Friday , October 18 2024
Breaking News

Belgaum Varta

सरकारच्या मार्गसूचीचे पालन करत कोविड महामारीचा समर्थपणे सामना करा : जिल्हाधिकारी हिरेमठ

बेळगाव : बेळगावातील कोविड इस्पितळाच्या समस्यांबाबत जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी बुधवारी खासगी इस्पितळ संघटनेचे पदाधिकारी आणि प्रतिनिधींची बैठक घेतली. सरकारच्या मार्गसूचीचे पालन करत कोविड महामारीचा समर्थपणे सामना करण्यात योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले. बेळगावातील कोविड रुग्णांना दिले जाणारे उपचार, इस्पितळांतील सुविधा, उपचारांसाठी आकारले जाणारे शुल्क व अन्य विषयांवर चर्चा करून …

Read More »

दांडेलीत नकली नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश; ६ जणांना अटक

दांडेली : उत्तर कन्नड जिल्ह्यातील दांडेली ग्रामीण पोलिसांनी मोठी मोहीम राबवून नकली नोटा चलनात आणणाऱ्या रॉकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी ६ जणांना अटक करून लाखो रुपये मूल्याच्या नोटांचा मोठा साठा जप्त केला आहे. दांडेलीतील डीडीएल वनश्री भागातील शिवाजी कांबळे नामक एकाच्या घरातून या नकली नोटा जप्त करण्यात आल्या. ४.५ लाख …

Read More »

कोविड चाचण्यांसाठी गावनिहाय आराखडा तयार करुन तपासण्या वाढवा : जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्णदर व मृत्युदर कमी होण्यासाठी गावनिहाय आराखडा तयार करावा, चांगले काम करीत असलेल्या ग्रामसमित्या व सरपंच यांचे अनुकरण इतर गावांनी करावे, ग्रामस्तरीय अलगीकरण कक्ष स्थापन करावेत, तसेच तपासण्या वाढवून बाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळवून द्यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात …

Read More »

बिम्स संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प अचानक दीर्घ रजेवर

बेळगाव : बेळगावातील बिम्स इस्पितळाला उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी नुकतीच भेट देऊन तेथील गैरकारभाराबाबत ताशेरे ओढले होते. त्यानंतर मुख्यमंत्री येडियुराप्पा बिम्सला लवकरच भेट देणार असल्याचे नियोजन आहे. मात्र या पार्श्वभूमीवर बिम्स संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प अचानक दीर्घ रजेवर गेल्याने उलट–सुलट चर्चेला ऊत आला आहे. कोविड रुग्णांसह अन्य रुग्णांनाही बिम्समध्ये व्यवस्थित …

Read More »

कर्नाटकातील निराधारांना महाराष्ट्रातील पोलिसांचा आधार

कोगनोळी : मत्तीवडे तालुका निपाणी येथील वृद्ध निराधार बेवारस लोकांच्यासाठी कार्यरत असलेल्या भारतीय सेवा वृद्धाश्रमास कागल पोलीस ठाण्याकडून जीवनावश्यक वस्तूंची मदत नुकतीच देण्यात आली. यामुळे महाराष्ट्रातील पोलिसांचा भारतीय सेवा संघ येथील निराधारांना आधार मिळाल्याची चर्चा आता सर्वत्र सुरू आहे.मत्तीवडे तालुका निपाणी येथील वृद्धाश्रमात सध्या दहा वृद्ध लोक राहत असून त्या …

Read More »

‘बिम्स’ला येणारे सर्व रस्ते अचानक बंद; नागरिकांना मनस्ताप

बेळगाव : बेळगावात चन्नम्मा सर्कल, बिम्स इस्पितळाकडे येणारे डॉ. आंबेडकर रोडसह सर्व रस्ते बुधवारी सकाळी पोलिसांनी अचानक बंद केले. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना इच्छित स्थळी पोहोचताना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऍम्ब्युलन्स चालकांनाही यामुळे बिम्सकडे जाताना अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागली. बेळगावातील चन्नम्मा चौक ते के एल ई …

Read More »

सीबीएसई बोर्डाच्या १२ वीच्या परीक्षा रद्द!

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या १२ वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. आज (दि. १) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.बोर्ड परीक्षांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीत आज (दि. १) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बारावीची …

Read More »

बांधकाम विभाग कोरोना ड्युटीत, अनेक कामे प्रलंबित

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड मधील अनेक कर्मचाऱ्यांच्या कोरोना कामाकडे ड्यूट्या लावल्या आहेत. याचा परिणाम बांधकाम विभागाची अनेक कामे प्रलंबित आहेत.वेगवेगळ्या फंडातून तालुक्यातील अनेक गावात विविध कामे मंजूर झाल्याचे जाहिर करण्यात आले आहे. पण या कामांच्या पुर्ततेसाठी इतर कागदपत्रे पूर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी अनेक जन …

Read More »

कोविड सेंटर लोकार्पण सोहळा संपन्न

चंदगड (प्रतिनिधी) : कोरोना महामारीमुळे संपूर्ण जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी अंजुमन–ए–इस्लाम चॅरिटेबल ट्रस्ट चंदगडच्यावतीने लोकनेते स्वर्गीय नामदार बाबासाहेब कुपेकर कोविड विलिगीकरण कक्ष लोकार्पण सोहळा कोरोना बाबतीतचे सर्व नियम पाळून संपन्न झाला. यावेळी प्रातांधिकारी विजया पांगारकर, नगराध्यक्ष सौ. प्राची दयानंद काणेकर, शिवसेना जिल्हा संघटक संग्रामसिंह कुपेकर …

Read More »

जिल्ह्यात ब्लॅक फंगसचे ८७ रुग्ण; मुलांत लक्षणे नाहीत : जिल्हाधिकारी हिरेमठ

बेळगाव : जिल्ह्यात २ दिवसांत ब्लॅक फंगसचे १७ नवे रुग्ण आढळून आले होते. आजवर त्यांची एकूण संख्या ८७ झाली आहे. मात्र जिल्ह्यातील एकाही मुलामध्ये अद्याप ब्लॅक फंगसची लक्षणे आढळून आलेली नाहीत असे जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी मंगळवारी स्पष्ट केले. बेळगावात मंगळवारी आपल्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी सांगितले की, …

Read More »