बंगळूर : अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला, तीव्र निवडणूक हालचाली आणि राजकीय दबावादरम्यान अंमलबजावणी संचालनालयाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना पुन्हा नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये शिवकुमार यांना २२ फेब्रुवारीपर्यंत सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना डी. के. शिवकुमार म्हणाले की, आमच्या मुलींच्या शैक्षणिक संस्थेला नोटीस मिळाली आहे. …
Read More »बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने 67 हुतात्म्यांना अभिवादन
बेळगाव : 1969 मध्ये मुंबई येथे झालेल्या सीमा आंदोलनात बलिदान दिलेल्या 67 हुतात्म्यांना बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने आज बुधवारी सम्राट अशोक चौक येथे अभिवादन करण्यात आले. प्रारंभी जिल्हा प्रमुख शिरोळकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे आदींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन …
Read More »महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्षपदी अंकुश केसरकर
सरचिटणीस पदी श्रीकांत कदम यांची फेरनिवड बेळगाव : मागील कार्यकरणीचा कार्यकाळ समाप्त झाल्यामुळे नवीन कार्यकारिणी निवडीचा निर्णय घेण्यात आला व अध्यक्षपदी श्री. अंकुश अरविंद केसरकर व सरचिटणीसपदी श्रीकांत कदम यांची एकमताने निवड करण्यात आली. अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर अंकुश केसरकर यांचा सत्कार नगरसेवक शिवाजी मंडोळकर व युवा नेते शुभम …
Read More »खानापूर समितीतर्फे मराठी आणि सीमाप्रश्नी जनजागृती अभियान
खानापूर : समितीच्या प्रवाहात मराठी भाषिकांना पुन्हा आणण्यासाठी खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीने सीमाप्रश्न आणि मराठीसंदर्भात जनजागृती मोहीम राबविली. निवडणूक जवळ आली कि विविध प्रकारची आमिषे दाखवून राष्ट्रीय पक्ष मराठी भाषिकांना समितीपासून तोडण्याचे प्रयत्न करत आहेत. राष्ट्रीय पक्षांचा कुटील डाव वेळीच हाणून पाडण्यासाठी मराठी भाषिकांनी सजग राहावे, असे आवाहन तालुका …
Read More »कणबर्गी येथील श्री सिद्धेश्वर देवस्थान येथे भाविकांसाठी मूलभूत गरजांची पूर्तता : आमदार अनिल बेनके
बेळगाव : दिनांक 08 फेब्रुवारी 2023 रोजी बेळगाव उत्तर मतक्षेत्राचे आमदार अनिल बेनके यांनी कणबर्गी येथील श्री सिद्धेश्वर देवस्थान येथे भेट दिली व आश्वासनानुसार कणबर्गी गाव ते श्री सिद्धेश्वर मंदिरापर्यंत पाण्याची लाईन टाकण्यात आली आहे. रहिवाशांच्या मागणीनुसार देवस्थान ट्रस्ट कमिटी आणि देवस्थानच्या प्रवेशद्वारावर काँक्रीटची उभारणी, पथदिवे बसवणे, भाविकांच्या वापरासाठी …
Read More »समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांच्याकडून खेळाचे प्रशिक्षण
बेळगाव : समाजसेविका माधुरी जाधव-पाटील यांनी हिंदवाडी येथील आदर्श विद्यामंदिर मधील विद्यार्थ्यांसाठी कब्बडीचे प्रशिक्षण आयोजित केले आहे. आठवी ते दहावी मधील विद्यार्थ्यांसाठी सदर खेळाचे प्रशिक्षण माधुरी जाधव-पाटील यांनी देत आहेत. मुलांनी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सुदृढ राहावे, तसेच क्रीडा प्रकारात प्राविण्य मिळवावे, या दृष्टिकोनातून त्यांनी हे प्रशिक्षण देण्याचा निर्णय …
Read More »श्री सप्तकोटेश्वर मंदिराचा लोकार्पण सोहळा
बेळगाव (प्रतिनिधी) : श्री सप्तकोटेश्वर देवस्थान समिती नार्वे डिचोली गोवा पुरातन खाते गोवा सरकार यांच्या वतीने गुरुवार दि. 9 फेब्रुवारी ते शनिवार दि. 11 फेब्रुवारी पर्यंत श्री सप्तकोटेश्वर मंदिराचा लोकार्पण सोहळा या कालावधीत संपन्न होत आहे. गुरुवार दि. 9 फेब्रुवारी पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध, आचार्यवरण, देवतास्थापना, मुख्यदेवता, भवानी शंकर श्री …
Read More »येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ शनिवारी
येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने रविवार (ता. 19) फेब्रुवारी रोजी होणाऱ्या 18 व्या येळ्लूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचा मुहूर्तमेढ रोवण्याचा कार्यक्रम शनिवार (ता.11) रोजी सकाळी 8-30 वाजता परमेश्वर नगर येळ्ळूर येथील मराठी मुलांची शाळा येळ्ळूरवाडीच्या पटांगणात होणार आहे. 18 व्या येळ्लूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ …
Read More »खानापूर नगरपंचायतीच्या बैठकीत विविध विषयावर चर्चा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीच्या सर्वसाधारण बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष नारायण मयेकर होते. बैठकीला स्थायी कमिटीचे चेअरमन प्रकाश बैलूरकर, चीफ ऑफिसर आर. के. वटार होते. प्रास्ताविक प्रेमानंद नाईक यांनी केले. यावेळी बैठकीत खानापूरशहराच्या एस सी एस टी स्मशानभूमीत विद्युत खांबाची सोय करण्याबाबत चर्चा …
Read More »ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर
मुंबई : ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली. अध्यात्म, समाज प्रबोधन, सामाजिक कार्य, अंधश्रद्धा निर्मूलन यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत राज्य सरकारनं पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर केला आहे. ज्येष्ठ निरुपणकार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta