Wednesday , December 17 2025
Breaking News

Belgaum Varta

पीव्ही सिंधूची सिंगापूर ओपनच्या अंतिम फेरीत धडक

  सेमीफायनलमध्ये सेईना कावाकामीला नमवले सिंगापूर : भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने शनिवारी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत खालच्या मानांकित जपानच्या सेईना कावाकामीचा पराभव करत सिंगापूर ओपनच्या अंतिम फेरीत धडक दिली. या वर्षी सय्यद मोदी इंटरनॅशनल आणि स्विस ओपनमध्ये दोन सुपर 300 विजेतेपद पटकावणार्‍या दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूने 32 मिनिट सुरु …

Read More »

शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळ बैठकीत नामांतरावर निर्णय, औरंगाबाद आता संभाजीनगर ऐवजी छत्रपती संभाजीनगर

  मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आपल्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत घेतलेल्या निर्णयांना नव्याने स्थापन झालेल्या सरकारने स्थगिती दिली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. ’29 तारखेला तत्कालीन सरकार अल्पमतात असताना त्यांनी घाईघाईने काही निर्णय घेतले होते. मात्र या निर्णयांबाबत पुढे जाऊन …

Read More »

ईदलहोंड मराठी शाळेचे मुख्याध्यापक पाटील यांचा सेवानिवृत्तनिमित्त सत्कार

  खानापूर (प्रतिनिधी) : ईदलहोंड (ता. खानापूर) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक अशोक रामचंद्र पाटील हे 29 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्ती सत्कार सोहळा नुकताच पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुक्याचे माजी आमदार श्री. दिगंबरराव यशवंतराव पाटील होते. यावेळी व्यासपीठावर एसडीएमसी अध्यक्ष तानाजी पाखरे, उपाध्यक्षा …

Read More »

राष्ट्रध्वज पॉलिस्टरचा बनविण्याच्या निर्णयास विरोध करण्याची गरज

  बेळगाव : तिरंगा ध्वज हा केवळ काठी व कापडाचा नाही. त्याला मोठा इतिहास आहे. लाखो भारतीयांच्या त्यागातून त्याची निर्मिती झाली असून तो देशाची शान व अभिमान आहे. यासाठी तो पॉलिस्टरचा बनविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला जनतेने विरोध केला पाहिजे, असे प्रतिपादन गांधीवादी अशोकभाई देशपांडे यांनी केले. प्रगतिशील लेखक संघाच्या शुक्रवारी …

Read More »

गर्लगुंजीत मराठी मुलांच्या कोसळलेल्या शाळा इमारतीची जिल्हा न्यायाधीशांकडून पाहणी

  खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीत (ता. खानापूर) येथील ८५ वर्षा पूर्वी बांधण्यात आलेल्या मराठी मुलांच्या शाळेच्या इमारतीच्या तीन वर्गखोल्या नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे जमीनदोस्त झाल्या. ही बातमी कळताच बेळगाव जिल्हा न्यायाधीश मुरली मोहन रेड्डी, बीईओ लक्षणराव यकुंडी, खानापूर तालुका न्यायाधीश सूर्यनारायण, खानापूर तालुका वकिल संघटना अध्यक्ष ऍड. आय. आर. घाडी, …

Read More »

अंशतः विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा संततधार

  बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने काल शुक्रवारी काही अंशी विश्रांती घेतली. बऱ्याच दिवसानंतर बेळगाव परिसरातील नागरिकांना सूर्यदर्शनही घडले. मात्र त्यानंतर सायंकाळी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. रात्रीही दमदार पावसाच्या सरी कोसळल्या. आज शनिवारी सकाळपासूनच पुन्हा एकदा संततधार पावसाने सुरुवात केली आहे. प्रशासनाने पावसामुळे विद्यार्थ्यांना त्रास होऊ …

Read More »

प्राध्यापक डॉ. एन. डी. पाटील यांची जयंती उत्साहात साजरी

  सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल या शाखेमध्ये प्राध्यापक डॉ. एन. डी. पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली एन. डी. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन माजी मुख्याध्यापक श्री. एस. डी. पाटील यांच्या हस्ते झाले विद्यालयातील विद्यार्थिनींनी ईशस्तवन गायले. विद्यालयातील सहाय्यक शिक्षक श्री. एस. व्ही. यादव …

Read More »

विधानपरिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदावर शिवसेनेचा दावा, काँग्रेस-राष्ट्रवादीही स्पर्धेत

मुंबई  : सत्तेतून बाहेर गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला आहे. याबाबात शिवसेनेकडून विधान परिषदेच्या सभापतींना पत्र पाठवण्यात आले आहे. शिवसेनेशिवाय राष्ट्रवाद काँग्रेस आणि काँग्रेसही यासाठी स्पर्धेत आहे. विधानपरिषदेत शिवसेनेकडे 11 सदस्य आहेत. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी 10-10 सदस्य आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, …

Read More »

पीव्ही सिंधूची सेमीफायनलमध्ये धडक, एचएस प्रणॉयसह सायना मात्र स्पर्धेबाहेर

सिंगापूर : टेनिस विश्वातील एक भव्य स्पर्धा असणाऱ्या सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अव्वल दर्जाची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने चीनच्या हान युईला मात देत थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. दुसरीकडे सायना नेहवाल आणि पुरुष गटात एचएस प्रणॉय यांना पराभव पत्करावा लागल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. भारताला दोन वेळा ऑलिम्पिक …

Read More »

माणगांवात उद्या शेकापच्या वर्धापन दिनासासंदर्भात आढावा बैठक

माणगांव (नरेश पाटील) : शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाची जय्यत तयारी सुरु आहे. संपूर्ण जिल्ह्यात वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी उद्या दिनांक 16 जुलै रोजी दुपारी 1.00 वाजता कुणबी भवन माणगाव येथे बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा महाराष्ट्र विधनपरिषदचे आमदार जयंतभाई …

Read More »