवळीला मरगळ आली असताना युवा समितीने नवी ऊर्जा देण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. इथले युवक युवा समितीच्या प्रत्येक उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होतील, असे आश्वासन जांबोटी …

Read More »

‘झाडे लावा झाडे जगवा’ हा मूलमंत्र जपावा : सुनील जाधव

बेळगाव : सामाजिक कार्यकर्त्यांनी विविध भागात वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवत आहोत. कोरोना काळातील ऑक्सिजनचे महत्त्व हाच यामागील प्रमुख उद्देश आहे. कोरोना महामारीच्या काळात आपल्याला ऑक्सिजनचे महत्त्व किती आहे ते खऱ्या अर्थाने समजले आहे. प्रकृतीचे संवर्धन करणे आवश्यक आहे. केवळ झाडे लावून संवर्धन होत नाही तर ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा मूलमंत्र …

Read More »

तालुक्यात सर्वात जास्त कणकुंबी येथे १४५ मि. मी. पावसाची नोंद

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील कणकुंबी येथे 145 मि. मी. सर्वात जास्त पावसाची नोंद झाली असुन गेल्या दोन दिवसापासून खानापूर शहरसह तालुक्यातील विविध भागात पावसाची संततधार सुरूच आहे.खानापूर रामनगर महामार्गावर पावसामुळे तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे खानापूर रामनगर महामार्गाची वाहतुक पूर्णता बंद झाली आहे.तसेच तालुक्यातील विविध गावाच्या तलाव, नद्या, नाल्याच्या …

Read More »

कदंबा फौंडेशनकडून खानापूरात बेवारस जखमीची दखल

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर कदंब फौंडेशनच्यावतीने शहरातील होसमनी पेट्रोल पंपावर जखमी अवस्थेत बेवारस व्यक्ती गेल्या काही दिवसांपासुन विव्हळत पडली होती. पायाला जखम होऊन किडे पडले होते. याची दखल घेण्यात आली.याची माहिती कदंबा फौंडेशनचे अध्यक्ष जाॅर्डन गोन्सालवीस यांना देण्यात आली. लागलीच कदंबा फौंडेशनचे अध्यक्ष जाॅर्डन गोन्सालवीस, उपाध्यक्ष जी. एम. कुमार, पिंटू …

Read More »