Wednesday , December 17 2025
Breaking News

Belgaum Varta

हर्षद बुवांच्या कीर्तनाने श्रोते मंत्रमुग्ध!

नामदेव देवकी संस्थेतर्फे तीन दिवसीय कीर्तनमाला बेळगाव : आषाढी एकादशीनिमित्त शहापूर येथील नामदेव दैवकी संस्था आयोजित नामदेव विठ्ठल मंदिरात तीन दिवसीय कीर्तनमाला उत्साहात पार पडली. पुण्याचे प्रसिद्ध कीर्तनकार हभप हर्षदबुवा जोगळेकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. संवादिनीसाथ श्री. वामन वागुकर यांनी तर पकवाजाची साथसंगत श्री. यशवंत पांडुरंग बोंद्रे यांनी …

Read More »

बिम्समध्ये चोरी करणार्‍याला पकडले

बेळगाव : गेल्या दोन दिवसांपासून रुग्णालयात चोरी करणार्‍या चोरट्याला रुग्णांचे नातेवाईक व नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना बेळगाव येथील बिम्स रुग्णालयात घडली. बेळगाव येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात गेल्या दोन दिवसांपासून चोरी करणार्‍या सराईत चोराला रुग्णांचे नातेवाईक व नागरिकांनी पकडून एपीएमसी पोलिसांच्या ताब्यात दिले. रुग्णांचे नातेवाईक आणि कर्मचार्‍यांचे पैसे आणि …

Read More »

ओबीसी आरक्षणाची सुनावणी लांबणीवर; नव्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचे महत्त्वपूर्ण निर्देश

नवी दिल्ली : राज्यातील ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 27 टक्के आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने पुढील निर्णय येईपर्यंत राज्यात नव्याने निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करु नये, असे निर्देश दिले आहेत. ओबीसी आरक्षणाच्या याचिकेवर पुढील सुनावणी आता 19 जुलैला होणार आहे. …

Read More »

शिवसेनेचं ठरलं… राष्ट्रपती निवडणुकीत द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार!

  मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा विरोध डावलून बहुतांश खासदारांच्या मागणीला प्राधान्य देत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय …

Read More »

मुसळधार पावसामुळे गर्लगुंजीत मराठी मुलांच्या शाळेची तिसरी वर्गखोली जमीनदोस्त

खानापूर (प्रतिनिधी) : सध्या तालुक्यात मुसळधार पाऊस चालु आहे. त्यामुळे गर्लगुंजीत (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेच्या इमारतीची तिसरी वर्गखोली जोरदार पावसाने जमीनदोस्त झाली. याआधी शुक्रवारी रात्री एक वर्गखोली कौलारू छतासह जोरदार पावसामुळे जमीनदोस्त झाली तर इतर खोल्या पडण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या 85 वर्षा पूर्वीची गर्लगुंजी मराठी मुलाच्या …

Read More »

अपघातात बेळगुंदीच्या जवानाचा दुदैवी मृत्यू

बेळगाव : स्विफ्ट कारची झाडाला धडक बसून झालेल्या अपघातात बेळगुंदी गावच्या जवानाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. बेळगाव -राकस्कोप रोडवर बाकनूर क्रॉस नजीक असलेल्या नाल्याजवळ ही घटना घडली असून या घटनेमध्ये ओमकार महादेव हिंडलगेकर (वय 23) रा. कलमेश्वर गल्ली बेळगुंदी या जवानाचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. मिळालेली अधिक …

Read More »

‘वन टच’ची वृत्तपत्र विक्रेत्याला मदत

बेळगाव : गोडसे कॉलनी, जुना गुडसशेड रोड येथील ‘वन टच फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून कोरे गल्ली येथील गरजू वृत्तपत्र विक्रेते रमेश सरोदे यांना आर्थिक मदत देण्यात आली. रमेश सरोदे यांची घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असून त्यांचा एकुलता एक मुलगा योगेश याला कॅन्सर असून त्याच्या उपचारासाठी दरमहा रू. 8000 ते …

Read More »

भारत विकास परिषदेच्यावतीने स्थापना दिवस अपूर्व उत्साहात

  बेळगाव : भारत विकास परिषद बेळगांवच्यावतीने परिषदेचा 60 वा स्थापना दिवस, दहावी व बारावीच्या प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान तसेच डाॅक्टर्स डे निमित्त सेवाभावी डाॅक्टरांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम रविवारी सायंकाळी आयोजिण्यात आला होता. प्रमुख अतिथी म्हणून डाॅ. एस्. एन्. शिगली व डाॅ. सविता कड्डू उपस्थित होते. प्रारंभी विनायक मोरे …

Read More »

श्रीलंकेतील राष्ट्रपतीपदाची निवडणूक २० जुलै रोजी; १८ पर्यंत नामांकन

श्रीलंकेतील आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर नव्या राष्ट्रपतींच्या निवडीची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलैपर्यंत नामांकन करता येईल. तसेच २० जुलै रोजी या पदासाठी मतदान होणार आहे, असे श्रीलंकेच्या प्रसारमाध्यमांनी सभापती महिंदा यापा अभयवर्धने यांच्या हवाल्याने सांगितले आहे. राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानावर आंदोलकांनी कब्जा केला आहे. यानंतर राष्ट्रपतींनी १३ …

Read More »

डिसेंबरपूर्वी सीबीटीचे कामकाज पूर्ण करा : जिल्हाधिकारी

बेळगाव : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत हाती घेण्यात आलेले सीबीटी अर्थात बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम येत्या डिसेंबर पूर्वी वेळेत पूर्ण करावे, अशी सक्त सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बेळगाव शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची आज सोमवारी जिल्हाधिकारी पाटील यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित …

Read More »