Sunday , July 26 2026
Breaking News

सुळगा (हिं) रोडवरील अंबिका लॉजवर धाड; 4 जण ताब्यात

Spread the love

 

बेळगाव : बेळगावात एका लॉजवर धाड टाकून पोलिसांनी वेश्या व्यवसायात असणाऱ्या चौघांना अटक केली आहे.

महिला पोलीस स्थानकाच्या टीमने सुळगा हिंडलगा रोडवरील अंबिका लॉजिंग आणि बोर्डिंगवर धाड टाकून वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या चौघांना गजाआड केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिला पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने लॉजिंगवर धाड टाकून अनेक तरुणी आणि महिलांची सुटका देखील केली आहे.

वेश्या व्यवसाय चालवत असल्या प्रकरणी सोमनाथ गवळी रा. गवळी गल्ली बेळगाव, राहुल पाटील रा. शिवाजी गल्ली कंग्राळी के एच, रमेश तारिहाळ रा. मारिहाळ, मयूर पाटील रा. कंग्राळी के एच यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी महिला पोलीस स्थानकात तक्रार नोंद करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *