संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर राणी चन्नम्मा सर्कल ते डॉ. हावळ इस्पितळापर्यंतचा जुना पुणे-बेंगळूर रस्ता चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. नुकतीच माजी खासदार रमेश कत्ती यांनी चौपदरी रस्ता कामाची पहाणी करुन रस्ता शेजारच्या गटारीचे काम व्यवस्थित करण्याचा आदेश रस्ता निर्माण ठेकेदाराला दिला. रस्त्यावर कसलेच अतिक्रमण असता कामा नये असे त्यांनी बजावून …
Read More »खानापूर समितीकडून तालुक्यात ‘एक सीमावासी लाख सीमावासी’ मोर्चाची जोरदार जनजागृती
खानापूर : तालुका खानापूर समितीकडून तालुक्यात ‘एक सीमावासी लाख सीमावासी’ मोर्चाची जोरदार जनजागृती- खानापूर अध्यक्ष गोपाळ देसाई, देवाप्पना गुरव, गोपाळ पाटील, निरंजन सरदेसाई आणि युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील, दत्तू कुट्रे, राजू पाटील, राजाराम देसाई, किशोर हेब्बाळकर यांनी घेतली जनजागृती मोहिमेत आघाडी घेऊन संपूर्ण तालुका 27 जूनच्या महामोर्चासाठी पिंजून काढला. …
Read More »संकेश्वरात संजय थोरवत याचा विहिरीत बुडून मृत्यू
संकेश्वर (प्रतिनिधी) : निडसोसी रस्ता येथील रहिवासी संजय वेंकटेश थोरवत (वय ५५) याचा विहिरीत पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली आहे. याविषयी समजलेली माहिती अशी संजय थोरवत हा व्यसनाधीन होता. काल रात्री तो निडसोसी रस्ता लगत असलेल्या जाधव यांच्या विहिरीच्या कट्ट्यावर बसलेला असताना कलंडून पाण्यात पडून बुडून मृत्यू …
Read More »केएलईच्या नेत्रतपासणी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद
१०२ रुग्णांची तपासणी : सोमवारी मेंदू, मणक्यांसाठी शिबिर निपाणी (वार्ता) : केएलई संस्थेचे संस्थापक डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पीटल मेडिकल रिसर्च सेंटर, बेळगाव, केएलई आरोग्य सेवा केंद्र आणि रोटरी क्लब निपाणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत आरोग्य तपासणी शिबीरास रूग्णांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रोटरी क्लबच्या इमारतीत पार पडलेल्या मोफत नेत्र तपासणी …
Read More »पेरणीसाठी बैलांची ॲडव्हान्स बुकींग…
संकेश्वर (महंमद मोमीन) : आर्द्रा नक्षत्र काळात बरसणारा पाऊस खरीप पेरणीला पोषक ठरलेला दिसतो आहे. गेल्या दोन दिवसांपासून शेतकऱ्यांची खरीप पेरणीसाठी धांदल उडालेली दिसत आहे. शेतीच्या कामांसाठी ट्रॅक्टरचा वापर अधिक होत गेला तशी बैलांची संख्या बऱ्याच प्रमाणात घटलेली दिसत आहे. त्यामुळे उपलब्ध बैल जोडीला पेरणीसाठी मोठी मागणी दिसत आहे. मृग …
Read More »शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ६ ठराव मंजूर; बंडखोरांवर कारवाई करण्याचे सर्वाधिकार उद्धव ठाकरेंना
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर कायदेशीर लढाई सुरू झाली असून, शिवसेनेने शनिवारी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलवत पुढच्या लढाईच्या दृष्टीने सहा महत्त्वाचे ठराव मंजूर केले. या ठरावानुसार बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याचे संपूर्ण अधिकार हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीने दिले आहेत. बैठकीनंतर बंडखोरांवर संध्याकाळपर्यंत कारवाई होईल, असे संकेत संजय …
Read More »आम्ही शिवसेना सोडलेली नाही, आमच्याकडेच दोन तृतीयांश बहुमत : दीपक केसरकर
गुवाहाटी : आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो, असे भासवले जात आहे; परंतु आम्ही सर्वजण आजही शिवसेनेत आहोत, आम्ही पक्ष सोडलेला नाही. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हेच आमचे नेते आहेत. आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत असल्याचा दावा शिवसेनेचे बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज (दि.२५) पत्रकरांशी संवाद साधताना केला. नोटीस पाठवून …
Read More »मुडलगीतील ते भ्रूण आपलेच : खासगी इस्पितळाची कबुली
बेळगाव : मुडलगीत भरण्यांत घालून नाल्यात टाकलेले ते ७ भ्रूण आपल्याच इस्पितळातील असल्याची कबुली मुडलगी येथील कनकरेड्डी इस्पितळाने दिली असल्याचे समजते. बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी येथील बसस्थानकाजवळील नाल्यात काल, शुक्रवारी भरण्यात भरून टाकलेले ७ भ्रूण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे सर्व भ्रूण ५ महिने पूर्ण झालेले आहेत. जिल्हा आरोग्य …
Read More »बृहत् मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
बेळगाव : केएलई विश्वविद्यालय, डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालय व वैद्यकीय संशोधन केंद्र, जे. एन. मेडिकल कॉलेज बेळगाव आणि अनिल बेनके फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या नेतृत्वाखाली उत्तर मतदार संघात आयोजित बृहत् मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचा आज शनिवारी दुपारी उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. रुक्मिणीनगर …
Read More »येळ्ळूर विभाग समितीच्यावतीने 27 जूनच्या मोर्चाचे आवाहन
बेळगाव : येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 27 जून रोजी होणाऱ्या मोर्चात हजारोंच्या संख्येने सामील व्हा, असे आवाहन करण्यात आले आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगांवच्या वतीने येत्या सोमवारी 27 रोजी इतर भाषेबरोबर मराठी कागदपत्रे देण्याच्या संदर्भात मुदत दिली होती ती मुदत संपली आहे. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीने प्रशासनाला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta