Friday , November 6 2026
Breaking News

सर्वदा सोसायटीच्या अध्यक्षपदी सचिन पुरोहित तर उपाध्यक्षपदी धनंजय पाटील

Spread the love

 


बेळगाव : गोंधळी गल्ली येथील सर्वदा मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक गेल्या दि. 24 जुलै रोजी बिनविरोध झाली. सामान्य व अनुसूचित जाती यामधील अर्ज मागे घेतल्याने बिनविरोध निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला.
यामध्ये संचालक म्हणून सचिन के. पुरोहित, धनंजय रा. पाटील, रमेश वाय. पाटील, बाबू एम. पावशे, श्रीनाथ पी. बेळवडी, राहुल डी. बेदरे, संजय जी. पाटील, संतोष ना. आर्कसाली, चंद्रकांत ई. मेलगे, अनंत डी. पावशे, रूपा स. साखरे व शितल सो. शंभुचे यांची संचालकपदी निवड झाली. तसेच 1 ऑगष्ट रोजी संस्थेच्या सभागृहात अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूकसुद्धा बिनविरोध झाली. यामध्ये अध्यक्षपदी श्री. सचिन के. पुरोहित तर उपाध्यक्षपदी श्री. धनंजय रा. पाटील यांची निवड करण्यात आली.
यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून सहकार खात्याचे श्री. सतीश मुसंडी यांनी काम पाहिले. यावेळी सहकार खात्याचे स्पेशल ऑफिसर श्री. हरीश के. हे सद्धा उपस्थित होते. नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच दोन्ही अधिकाऱ्यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी संस्थेचे सेक्रेटरी श्री. मोहन कोचेरी, शाखा व्यवस्थापक श्री. राजू मुतकेकर, संतोष लासे, पल्लवी कणबरकर, संगीता कुंडेकर व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *