Saturday , March 7 2026
Breaking News

Belgaum Varta

आप्पाचीवाडी फाट्यावर मालवाहू ट्रक उलटला

  राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत, सुदैवाने जीवितहानी टळली कोगनोळी :  केरळहून मुंबईकडे आल्ले घेऊन जाणारा मालवाहू ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे पलटी झाला. यामुळे बराच काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. अपघात रविवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील आप्पाचीवाडी फाट्याजवळ घडला. याबाबत घटनास्थळावरुन व …

Read More »

जत्राट – भिवशी पुलाखाली अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

निपाणी (वार्ता) : जत्राट – भिवशी पुलाखाली रविवारी सकाळी ३० ते ३५ वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. हा प्रकार घातपात की आत्महत्या याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. आज सकाळी सातच्या सुमारास नदीकाठच्या परिसरात गेलेल्या नागरिक व शेतकऱ्यांना नदीच्या पाण्याच्या प्रवाहातून अज्ञात मृतदेह वाहून आल्याचा प्रकार दिसून आला. या घटनेची …

Read More »

वडगाव सपार गल्लीत घर कोसळले: सुदैवाने दाम्पत्य बचावले वृद्ध

  बेळगाव : बेळगाव शहरात मुसळधार पावसामुळे घर कोसळल्याची घटना सपार गल्ली येथे घडली असून घरात राहणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्याचा सुदैवानेच जीव वाचला. बेळगाव शहरात गेले काही दिवस सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे शहरातील वडगाव सपार गल्ली येथे एक जुने घर कोसळले. या घटनेत एक वृद्ध जोडपे सुदैवाने बचावले आहेत. …

Read More »

श्रीक्षेत्र खंडोबा मंदिर आदर्श धार्मिक पर्यटनस्थळ बनवणार

  आ. श्रीमंत पाटील ; मंगसुळीत मंदिर जीर्णोद्धारसह साडेचार कोटींच्या विकास कामांचे उद्घाटन अथणी : मंगसुळी गावच्या विकासासाठी तसेच येथील श्री क्षेत्र खंडोबा देवा मंदिरासाठी अधिकाधिक निधी आणून विकास केला जात आहे कर्नाटक महाराष्ट्रसह अन्य राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खंडोबा मंदिर एक आदर्श धार्मिक पर्यटन स्थळ बनवू, असा विश्वास माजी …

Read More »

खानापूर तालुक्यातील मराठी जनतेने आंदोलनास मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

  माजी आमदार दिगंबरराव पाटील यांचे आवाहन खानापूर (प्रतिनिधी) : भाषिक अल्पसंख्याक कायद्याची कर्नाटक सरकारकडून पायमल्ली होत आहे. याची जाणीव करून देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने उद्या 8 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन होणार आहे. या ठिय्या आंदोलनाला खानापूर तालुक्यातील मराठी जनतेने उपस्थित …

Read More »

काटगाळी प्राथमिक शाळेचे क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

  खानापूर : शिक्षण खात्यामार्फत घेण्यात आलेल्या विभागीय केंद्र पातळीवरील प्राथमिक शाळांच्या क्रीडा स्पर्धेत काटगाळी (ता. खानापूर) शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. हत्तरगुंजी प्राथमिक मराठी शाळेच्या मैदानात या स्पर्धा पार पडल्या. कबड्डी स्पर्धेत या शाळेच्या संघाने प्रथम क्रमांक, अडथळा शर्यत धावणे दिया मोहिते हिने प्रथम क्रमांक, शिवम चौगुले याने …

Read More »

बडेकोळमठ क्रॉसजवळ बस उलटून 5 प्रवाशी जखमी

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील बडेकोळमठ क्रॉसजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर सरकारी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती उलटली. बसमध्ये 35 प्रवासी होते. बेळगावहून हिरेकेरूरकडे निघालेल्या बसवरील बडेकोळमठ क्रॉसजवळील उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला उलटली. अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमींना बेळगाव …

Read More »

भारताची महिला बॉक्सर नीतू घणघसने पटकाविले सुवर्णपदक

  बर्मिंघम : भारताची महिला बॉक्सर नीतू घणघसनं महिलांच्या 45-48 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं आहे. तिनं अंतिम सामन्यात इंग्लंडच्या रेस्जटान डेमी जेडचा 5-0 असा पराभव केलाय. नीतू घणघसची दमदार कामगिरी भारतीय महिला बॉक्सर नीतू घणघसनं कॉमनवेल्थ स्पर्धेत महिलांच्या किमान वजन (45-48 किलो) गटात यजमान इंग्लंडच्या रेस्जटान डेमी जेडचा 5-0 …

Read More »

राष्ट्रीय एकतेसाठी मिनी मॅरेथॉन स्पर्धा

  बेळगाव : बेळगाव येथील मराठा लाईट इंन्फट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे शालेय विद्यार्थ्यासाठी मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. मराठा लाईट इंन्फट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी ध्वज दाखवून मिनी मॅरेथॉन स्पर्धेला चालना दिली. बेळगावातील विद्यार्थ्यांमध्ये देशाभिमान आणि देशभक्तीची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले …

Read More »

शिवसेना-शिंदे गटाच्या याचिकेवर आत्ता १२ ऑगस्टला सुनावणी

  नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेऊन सव्वा महिना लोटला तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्ताराचा पत्ता नाही. यावरून विरोधक शिंदे-भाजप सरकारवर सातत्याने निशाणा साधत आहेत. शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळे आता, न्यायालयाचा निर्णय काय येतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. …

Read More »