बेळगाव : येळ्ळूर येथील सिद्धेश्वर गल्लीपासून सुरु असलेला नाला बरीच वर्षे अतिक्रमण व अस्वच्छ होता. यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत होते. हा नाला अवचारहट्टी रोड पासून सुरु होऊन लक्ष्मी तलावाला येऊन मिळतो आणि तेथून तो नाला सिद्धेश्वर गल्लीतून पुढे शेतीतुन जाऊन मच्छे जवळील रेल्वेलाईन पर्यंत होता. पण येळ्ळूर पासून …
Read More »मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी शिवकुमार यांना दिल्ली न्यायालयाचे समन्स
शिवकुमारांच्या अडचणीत वाढ, निवडणुक लढविण्यातही अडचणी शक्य बंगळूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि इतरांवरील आरोपपत्राची दखल घेत दिल्ली न्यायालयाने मंगळवारी २०१८ मध्ये त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात समन्स बजावले. विशेष न्यायाधीश विकास धुल्ल यांनी शिवकुमार याना १ जुलै रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले. शिवकुमार आणि इतरांविरुद्ध ईडीने …
Read More »जुना गोटूर बंधारला दे-धक्का….
पाच महिन्यानंतर कारवाई संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर हिरण्यकेशी नदीवरील जुना गोटूर बंधार हटविणेची मागणी भारतीय किसान संघाने गेल्या पाच महिन्यांपासून चालविली होती. त्याची दखल घेत हुक्केरी मतक्षेत्राचे आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी गोटूर बंधार हटविणेसाठी विशेष निधी मंजूर करुन देण्याबरोबर गोटूर बंधार हटाविणेचे …
Read More »शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देणार : राजू पोवार
निपाणीत रयत संघटनेचा रास्ता रोको निपाणी (विनायक पाटील) : शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढणारे नेते अथवा कार्यकर्त्यावर अन्याय झाल्यास रयत शेतकरी संघटना कधीही शांत बसणार नाही. प्रसंगी रस्त्यावर उतरून जाब विचारला जाईल, असा इशारा चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी दिला. शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय नेते राकेश टिकैत यांच्यावर ३०० …
Read More »राज्याच्या नियोजनबद्ध अंमलबजावणीने योजना सर्वदूर पोहचल्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोल्हापूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी उपमुख्यमंत्र्यांनी साधला संवाद कोल्हापूर (जिमाका) : योजना केंद्राच्या असोत किंवा राज्यांच्या असोत, त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी राज्याच्या यंत्रणेचे मोठे योगदान असते. हे प्रयत्न पक्षभेद विसरून आणि राजकारणविरहित झाले पाहिजेत. मला आनंद व समाधान आहे की, या योजना राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर प्रशासकीय यंत्रणेने नियोजनपूर्वक लाभार्थींपर्यंत यशस्वीरित्या पोहचविल्या …
Read More »मराठी भाषिकांनी समितीच्या झेंड्याखाली एकत्र येणे गरजेचे : ज्येष्ठ सीमासत्याग्रही नारायण लाड
खानापूर : सीमालढा अंतिम टप्प्यात असताना तालुक्यातील जनतेने एकजुटी दाखवून दिली पाहिजे. त्यासाठी सर्व मराठी भाषिक जनतेने समितीच्या झेंड्याखाली एकत्र येणे गरजेचे आहे. तसेच खानापूर समितीने एक सक्षम अध्यक्ष निवडावा ज्याला सीमाप्रश्नाचा सखोल अभ्यास असला पाहिजे. न्यायालयीन कामकाजाचा अभ्यास आहे. मराठी भाषिकांच्या समस्या परखडपणे मांडणारा त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील नेत्यांच्या संपर्कातला संघटक …
Read More »नाशिकमध्ये साधूंचा राडा
नाशिक : किष्किंदाचे मठाधिपती गोविंदानंद स्वामी सरस्वती यांनी हनुमानाच्या जन्मस्थळावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हा विषय लावून धरला. यानंतर त्यांना त्र्यंबकेश्वरच्या ग्रामस्थांनी आणि साधूसंतांनी विरोध केला आहे. दरम्यान, या वादावर चर्चा करण्यासाठी आज शास्त्रार्थ सभा बोलावण्यात आली. त्यासाठी देशभरातील धर्म प्रतिनिधी नाशकात दाखल झाले आहेत. मात्र, यावेळी आसन व्यवस्थेवरून वादाला तोंड …
Read More »मुख्तार अब्बास नक्वी यांचे राज्यसभेचे तिकीट कापले
लोकसभेसाठी संधी दिली जाण्याची शक्यता नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने राज्यसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशातील दोन उर्वरित जागांसाठीचे उमेदवार घोषित केले असून, केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांचे तिकीट कापण्यात आले आहे. केंद्रात मंत्रीपदावर राहण्यासाठी नक्वी यांना राज्यसभा किंवा लोकसभा सदस्य असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर रामपूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत …
Read More »खानापूर तालुक्यातील दुर्गम गावांना रस्ते करून द्या : धनश्री सरदेसाई-जांबोटकर
खानापूर : खानापूर तालुक्यातील घनदाट जंगलातील गावांना रस्ता तयार करण्याचे आवाहन भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य धनश्री सरदेसाई-जांबोटकर यांनी जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना केले. खानापूर तालुक्यातील दुर्गम गावांना चांगले रस्ते नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच ग्रामस्थांना प्रवास करण्यास त्रास होत आहे. खानापूर-गोवा रस्त्यापासून चापगाव 5 किमी., पाली 4 किमी, जांबोटी-गोवा मुख्य …
Read More »निर्मला सीतारामन, जग्गेश यांचे उमेदवारी अर्ज दाखल
बेंगळुरू : राज्यसभेच्या दुसर्या टर्मसाठी राज्यसभेची निवडणूक लढवत असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अभिनेते जग्गेश यांनी आज कर्नाटकातून उमेदवारी अर्ज दाखल केला. विधानसभेच्या सचिव विशालाक्षी यांच्याकडे केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी निर्मला सीतारामन यांच्या समवेत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा आणि …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta