Sunday , July 26 2026
Breaking News

निपाणी परिसरात सिद्धोजीराजेंची पुण्यतिथी विविध उपक्रमांनी

Spread the love
 निपाणी : निपाणी नगरीचे जनक श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर सरकार यांची पुण्यतिथी शहर व परिसरात विविध उपक्रमांनी करण्यात आली.
येथील नगरपालिकामध्ये श्रीमंत सिद्धोजीजीराजे निपाणकर यांची पुण्यतिथी गांभीर्याने करण्यात आली. प्रारंभी नगराध्यक्ष   जयवंता भाटले व उपानगरध्यक्ष नीता बागडे यांच्या हस्ते नगरपालिकेतील सभागृहामधील प्रतिमेचे पूजन झाले. त्यानंतर निपाणकर घराण्याचे वंशज श्रीमंत दादाराजे निपाणकर व विजयराजे निपाणकर यांच्या हस्ते नगरपालिके समोरील पुतळ्याचे पूजन झाले. यावेळी  माजी सभापती सद्दाम  नगारजी, नगरसेवक संतोष सांगावकर, उदय नाईक, नगरसेविका उपासना गारवे, सोनाली उपाध्ये, दिपाली गिरी, आशा टवळे, विजय टवळे, रवी कदम, महेश सूर्यवंशी, शरद सावंत, एस. राजकुमार, सोमा पाळले, कविता कांबळे, तमसम  जमादार, उत्तम चव्हाण, सुनील कांबळे उपस्थित होते.
ममदापूर (के एल) येथे श्रीमंत सिध्दोजीराजे निपाणकर यांनी स्थापन केलेल्या प्रति तुळजाभवानी मंदिरामध्ये पुजारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्रीमंत सिध्दोजीराजे निपाणकर यांची पुण्यतिथी झाली. पुजारी सुरेश पुजारी यांनी श्रीमंत निपाणकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रमोद पुजारी यांनी  स्वागत केले.  कार्यक्रमास युवराज बगाडे, बसवराज यादव, मलगोंडा पाटील, दादासो पाटील, प्रमोद पुजारी, ओमकार पुजारी, शरद पुजारी, आप्पासाहेब पुजारी, राजू पुजारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *