बेळगाव : अनगोळमधील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या सभागृहात शनिवारी ता 25 रोजी विद्याभारती बेळगाव जिल्हा संघटनेची वार्षिक बैठक उत्साहात पार पडली. संघटनेच्या नुतन अध्यक्षपदी माधव पुणेकर, तर सचिवपदी सुभाष कुलकर्णी यांची एकमतानी निवड करण्यात आली. या विद्याभारती जिल्हास्तरीय बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून विद्याभारती दक्षिण मध्यक्षेत्र प्रमुख वसंत माधव, …
Read More »समाधी मठातील चाऱ्याला अज्ञातांकडून आग
१२ ट्रॅक्टर चारा बचावला ; पोलिसात तक्रार दाखल निपाणी (वार्ता) : निपाणी- चिकोडी रोडवर असलेल्या समाधी मठामध्ये प्राणलिंग स्वामींच्या नेतृत्वाखाली काही वर्षांपासून गोशाळा सुरू आहे. त्यामुळे गाई साठी शहर व परिसरातील अनेक भाविक देणगी दाखल चारा देत आहेत. पण भाविकांनी दिलेल्या या चाऱ्याला अज्ञात समाजकंटकांनी रविवारी दुपारी दोन वाढण्याचा सुमारास …
Read More »आगामी निवडणुकीत स्थानिक उमेदवारालाच निवडून देऊ; खानापूर कंत्राटदार संघटनेच्या बैठकीत चर्चा
खानापूर (प्रतिनिधी) : गेल्या पाच वर्षाच्या काळात खानापूर तालुक्यातील कंत्राटदाराना डावलून तालुक्या बाहेरील कंत्राटदाराना तालुक्याच्या आमदारानी तालुक्यातील कंत्राटदारांच्यावर अन्याय केला. याचा बदला काढण्यासाठी तालुक्याच्या स्थानिक उमेदवारालाच आगामी विधानसभा निवडणुकीत निवडून आणू. अशी चर्चा रविवारी येथील शिवस्मारक सभागृहात आयोजित खानापूर तालुका सरकारी कंत्राटदार संघटनेच्या बैठकीत झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका सरकारी कंत्राटदार …
Read More »बेळगाव बेकर्स को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या सल्लागारपदी नेताजी जाधव व विनोद हंगीरकर यांची निवड
बेळगांव : येथील सहकार क्षेत्रातील सुवर्ण महोत्सवी संस्था दि. बेळगांव बेकर्स को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या सल्लागारपदी माजी नगरसेवक नेताजी नारायण जाधव आणि मराठा सहकारी बँकेचे संचालक विनोद सदाशिवराव हंगीरकर यांची निवड करण्यात आली आहे. नेताजी जाधव यांनी श्री तुकाराम सहकारी बँकेचे चेअरमन म्हणून सहकार क्षेत्रात कार्य केले आहे तसेच श्री …
Read More »मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे वधू वर महामेळावा उत्साहात
बेळगाव : लग्न जुळविताना इच्छुक वधू व वर तसेच पालकांनी तडजोड केल्यास अडचणी येणार नाहीत, असे प्रतिपादन मराठा समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले. मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे मराठा मंदिर येथे वधू वर महामेळाव्यात श्री. मरगाळे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे शितल वेसणे, कार्याध्यक्ष शिवराज …
Read More »काँग्रेसकडून लिंगायत समाजास प्राधान्य, 32 लिंगायतांना उमेदवारी
विजयपूर : कर्नाटक विधानसभेच्या 224 जागेपैकी काँग्रेस पक्षाच्या वतीने 124 उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये 32 लिंगायत नेत्यांना उमेदवारी देऊन लिंगायत समाजास प्राधान्य दिले आहे. राज्यातील भाजपा सरकारने पंचमसाली लिंगायत समाजाच्या 2 ए मध्ये समावेश न करता 2 डि असे वेगळे कॅटेगरी निर्माण करुन आरक्षण जरी दिले असले …
Read More »श्री रवळनाथ हायस्कूल शिवठाण येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ
खानापूर : श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ येळ्ळुर संचलित श्री रवळनाथ हायस्कूल शिवठाण ता. खानापूर येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. दि. 20/03/2023 रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. महादेव गोपाळ मिराशी अध्यक्ष कृषी पत्तीन सोसायटी घोटगाळी होते. कार्यक्रमाचे …
Read More »दहावी परीक्षेची ३१ मार्चपासून सुरुवात
परीक्षा केंद्रांवर सुविधा बेळगाव : दहावीची परीक्षा अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. शिक्षण खात्याने परीक्षेची तयारी पूर्ण केली आहे. परीक्षा केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना केंद्रप्रमुखांना करण्यात आली आहे. बेळगाव शैक्षणिक. जिल्ह्यातील १२० परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा होणार आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील ३३ हजार १८२ …
Read More »पाचवी, आठवीची बोर्ड परीक्षा उद्यापासून
बेळगाव : पाचवी व आठवीच्या बोर्ड परीक्षेला सोमवार (ता. २७) पासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केले आहे. प्रशिक्षण खात्यानेही परीक्षेची तयारी पूर्ण केली आहे. क्लस्टरनिहाय पेपर तपासणीचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे पेपर झाल्यानंतर शाळांना क्लस्टरवर उत्तरपत्रिका वेळेत द्याव्या लागणार आहेत. शिक्षण खात्याने पाचवी …
Read More »भालके खुर्दला गवतगंजी खाक
खानापूर : भालके खुर्द (ता. खानापूर) येथे शनिवारी सायंकाळी चार वाजता विद्युत वाहिनीच्या डीपीतील शॉर्टसर्किटमुळे गवतगंजीला आग लागली. या घटनेत शेतकरी निंगाप्पा सिमानी अळवणी यांच्या घरापाठी मागील परसात असलेल्या चार ट्रॅक्टर गवतगंजीला आग लागून ३५ ते ४० हजाराचे नुकसान झाले. विद्युत वाहिन्या आणि ट्रान्सफॉर्ममध्ये सतत ठिणग्या उडत असल्याबाबत हेस्कॉमला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta