मुंबई : शिवसेनेला आता आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव आता नॉट रिचेबल झाले आहेत. भास्कर जाधव यांचा फोन लागत नसल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण झाले आहे. भास्कर जाधव सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ …
Read More »कुत्र्याच्या वाढदिनी घातले गाव जेवण, अन् शंभर किलोचा कापला केक
बेळगाव : ग्राम पंचायतीच्या राजकारणातून एका माजी ग्राम पंचायत सदस्याने ग्रा. पं. सदस्याला शह देण्यासाठी चक्क आपल्या लाडक्या कुत्र्याचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. त्यानिमित्त हजारो जणांना गाव जेवण घातले. एक क्विंटलचा केक कापला. गावकर्यांसाठी तीन क्विंटल चिकन, हजारो अंडी, अर्धा क्विंटल काजूकरीचा बेत करण्यात आला होता. वाढदिवसानिमित्त तीन हजारहून अधिक …
Read More »12 आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची शिवसेनेची विधानसभा उपाध्यक्षांकडे मागणी
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीचं सरकार धोक्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी 40 पेक्षा जास्त आमदारांना सोबत घेत बंड पुकारलेय. बंडखोर आमदार सूरत मार्गे गुवाहटीला पोहचले आहेत. गुरुवारी एकनाथ शिंदे यांनी बंडाला भाजपचा पाठिंबा असल्याचं जाहीर केले. त्यानंतर आता राजकीय हलचालींना वेग आलाय. शिवसेनेकडून बंडखोर आमदारांवर कारवाई …
Read More »कावळेवाडी वाचनालयतर्फे शैक्षणिक साहित्याचे वितरण
बेळगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व वाचनालयतर्फे गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले. यावेळी अध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत मौलिक विचार व्यक्त केले. ते म्हणाले, विद्यार्थी हाच देशाचा खरा शिल्पकार आहे. गाव, देश, गुरु, आईवडील यांना कधीच विसरू नका. सातत्याने अभ्यास करा. पुस्तके …
Read More »उमेश कत्तींची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा
सिद्धरामय्या, स्वतंत्र उत्तर कर्नाटकाच्या मागणीला विरोध बंगळूर : विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी गुरुवारी राज्याचे आहार व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री उमेश कत्ती यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली. कत्ती यांनी राज्याचे विभाजन करण्याचे विधान जारी केले आहे, हे आक्षेपार्ह असल्याचे ते म्हणाले. या संदर्भात त्यांनी ट्विट करून म्हटले आहे, की …
Read More »शिवसेनेचे आमदार महाराष्ट्रात परतल्यानंतर बहुमत सिद्ध करू : शरद पवार
मुंबई : महाविकास आघाडीने अडिच वर्षे चांगले कारभार केला आहे. सध्याची वस्तूस्थिती नाकारता येत नाही. मात्र महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले नेते इथे आल्यानंतर वस्तूस्थिती मांडतील, असे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. आमदार महाराष्ट्रात आल्यानंतर समजेल की महाविकास आघाडी सरकार बहुमतात आहे. अशी स्थिती महाराष्ट्रात अनेक वेळा बघितली. हे सरकार …
Read More »महाराष्ट्राची अब्रू एकनाथ शिंदेनी गुजरातच्या वेशीवर टांगली…!!!
शिवसेनेची जडणघडण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामान्य शिवसैनिक केंद्रस्थानी ठेवून केलेली आहे. शिवसेनेच्या मातोश्रीवर, सेना भवनात सामान्य शिवसैनिकाचा वावर सहज असतो. नेत्यांपेक्षा कार्यकर्ता मोठा हे कायमचं तत्व शिवसेनेत आहे. त्यामुळेच तळागाळातला शिवसैनिक थेट शिवसेनेशी कायमचाच बांधला गेलेला असतो. त्याला कोणत्याही नेत्याची आवश्यकता लागत नाही. आजवर याची प्रचिती अनेक वेळा आली …
Read More »हेब्बाळ ग्राम पंचायत पीडिओ आरती अंगडी यांच्या बदलीची मागणी
खानापूर : हेब्बाळ ग्राम पंचायत पीडिओ आरती अंगडी यांच्या बदलीची मागणी ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सभासदांनी मिळून केली आहे. पीडिओ आरती अंगडी या मनमानी कारभार करतात. कोणत्याही प्रकारची सूचना न देता स्वतः पुढाकार घेऊन अंगणवाडी साहित्य, पवित्र होमसाठी लागणारे साहित्य आणि इतर साहित्य खरेदी केले आहे. याबद्दल ग्रामपंचायत अध्यक्ष …
Read More »शिंदेसेनेला भाजपचा पाठिंबा, एकनाथ शिंदेंकडून मान्य!
गुवाहाटी : एका राष्ट्रीय पक्षाचा आपल्याला पाठींबा असल्याचं एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांना सांगितलं. बंडखोरी करणाऱ्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांची एकमताने गटनेतेपदी निवड केली आहे. त्यानंतर आमदरांशी बोलताना त्यांनी एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याचं सांगितले. कुठेही कमी पडणार नाही.. असे सांगितले. कुठेही काही लागलं तरी कमी पडणार नाही, असा शब्द …
Read More »हलशीवाडी येथे खानापूर समितीची मोर्चाबाबत जनजागृती
खानापूर : मराठी भाषिकांच्या न्याय हक्कांसाठी लढण्यासाठी रस्तावर उतरण्याची तयारी सर्वांनी करावी, असे प्रतिपादन खानापूर तालुका समितीचे पदाधिकारी गोपाळ पाटील यांनी केले. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे २७ जुन रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चाबाबत गुरुवारी हलशीवाडी, हलगा, हलशी आदी गावांमध्ये जनजागृती बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी रघुनाथ देसाई होते. यावेळी तालुका समितीचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta