Sunday , September 20 2026
Breaking News

सेंट्रल हायस्कूल माजी विद्यार्थी मित्र परिवारतर्फे गुरुवंदना कार्यक्रम साजरा

Spread the love

 

बेळगाव : आज रोजी व्यासपौर्णिमा निमित्त आई वडील, आध्यात्मिक गुरु व शिक्षक हे प्रत्येकांचे जीवनातील गुरुजन आहेत यांच्या कृतज्ञतेसाठी आज 13 जुलै रोजी मराठा मंडळ हायस्कूल सभागृहामध्ये सर्व शिक्षक गुरुजनांचा सत्कार समारंभ अत्यंत उत्साहात संपन्न झाला. मराठा मंडळ, जिजामाता हायस्कूल व सेंट्रल हायस्कूल यांच्या सर्व शिक्षकांचा श्रीफळ, तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सेंट्रल हायस्कूलचे मुख्याध्यापक विश्वजीत हसबे, मराठा मंडळाचे मुख्याध्यापक एल. एन. शिंदे, तसेच जिजामाता हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही. बी. देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रफुल शिरवलकर यांनी केले तसेच माजी विद्यार्थीकडून विकास मांडेकर यांनी गुरु विषयी प्रबोधन केले. उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांच्याकडून सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विनोद हंगिरकर, गजानन बांदेकर, गिरीश धामणेकर, सुरेंद्र मुरकुटे, संजय हिशोबकर, आदिनाथ सालगुडे, मोहन पाटील, लक्ष्मीकांत हावळ इत्यादी माजी विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी विश्वजीत हसबे यांनी “गुरु” विषयी कविता सादर केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गिरीश धामणेकर यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *