कस्तुरीरंगन अहवालाला विरोध करणार : प्रमोद कोचेरी खानापूर (प्रतिनिधी) : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने राज्यासह खानापूर तालुक्यातील जवळपास 62 गावाचा कस्तुरीरंगन अहवालात समावेश केला आहे. याला विरोध करत येत्या 60 दिवसात तालुक्यातील 62 गावाचा संपर्क घेऊन, नागरिकांशी चर्चा करून नागरिकांसह खानापूर तालुका भाजपच्यावतीने केंद्र सरकारला हरकती देण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार …
Read More »पूर काळात काळात सर्व ती खबरदारी घ्या
आमदार श्रीमंत पाटील : उपाययोजनेसाठी अधिकाऱ्यांची बैठक अथणी : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरूच आहे त्यामुळे अथणी कागवाड तालुक्यातील कृष्णा नदीला महापूर येण्याची शक्यता आहे त्यामुळे अधिकाऱ्यांनी पूर्व खबरदारी घ्यावी, अशी सूचना माजी मंत्री व कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी केली. दोन वर्षाचा अनुभव पाहता महापूर काळात प्रत्येकाने झोकून देऊन काम …
Read More »’मॉडर्न’मध्ये भरली विठ्ठल नामाची शाळा
निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराज यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धाच्या माध्यमातून आषाढी एकादशी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी स्नेहा घाटगे होत्या तर मुख्य अतिथी म्हणून वसंत शंगोळे -गुरुजी, तबलावादक नसीर मुल्ला, हेमंती ओबले, संदिप इंगवले यांची उपस्थिती होती. आषाढी …
Read More »भाटनांगनूरमध्ये हालसिद्धनाथ मूर्तीची प्रतिष्ठापना
निपाणी (वार्ता) : भाटनांगनूर येथील मठामध्ये हालसिद्धनाथ मूर्तीची प्रतिष्ठापना मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी नवीन मूर्तीची नागनाथ -हालसिध्दनाथ महाराज मठापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी चैतन्य महाराज व चिक्कोडी जिल्हा राज्य संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते या मूर्तीची पूजा झाली. …
Read More »बळ्ळारी नाल्याच्या पुराने भातपीकं धोक्यात
बेळगाव : बेळगाव परिसरातील दक्षिण भाग येळ्ळूर रोडपासून सुरु होणारा बळ्ळारी नाला शेतकर्यांना तारक असलेला 2013 पासून मारकच ठरलेला आहे. यातील गाळ, जलपर्णी काढून त्याची खोली वाढवल्यास तो तारक होईल. पण कर्नाटक सरकार, बेळगाव जिल्हा संबंधित अधिकारी, आमदार साहेबांना याबद्दल निवेदन तसेच प्रत्यक्ष भेटून कल्पना देऊनही नाला स्वच्छ न …
Read More »जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली, त्या प्रत्येक फुटीमागे शरद पवारांचाच हात; केसरकरांचा आरोप
नवी दिल्ली : शिवसेनेत आतापर्यंत झालेल्या प्रत्येक फुटीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाच हात असल्याचा आरोप शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी एनडीएनं आयोजित केलेल्या बैठकीचं शिंदे गटाला निमंत्रण देण्यात आले आहे. त्यासाठी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यावेळी …
Read More »रियाने अनेकदा गांजा खरेदी करुन सुशांतला दिला : एनसीबी
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आता आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. एनसीबीने दावा केला आहे की सुशांतसिंह राजपूतची गर्लफ्रेंड रियाने अनेकवेळा गांजा खरेदी करुन त्याला दिला. काल या प्रकरणातली सुनावणी पार पडली. ३५ आरोपींविरोधात या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होते. सुशांतसिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने …
Read More »संकेश्वरात उत्कृष्ट बैलजोडी स्पर्धेला उदंड प्रतिसाद
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर बेंदूर कमिटीतर्फे खास बेंदूरनिमित्य आयोजित हुक्केरी तालुका स्तरीय आणि संकेश्वर शहर स्तरीय बैलजोडी उत्कृष्ट स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला. बळीराजा आपल्या पोशिंदा बैलांचा बैलपोळा सण पावसाची पर्वा न करता अमाप उत्साही वातावरणात साजरा करताना दिसला. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या उत्कृष्ट बैलजोडींची गावातील प्रमुख मार्गे सवाद्य मिरवणूक …
Read More »कन्नड चित्रपट अभिनेते शिवरंजन यांच्यावर गोळीबार; थोडक्यात बचावले!
बेळगाव : बैलहोंगल शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती, कन्नड चित्रपट अभिनेते शिवरंजन बोळण्णावर यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार करूनन पळ काढला. मात्र बोळण्णावर किंवा इतर कोणालाही कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याची माहिती उपलब्ध आहे. गोळीबार करणाऱ्यांपैकी एक त्याच्या भावाचा नातेवाईक असल्याची माहिती आहे. बैलहोंगल येथील मारूती देवळाजवळील शिवरंजन यांच्या जुन्या घराजवळ हा …
Read More »भारताचा इंग्लंडवर दहा गडी राखून दणदणीत विजय
केनिंग्टन : भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना केनिंग्टन ओव्हलवर झाला. हा सामना भारताने १० गडी राखून जिंकला. जसप्रीत बुमराहचे सहा बळी आणि कर्णधार रोहित शर्माचे अर्धशतक, ही आजच्या सामन्याची वैशिष्ट्ये ठरली. जसप्रीत बुमराहच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीमुळे भारतीय संघाने इंग्लंडला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta