सौंदलगा : सौंदलगा येथे शेतात बांधलेल्या जनावरांचा निवारा पडून संदीप रवींद्र पाटील यांची म्हैस दगावली. सौंदलगा येथील शेतकरी संदीप पाटील यांनी शेतात जनावरांसाठी अड्डा केला होता. मात्र दोन दिवस जोरात झालेल्या पावसामुळे बांधलेला निवारा पडल्यामुळे एक म्हैस दगावली असून बाकीच्या एक म्हैस व दोन रेडके जखमी झाले आहेत. या पडलेल्या …
Read More »अमरनाथ येथील ढगफुटीतून बेळगावचे दोन भाविक बचावले
बेळगाव : अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीच्या आपत्तीतून सांगलीचे रवींद्र काळेबेरे व बेळगावचे विनोद काकडे हे दोन यात्रेकरू बचावले आहेत. प्रसंगावधान राखत तंबूतून बाहेर पळत सुरक्षित ठिकाणी गेल्याने ते दुर्घटनेतून बचावले. सांगली, कोल्हापूर, शिरोळ, जयसिंगपूर तसेच सातारा, पुणे, बेंगलोर, बेळगाव येथील ५० यात्रेकरूंनी अमरनाथ यात्रा अर्ध्यावर सोडून परतीचा मार्ग धरला आहे, अशी …
Read More »साई ज्योती सेवा संघाकडून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण
बेळगाव : आज स्पंदनवन मक्कळधाम येथे कुमार धीरज दीपक चडचाळ याचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने साई ज्योती सेवा संघाकडून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना ज्योती निलजकर म्हणाल्या की, साई ज्योती सेवा संघ ही नेहमीच सामाजिक बांधिलकी जपून कार्य करणारी संस्था आहे. यावेळी उपसंचालिका ज्योती बाके, …
Read More »राकसकोप जलाशयाच्या पाणी पातळीत 8 फुटाने वाढ
बेळगाव : बेळगाव शहराची तहान भागविणाऱ्या राकसकोप जलाशयाच्या पाणी पातळीत 8 फुटाने वाढ झाली आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे राकसकोप पाठोपाठ हिडकल जलाशयात देखील पाण्याची पातळी वाढलेली पाहायला मिळत आहे. संततधार पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या हिडकल जलाशयात तीन टीएमसीने वाढ झालेली आहे. पाणीपुरवठा मंडळाकडून मिळालेल्या …
Read More »शहापूर, वडगाव, खासबाग भागात डुकरांचा हैदोस; पालिकेचा हलगर्जीपणा
बेळगाव : बेळगाव शहराची वाटचाल स्मार्टसिटीकडे चालू असल्याचे भासवले जात आहे. बेळगावची निवड स्मार्टसिटीमध्ये झालेली आहे. शहराच्या प्रमुख रस्त्यांवर स्वच्छ आणि सुंदर बेळगावच्या दृष्टीने कामही चालू झालेले आहे. मात्र बेळगाव दक्षिणमधील शहापूर, वडगाव, खासबाग या भागाची मात्र उकिरडा सिटी झाली आहे. खासबाग, वडगाव परिसरात बहुतेक ठिकाणी कचरा उघड्यावर पडत आहे. …
Read More »समुदाय भवनासाठी अनुदान सुपूर्द
बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील करडीगुद्दी येथे पंचवीस लाखाच्या अनुदानातून बसवेश्वर मंदिर व समुदाय भवन बांधण्यात येणार आहे. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पहिल्या टप्प्यातील काही रक्कम समुदाय भावनासाठी दिली आहे. दुसऱ्या टप्प्यातील निधी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी मंदिर पंच कमितीकडे धनादेश स्वरूपात सुपूर्द केला आहे. यावेळी तालुका समितीचे …
Read More »कार्ती चिदंरबरम यांच्या निवासस्थानी सीबीआयची छापेमारी
चेन्नई : काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांच्या निवासस्थानी केंद्रीय अन्वेशन ब्युरोने अर्थात सीबीआयने छापेमारी केल्याचे वृत्त आहे. चेन्नई येथील त्यांच्या घरी सीबीआयचे अधिकारी पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या घराची झाडाझडती घेतली. माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांचे ते पुत्र आहेत. यापूर्वीही कार्ती चिदंबरम यांच्याशी संबंधित 9 ठिकाणांवर सीबीआयनं धाडी टाकल्या होत्या. …
Read More »ठरलं! आषाढीची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच करणार, निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील
पंढरपूर : आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर दौर्यावर येत आहेत. मात्र, राज्यात नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली असून मुख्यमंत्र्यांच्या या दौर्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती. त्या विनंतीली निवडणूक आयोगाने परवानगी दिलीये. मात्र तीन अटींसह ती परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सहा …
Read More »बेळगावातील काँग्रेस नेत्यांनी घेतली डी. के. शिवकुमारांची भेट
बेळगाव : बेळगावातील काँग्रेसच्या प्रभावशाली नेत्यांनी आज केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या बंगळुरू येथील निवासस्थानी भेट देऊन सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा केली. बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी आणि आमदार प्रकाश हुक्केरी यांनी आज डी. के. शिवकुमार यांची त्यांच्या बंगळुरू येथील निवासस्थानी भेट घेऊन सध्याच्या …
Read More »150 कराटेपटूंनी दिली डायनॅमिक शोटोकॉन कराटे डू इंडिया आयोजित कराटे बेल्ट परीक्षा
बेळगाव : डायनॅमिक शोटोकॉन कराटे डू इंडिया यांच्यावतीने नुकत्याच कराटे बेल्ट परीक्षा घेण्यात आल्या. चीफ इन्स्ट्रक्टर सिहान नागेश एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदाशिवनगर बेळगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे या बेल्ट परीक्षा घेण्यात आल्या. 150 हून अधिक कराटेपटूंनी या कराटे बेल्ट परीक्षेत भाग घेतला होता. कराटे प्रशिक्षण घेणे ही …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta