Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

मराठा मंडळ ताराराणी पदवी पूर्व महाविद्यालयात पालक जागृती अभियान संपन्न

  खानापूर : उत्तम शैक्षणिक उद्दिष्ट गाठायचे असेल तर शिक्षक, पालक आणि बालक एका समान रषेत आले पाहिजेत. जेव्हा ते एका समान रेषेत येतात तेव्हाच शैक्षणिक प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. हे गृहीत धरून मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथे सोमवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी पालक जागृती अभियान घेण्यात …

Read More »

सोसायटीची वार्षिक उलाढाल 55 कोटीच्या वर : चेअरमन डी. जी. पाटील

  नेताजी मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न येळ्ळूर : शिवाजी रोड येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीची 24 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नेताजी मराठी सांस्कृतिक भवनमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील हे होते. प्रारंभी सोसायटीच्या दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. …

Read More »

सफाई कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन

  बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेत कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. बेळगाव महानगरपालिकेत कंत्राटी पध्दतीवर काम करणाऱ्या नागरी सेवकांनी सोमवारी हाताला काळ्या फिती बांधून व सफाई कामगार दिनावर बहिष्कार टाकून, कायमस्वरूपी भरती करण्याच्या मागणीसाठी निदर्शने केली. दीड वर्षापूर्वी कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना …

Read More »

‘कर्मवीर’ हे शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षणमहर्षी

  प्राचार्य एम. एस. कामत : कुर्ली हायस्कूलमध्ये कर्मवीर जयंती निपाणी (वार्ता) : कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य सर्व जाती-धर्मांसाठी होते. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, महाराजा सयाजीराव, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचा वारसा शैक्षणिक क्षेत्रामध्ये कर्मवीर आण्णांनी उभारला. ते सत्यशोधकी व मानवतावादी असून शैक्षणिक क्षेत्रातील रयतेचे तत्वनिष्ठ शिक्षणमहर्षी …

Read More »

कर्नाटक छायाचित्रकार असोसिएशनचा राजगौडा पाटील यांना पुरस्कार

  निपाणी (वार्ता) : बंगलोर येथील कर्नाटक छायाचित्रकार असोसिएशनचा राज्यपातळीवरील ‘छायाश्री’ पुरस्कार येथील तालुका छायाचित्रकार व व्हिडिओग्राफर संघाचे सदस्य राजगौडा पाटील यांना देण्यात आला. बंगलोर येथील त्रिपुरवासीनी पॅलेस मैदानावर संघाचे अध्यक्ष एच. एस. नागेश यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. पाटील हे आर्ट मास्टर असून गेल्या पंचवीस वर्षापासून ते छायाचित्रकार …

Read More »

डिजिटल मिडिया परिषदेच्या अध्यक्षपदी अनिल वाघमारे यांची नियुक्ती

  पुणे : मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या डिजिटल मिडिया परिषदेच्या राज्य अध्यक्षपदी “डोंगरचा राजा” चे संपादक अनिल वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी काल पिंपरी चिंचवड येथे ही घोषणा केली. डिजिटल मिडियात काम करणारया पत्रकारांची डिजिटल मिडिया परिषद या नावाने …

Read More »

रुक्मिणी नगर आणि उज्वल नगर येथील तरुणांमध्ये तलवारीने हाणामारी; चार जण जखमी

  बेळगाव : बेळगावातील रुक्मिणीनगर आणि उज्वल नगर येथील काही तरुणांमध्ये काल रात्री ईद मिलाद मिरवणुकीनंतर क्षुल्लक कारणावरून बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर तलवारी घेऊन हाणामारीत झाले. याबाबत समजलेली माहिती अशी की, ईद मिलादची मिरवणूक सुरू असताना रुक्मिणीनगर आणि उज्वल नगर येथील काही तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. पण मिरवणूक आटोपून परतत …

Read More »

दुष्ट प्रवृत्तीला हद्दपार करा : मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

  मुंबईमध्ये मुंबईकर ग्रामस्थांचा विक्रमी उपस्थितीत स्नेहमेळावा मुंबई : एका बाजूला संपूर्ण आयुष्य जनतेसाठी खर्ची घालणारा मी आणि दुसऱ्या बाजूला राजकीय हव्यासापोटी विरोधकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना तुरुंगात घालण्याची स्वप्ने बघणारी दुष्ट प्रवृत्ती, अशी ही लढाई आहे. या सगळ्याचा विचार आणि तुलना तुम्हीच करा आणि अशा दुष्ट प्रवृत्तीला हद्दपार करा, असे …

Read More »

बेनकनहळी ग्रामपंचायत अध्यक्षांनी राबवले स्वच्छता अभियान

  बेळगाव : नुकताच गणेशोत्सव पार पडला. गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. बेनकनहळी, सावगाव, गणेशपुर, नानावाडी, मंडोळी, हंगरगा, सुरेश अंगडी रोड बोकमुर, बेळगुंदी परिसरातील गणेश मूर्तींचे विसर्जन सावगाव तलावात करण्यात येते. तलाव व परिसरात खूप ठिकाणी व पाण्यामधे प्लास्टिक व निर्माल्य पसरलेले होते म्हणून बेनकनहळी ग्रामपंचायत अध्यक्षांनी पुढाकार घेऊन या …

Read More »

उदयोन्मुख धावपटू प्रेम बुरुडचा नागरी सन्मान सोहळा संपन्न

  बेळगाव : कावळेवाडी येथील उदयोन्मुख धावपटू प्रेम यल्लापा बुरुड याचा गावात नागरी सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयचे अध्यक्ष वाय. पी. नाईक उपस्थित होते. प्रारंभी ऍड. नामदेव मोरे यांनी प्रास्ताविक करुन उपस्थितांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. गावातील यल्लापा बुरुड यांनी अथक परिश्रम घेऊन गरीब परिस्थितीमध्ये धावपटू …

Read More »