अशाप्रकारच्या जटील व जोखमीच्या मेंदूच्या १०२ अवेक क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिया सिद्धगिरी हॉस्पिटल अनोखा विक्रम बेळगाव : एका बाजूला रुग्ण स्वतः बासुरी वाजवत आहे आणि दुसऱ्या बाजूला रुग्णावर मेंदूची जटील अशी मेंदूची शस्त्रक्रिया पार पाडली जात आहे असे दृश्य सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या संस्कार विभागात पाहायला मिळाले. ज्या रुग्णांच्या मेंदूतील …
Read More »हलशी येथील छत्रपती शिवाजी विद्या मंदिर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
खानापूर : शाळा ही आई-वडिलांनंतर संस्काराची शिदोरी आणि भविष्याची वाट दाखविणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो मोठे झालो ती शाळा आणि त्या शाळेच्या आठवणी कधीही विसरू शकत नाही हे माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमेळावा घेऊन दाखवून दिले असून माजी विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारे स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून शाळेच्या विकासासाठी पुढे आल्यास शाळांच्या अधिक प्रमाणात …
Read More »तब्बल ३२ तास चाललेल्या गणेश विसर्जन सोहळ्याची यशस्वी सांगता
बेळगाव : बेळगावच्या गणेशोत्सवाची तब्बल ३२ तास चाललेल्या विसर्जन सोहळ्याची यशस्वी सांगता झाली. अनंतचतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी ४ पासून सुरू झालेल्या विसर्जन मिरवणूक सोहळ्याची बुधवारी मध्यरात्री सांगता झाली. यावेळी महानगरपालिकेच्या गणरायाचे विसर्जन सर्वात शेवटी करण्यात आले. मंगळवारी दुपारी सुरू झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीने बुधवारी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत बेळगावच्या गणेशोत्सवात …
Read More »मॉर्निंग वॉकला गेलेल्या पादचाऱ्याला बोलेरोची धडक; युवक ठार
बेळगाव : मॉर्निंग वॉकला गेलेल्या पादचाऱ्याला बोलेरोची धडक बसून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव शहरातील महात्मा फुले रोड येथे गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास घडली. श्रीधर पवार (वय 42) रा. संतसेना रोड बेळगाव असे या मृत युवकाचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, श्रीधर हे नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी मॉर्निंग …
Read More »तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूंसाठी जनावरांच्या चरबीचा वापर?; मुख्यमंत्री चंद्राबाबूंचा गंभीर आरोप
नवी दिल्ली : तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या प्रसादाबद्दल आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी गंभीर आरोप केला आहे. नायडू यांचे कट्टर विरोधक आणि माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या कार्यकाळात तिरुपतीच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर व्हायचा, असा अतिशय धक्कादायक आरोप नायडू यांनी केला आहे. यामुळे आंध्र प्रदेशमध्ये मोठा वाद निर्माण …
Read More »बेळगावमध्ये तब्बल २८ तास गणेश विसर्जन मिरवणूक!
बेळगाव : लाखो भाविकांना उत्साह देणार्या यंदाच्या सार्वजनिक गणपतींची विसर्जन मिरवणूक तब्बल २८ तास चालली. गेल्या ११ दिवसांपासून सुरु असलेल्या गणेशोत्सवाची जल्लोषात सांगता करण्यात आली. मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ बेळगाव आणि श्री लोकमान्य टिळक गणेश महामंडळ बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शुभारंभाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महापौर …
Read More »मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये भीषण अपघात; ७ जणांचा जागीच मृत्यू
जबलपूर : मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये बुधवारी सायंकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. एक भरधाव ट्रक रिक्षावर उलटल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात ३ महिलांसहित ७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताच्या घटनेने मृत व्यक्तींच्या गावावर शोककळा पसरली आहे. मध्य प्रदेशच्या जबलपूर मझगवा पोलीस स्टेशन हद्दीत ही भीषण …
Read More »बेळगाव – निपाणी – कोल्हापूर रेल्वेसाठी दोन्ही जिल्ह्यातील खासदारांनी लक्ष द्यावे
निपाणी (वार्ता) : स्वांतत्र्यपुर्व काळापासूनची निपाणी रेल्वे मागणी अमृत महोत्सवी स्वतंत्र भारतात पूर्ण होण्यासाठी बेळगाव व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आजी, माजी संसद सदस्यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी येथील माजी सभापती प्रा. राजन चिकोडे यांनी केली आहे. सध्या बेळगांव, हुक्केरी, संकेश्वर, निपाणी, कागल, कोल्हापूर या मार्गावरील सुरू असलेल्या रेल्वे लाईन …
Read More »राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी जांबोटी येथील माध्यमिक विद्यालयाच्या श्रावणी पाटील हिची निवड
खानापूर : जांबोटी येथील माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु. श्रावणी भरणानी पाटील हिची कुस्ती या क्रीडा प्रकारात राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. शिक्षण खात्याच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धेत श्रावणीने 61 किलो वजन गटात तालुक्यात आपले प्रावीण सिद्ध केले होते. जिल्हास्तरीय स्पर्धेत …
Read More »सेंट झेवियर्स हायस्कूलला फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद
बेळगाव : विजापूर जिल्हा सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित बेळगाव विभागीय माध्यमिक आंतरशालीय १७ वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद बेळगाव जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सेंट झेवियर्स हायस्कूल संघाने पटकाविले. या स्पर्धेतील उप उपांत्य पूर्व सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने हावेरी जिल्हा संघाचा चुरशीच्या सामन्यात 1-0 असा पराभव केला. बेळगाव संघातर्फे एकमेव …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta