Monday , September 21 2026
Breaking News

सार्वजनिक वाचनालयाच्या संगीत भजन स्पर्धेची उद्या सांगता

Spread the love

 

बेळगाव : येथील सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने सोमवार दि. 22 पासून संगीत भजन स्पर्धा सुरु असून या संगीत भजन स्पर्धेची सांगता शुक्रवार दि. 26 ऑगष्ट 2022 रोजी होणार आहे. या सांगता समारंभास नेकिनहसूरचे गुरुवर्य ह.भ.प. श्री. भाऊसोा पाटील महाराज अध्यक्ष वारकरी महासंघ महाराष्ट्र-कर्नाटक-गोवा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून ते याप्रसंगी वारकर्‍यांना मार्गदर्शन करणार आहेत. आज शेवटच्या दिवशी श्री रवळनाथ भजनी मंडळ, गोल्याळी, ता. खानापूर, श्री सातेरी देवी भजनी मंडळ, बेटगेरी, ता. खानापूर, श्री संत तुकाराम भजनी मंडळ, माणगांव, ता. चंदगड, श्री ज्ञानेश्वर भजनी मंडळ, तुडये, ता. चंदगड, दिपा तबला वादन विद्यालय संगीत आणि सांस्कृतिक कलामंच, कंग्राळी (खुर्द) ता. जि. बेळगाव यांचे सादर होणार आहेत, तरी रसिक-श्रोत्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *