Saturday , March 7 2026
Breaking News

Belgaum Varta

सौंदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी गावात बिबट्याचा वावर

  सौंदत्ती : सौंदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी गावात जमिनीवर बिबट्याच्या पायाचे ठसे आढळल्याची घटना घडली. बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आल्याने आजूबाजूच्या ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. हे वृत्त समजताच सौंदत्ती विभागीय वन अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याच्या पायाचे ठसे शोधून काढले. तसेच, एक विशेष पथक तयार करण्यात आले असून वनविभागाचे कर्मचारी सौंदत्ती …

Read More »

खानापूर गटशिक्षणाधिकारीपदी राजश्री कुडची

  खानापूर : खानापूर तालुका गटशिक्षणाधिकारी पदी राजश्री कुडची यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण यकुंडी यांची अन्यत्र बदली झाल्याने श्रीमती कूडची यांची नियुक्ती झाली आहे. श्रीमती कुडची यांनी यापूर्वी नरगुंदमध्ये गटशिक्षणाधिकारी म्हणून सेवा बजावली आहे.

Read More »

निपाणी परिसरात सिद्धोजीराजेंची पुण्यतिथी विविध उपक्रमांनी

 निपाणी : निपाणी नगरीचे जनक श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर सरकार यांची पुण्यतिथी शहर व परिसरात विविध उपक्रमांनी करण्यात आली. येथील नगरपालिकामध्ये श्रीमंत सिद्धोजीजीराजे निपाणकर यांची पुण्यतिथी गांभीर्याने करण्यात आली. प्रारंभी नगराध्यक्ष   जयवंता भाटले व उपानगरध्यक्ष नीता बागडे यांच्या हस्ते नगरपालिकेतील सभागृहामधील प्रतिमेचे पूजन झाले. त्यानंतर निपाणकर घराण्याचे वंशज श्रीमंत दादाराजे निपाणकर …

Read More »

जायंटस ग्रुप ऑफ बेलगाम प्राइड सहेलीतर्फे बाईक रॅली

  बेळगाव : जायंटस ग्रुप ऑफ बेलगाम प्राइड सहेली यांनी बेळगावमध्ये वाढते प्रदूषण बघून आज कॉलेज रोडपासून संभाजी चौक सर्कल पर्यंत बाईक रॅली काढली. प्रत्येकाने आपल्या बाईकवर सेव पल्युशन बॅनर लावले होते. बाईक रॅलीची सुरुवात अतुल पुरोहित‌ पासून केली व सांगता संभाजी चौकात झाली. सुरुवातीला प्रार्थना झाली. बाईकमुळे होणारे प्रदूषण …

Read More »

सक्षम जाधव वाढदिनी आयोजित गोल्डन स्क्वेअर बुद्धीबळ स्पर्धेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

  बेळगाव : बुद्धीबळ, स्केटिंग, कराटे, क्रिकेट अशा विविध खेळांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविलेल्या सक्षम जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ अकादमी विशेष एकदिवसीय जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भाग्यनगर येथील गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ अकादमीच्या सभागृहात फिडे तसेच एआयसीएफच्या नियमांनुसार स्विस लीग पद्धतीने ही स्पर्धा खेळविण्यात …

Read More »

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न

पंकज पाटील : हायस्कूल येथे अंडी, केळी वितरण कोगनोळी : माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हायस्कूल येथील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चेअरमन प्रीतम पाटील व संचालक मंडळ यांच्यासह कर्मचारी सदैव प्रयत्नशील आहेत. शासनाकडून मिळणाऱ्या विविध योजना विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. असे मनोगत माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील …

Read More »

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठीचा उपक्रम स्तुत्य

नगराध्यक्ष जयवंत भाटले : हरी नगर शाळेत अंडी, केळी वाटप निपाणी (वार्ता) : विद्यार्थ्यांना बुधवारपासून शाळेतून अंडी, केळी व चिक्की देण्यात येत आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात ४५ दिवस वितरण होणार आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील कुपोषणाची समस्या दूर होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राबवलेला …

Read More »

भारताचा वेस्ट इंडीजवर 119 धावांनी मोठा विजय, 3-0 ने मालिका जिंकत दिला व्हाईट वॉश

  पोर्ट ऑफ स्पेन : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना भारताने तब्बल 119 धावांनी जिंकत मालिकाही 30 च्या फरकाने जिंकली आहे. विशेष म्हणजे 1983 पासून प्रथमच भारताने वेस्ट इंडीजला त्यांच्या मायभूमीत व्हाईट वॉश दिला आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी घेतली. तुफान फटकेबाजीनंतरही पावसाच्या व्यत्ययामुळे …

Read More »

सुळगा (हिं) रोडवरील अंबिका लॉजवर धाड; 4 जण ताब्यात

  बेळगाव : बेळगावात एका लॉजवर धाड टाकून पोलिसांनी वेश्या व्यवसायात असणाऱ्या चौघांना अटक केली आहे. महिला पोलीस स्थानकाच्या टीमने सुळगा हिंडलगा रोडवरील अंबिका लॉजिंग आणि बोर्डिंगवर धाड टाकून वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या चौघांना गजाआड केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिला पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने लॉजिंगवर …

Read More »

पोषण अभियान योजनेची योग्य अंमलबजावणी करण्याची जबाबदारी : आमदार लक्ष्मी हेब्बाळकर

  बेळगाव : प्रधानमंत्री पोषण निर्माण अभियानांतर्गत माध्यान्ह न्याहरी योजनेंतर्गत शालेय मुलांना अंडी, केळी आणि शेंगदाणा चक्की वाटपाचा शुभारंभ आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील निलजी गावातील शासकीय मराठी प्राथमिक शाळेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना हेब्बाळकर म्हणाले की, शिक्षणासोबतच माध्यान्ह न्याहरीमुळे मुलांमधील …

Read More »