बेळगाव : बेळगाव येथील एल्गार सामाजिक साहित्य परिषद यांच्या वतीने बेळगावातील प्रसिद्ध पुस्तकप्रेमी आणि पुस्तक संग्राहक शंकर चाफाडकर यांच्या पाचव्या स्मृतिदिन प्रित्यर्थ वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन रामदेव गल्ली, बेळगाव येथील गिरीश कॉम्प्लेक्शच्या शहीद भगतसिंग सभागृहात रविवार दि. १७ जुलै रोजी मोठ्या उत्साहात पार पडल्या. वक्तृत्व स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एल्गार …
Read More »महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षासंदर्भात सुप्रीम कोर्टातली सुनावणी 20 जुलैला
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले. उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला… एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. या सर्व घडामोडीनंतर शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला. एकनाथ शिंदेंच्या बंडाविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. 11 जुलै रोजी सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर …
Read More »पुलवामामध्ये पोलीस-सीआरपीएफ पथकावर दहशतवादी हल्ला, ‘एएसआय’ शहीद
काश्मीर : दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) संयुक्त पथकावर आज (दि. १७) दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात ‘सीआरपीएफ’चे एएसआय शहीद झाले. या हल्ल्यानंतर परिसरातील शोध मोहिम तीव्र करण्यात आली आहे. पुलवामामधील सर्कुलर रस्त्यावरील बथुरा क्रासिंगजवळील तैनात असणार्या पोलीस व सीआरपीएफ पथकावर दहशतवाद्यांनी अंदाधूंद गोळीबार …
Read More »मार्कंडेय नदी ओव्हरफ्लो!
बेळगाव : पश्चिम घाटात आणि बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे बेळगाव तालुक्यातील मार्कंडेय नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे शेतकर्यांची पिके मोठ्या प्रमाणात वाहून गेली आहेत. मार्कंडेय नदीत पाण्याची आवक वाढल्याने बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी, अलतगा, कंग्राळी खुर्द, कंग्राळी बुद्रुक या गावातील शेतकर्यांच्या शेतजमिनीत पाणी शिरले असून मोठ्या प्रमाणात पिकांचे …
Read More »खासदार संजय मंडलिकांच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे गटात जाण्यासाठी लावला जोर!
कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्यासाठी आता खासदारांकडून चाचपणी केली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन शिवसेना खासदार शिंदे कळपात सामील होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, याबाबत दोघांकडूनही जाहीर वाच्यता करण्यात आलेली नाही. कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक सध्या दिल्ली दौर्यावर आहेत. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये हमीदवाडामधील सदाशिवराव मंडलिक कारखाना …
Read More »उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधकांकडून मार्गारेट अल्वा
नवी दिल्ली : विरोधी पक्षांकडून उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. विरोधी पक्षांकडून काँग्रेस नेत्या आणि राजस्थानच्या माजी राज्यपाल मार्गारेट अल्वा यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. याची घोषणा शरद पवार यांनी केली. विरोधी पक्षांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले आहेत. यात शिवसेना खासदार …
Read More »कस्तुरीरंगन आयोगाच्या शिफारशीसंदर्भात खानापूर म. ए. समितीच्या बैठकीत चर्चा
खानापूर – रामनगर रस्त्यासाठी रुमेवाडी क्रॉस येथे उद्या रास्तारोको करण्याचा निर्धार खानापूर : रविवार दिनांक 17-7-2022 रोजी दुपारी 12 वाजता खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची बैठक शिवस्मारक खानापूर येथे संपन्न झाली. अध्यक्षस्थानी तालुक्याचे माजी आमदार दिगंबरराव पाटील होते. यावेळी 6 जुलै 2022 रोजी कस्तुरीरंगन आयोगाने खानापूर तालुक्यातील 60 गावे …
Read More »आजरा तालुक्यात टस्करचा धुमाकूळ सुरूच
आजरा : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात टस्करचा धुमाकूळ सुरूच आहे. शुक्रवारी हत्तीने गवसे गावात उभ्या असलेल्या शेड, एक टेम्पो आणि दोन दुचाकींचे नुकसान केले. मुसळधार पावसामुळे आजरा-आंबोली मार्गावरील वाहतूकही सुमारे दोन तास खोळंबली. टस्कर बाजूला होईपर्यंत गोवा, आंबोली येथून येणारी वाहने अडकून पडली होती. दोन दिवसांपूर्वी टस्कराने शेतकरी महादेव …
Read More »आगामी निवडणुकीत विकासकामेच ठरणार काँग्रेससाठी वरदान : आमदार लक्ष्मी हेब्बाळकर
कुडची : मागील काळात काँग्रेस सरकारने सुशासन देण्याबरोबरच अनेक विकासकामे केली असून, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ही विकासकामे वरदान ठरणार आहेत, असे मत बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले. कुडची विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी व पक्ष संघटनेच्या हितासाठी 6 दिवस आयोजित भव्य सायकल जथ्याच्या शेवटच्या दिवशी पक्षाचे …
Read More »गडकोटांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र मंत्रालयाची किंवा महामंडळाची निर्मिती करा; संभाजीराजेंची मागणी
कोल्हापूर : माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी फेसबुक पोस्टद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गडकोटांच्या संवर्धनासाठी स्वंतत्र मंत्रालयाची किंवा महामंडळाची निर्मिती करा, अशी मागणी केली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असणारे श्री शिवछत्रपती महाराजांचे गडकोट आज अत्यंत दुरावस्थेत आहेत. दिवसेंदिवस त्यांची अधिकच दुरावस्था होत आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta