Friday , March 6 2026
Breaking News

Belgaum Varta

चिमुकल्यानी भाजी आणली अन विकलीही!

  नूतन मराठी विद्यालयात आठवडी बाजार निपाणी (वार्ता) : येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन मराठी विद्यालयातील चिमुकल्यांनी आठवडी बाजार भरून त्यामध्ये भाजी आणली आणि विकलीही. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, पालेभाज्या, वह्या पेन खाद्यपदार्थ आणले होते.या बाजाराला पालकासह परिसरातील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. संस्थेच्या अध्यक्षा प्राचार्या ए. सी. …

Read More »

क्रूझरचे टायर फुटून भीषण अपघात; शालेय विद्यार्थ्यांसह चौघांचा मृत्यू

रायचूर : राज्यात पहाटेच्या सुमारास झालेल्या दोन भीषण अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला.  यल्लापूरमध्ये लॉरी उलटून 14 जणांचा मृत्यू झाला, तर रायचूरमध्ये क्रुझरच्या अपघातात तीन विद्यार्थ्यांसह चार जणांचा मृत्यू झाला असल्याचे समजते. रायचूरच्या सिंदनूर तालुक्यातील अरगिनमर कॅम्पजवळ भीषण अपघात झाला. क्रुझरचे टायर फुटून वाहन रस्त्याच्या मधोमध पलटली.  या अपघातात मंत्रालय …

Read More »

यल्लापूर येथे भीषण अपघात : 14 ठार

  यल्लापूर : उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यातील गुळ्ळापुरजवळ भाजीपाला भरलेली लॉरी पलटी होऊन 14 जण ठार झाल्याची घटना घडली आहे. राष्ट्रीय महामार्ग 63 वर आज सकाळी ही दुर्घटना घडली. भाजीपाल्यांनी भरलेल्या लॉरीतून 25 जण प्रवास करत होते. गुळ्ळापुरजवळील घट्टा परिसरात एक लॉरी उलटली. त्यामुळे 14 जणांचा जागीच मृत्यू झाला. …

Read More »

गोवा : वेर्णा येथे भीषण आग; 30 कार आगीच्या भक्ष्यस्थानी

  वेर्णा : वेर्णा औद्योगिक वसाहतीत भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली. वेर्णातील रेनो आणि स्कोडाच्या सर्व्हिस सेंटरला ही आग लागल्याने, जवळपास 30 कार जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होत, आगीवर नियंत्रण मिळवले आहे. गवताला लागलेली आग पुढे पसरून बस जळल्याची घटना नुकतीच …

Read More »

संविधानाचे संरक्षण आपली जबाबदारी : खासदार प्रियंका गांधी

  बेळगाव : देशाचे संविधान हे केवळ पुस्तक नाही तर ते देशातील प्रत्येक नागरिकाचे संरक्षण आहे. मात्र हेच संविधान धोक्यात आले असून त्याचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे मत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सरचिटणीस, खासदार प्रियांका गांधी यांनी व्यक्त केले. १९२४ मध्ये महात्मा गांधींनी बेळगावात आयोजित केलेल्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाच्या …

Read More »

छत्तीसगडमध्ये 20 नक्षलवादी ठार, एकावर तर 1 कोटीचा इनाम

    गडचिरोली : महाराष्ट्रासह छत्तीसगड आणि नक्षल प्रभावित जिल्ह्यातून ही कीड हटवण्यासाठी व्यापक मोहिम हाती घेण्यात आली आहे. छत्तीसगड पोलीस आणि सीआरपीएफ कडून सुरू असलेला कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. 36 तास उलटूनही अजूनही ही चकमक सुरूच आहे. छत्तीसगडमधील दक्षिण बस्तर जिल्ह्यात आणि इतर ठिकाणी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यात धुमश्चक्री …

Read More »

तुर्कीतील स्की रिसॉर्ट हॉटेलला भीषण आग! किमान ६६ जणांचा मृत्यू, ५१ जण जखमी

  तुर्कस्तानच्या एका स्की रिसॉर्टमधील एका इमारतीला भीषण आग लागली. या आगीत किमात ६६ लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर ५० पेक्षा जास्त नागरिक यात जखमी झाले आहे. स्थानिक वेळेनुसार ३ च्या सुमारास ही आग लागली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आगीची दाहकता …

Read More »

आपल्या मर्यादा योग्य वेळी समजल्या तरच तणावमुक्ती होईल : युवराज पाटील

  50 व्या बॅरिस्टर नाथ पै व्याख्यानमालेतील चौथे पुष्प बेळगाव : “आपल्याला आपली क्षमता काय आहे, आपल्या मर्यादा काय आहेत हे योग्य वेळी माणसाला कळलं पाहिजे. हे कळणं हेच ताण तणावमुक्तीचं पहिलं कारण आहे” असे विचार लोकराजा शाहू अकॅडमीचे संस्थापक, प्रेरणादायी वक्ते प्रा. युवराज पाटील यांनी बोलताना व्यक्त केले. सार्वजनिक …

Read More »

जय जनकल्याण सौहार्द सहकारी संघ नियमित मण्णूर संस्थेचा वर्धापनदिन सोहळा संपन्न

  संस्थापक श्री. एल. के. कालकुंद्री यांना राष्ट्रीय सहकार रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार संपन्न बेळगाव : जय जनकल्याण सौहार्द सहकारी नियमित मण्णूर व जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक फौंडेशन या संस्थेचा 7 वा वर्धापनदिन नुकताच पार पडला, प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन एन. एस. मुल्ला साहेब निवृत्त ARCS, व माजी …

Read More »

खानापूर दुर्गानगर येथील श्री साईबाबा मंदिराचा कॉलम भरणी समारंभ २३ रोजी

    खानापूर : दुर्गा नगर खानापूर येथे गुरुवारी (ता. २३) सकाळी दहा वाजता श्री साईबाबा मंदिराचा कॉलम भरणी समारंभ आयोजित करण्यात आला आहे. खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते कॉलम भरणी होणार असून यावेळी मान्यवर मंडळी उपस्थित राहणार असून साईबाबा मंदिर कमिटीचे अध्यक्ष अमृत पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. …

Read More »