Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

सहकारी खात्याचे नवे उपनिबंधक रवींद्र पाटील

  बेळगाव : सहकारी खात्याचे उपनिबंधक म्हणून श्री. रवींद्र पाटील यांची नियुक्ती झाली असून काल सोमवारी त्यानी पदभार स्वीकारला. प्रथम बेळगावचे सहनिबंधक म्हणून त्यांनी काम पाहिले त्यानंतर सौहार्द फेडरेशनचे सहनिबंधक म्हणून काम केले असून आता ते उपनिबंधक झाले आहेत. मूळचे चिकोडी जवळील जुगुळ गावचे असलेले रवींद्र पाटील यांची एक उत्तम …

Read More »

नुकसान भरपाई देण्यास विलंब : महापालिका उपायुक्तांच्या गाडीला चिकटवली नोटीस

  बेळगाव : हुलबत्ते कॉलनीत जमीन संपादित केल्याप्रकरणी भरपाई न दिल्याने जमीन मालकाने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने महापालिकेला विस्थापित मालमत्ताधारकाला ७५ लाखांची नुकसान देण्याचा आदेश दिला मात्र महापालिकेकडून जमीन मालकाला भरपाई देण्यात आली नाही. यामुळे संतप्त झालेल्या जमीन मालकाने चक्क महापालिका उपयुक्तांच्या गाडीला नोटीस चिकटवली. महापालिकेच्या या कारवाईवर …

Read More »

इस्कॉनतर्फे 7 दिवसांचा भगवद्गीता अभ्यासवर्ग

    बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय श्री कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन)तर्फे दि. 20 ते 26 सप्टेंबर हे 7 दिवस भगवतगीता अभ्यासवर्ग मराठी, कन्नड व हिंदी भाषेतून सूरू करण्यात येत आहे. इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुलानंद मंदिर, शुक्रवार पेठ टिळकवाडी येथे रोज सायंकाळी 6.30 ते 8.30 पर्यंत होणाऱ्या या अभ्यासक्रमात भगवद्गीता काय …

Read More »

जायंट्स ग्रुपचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

  बेळगाव : येथील जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनतर्फे दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यावर्षीचे पुरस्कार शिक्षक दिनाचे औचित्य साधून 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता जायंट्स भवन, कपिलेश्वर मंदिराजवळ येथे वितरित केले जाणार आहेत. यावर्षीचे आदर्श शिक्षक म्हणून डॉ. बी एस नावी, प्रा. मंजुनाथ एन …

Read More »

स्वातीताई कोरी सीमाप्रश्नी नक्कीच आवाज उठवतील : शुभम शेळके

  बेळगाव : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतले ज्येष्ठ नेते स्व. श्रीपतराव शिंदे साहेब यांची कन्या स्वातीताई कोरी यांच्या निर्धार सभेला उपस्थित राहून पाठिंबा दिला. 1986 च्या कन्नड सक्ती आंदोलनात झालेल्या सत्याग्रहात 151 सत्याग्रहींच्या तुकडीतील ते प्रमुख नेते होते. त्यांचा वारसा खंबीरपणे चालवणाऱ्या स्वातीताई कोरी यंदा विधानसभा लढवण्याची तयारी करत आहेत. शिंदे …

Read More »

कै. अर्जुनराव घोरपडे यांनी बहुजन समाजासाठी केलेले कार्य कौतुकास्पद : शरद पवार

  बेळगाव : बहुजन समाजासाठी कै. अर्जुनराव घोरपडे यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. त्यांनी सहकाराबरोबरच शिक्षण, उद्योग क्षेत्रातही अतुलनी कार्य केल्याचे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार म्हणाले. सहकार महर्षी कै. अर्जुनराव गोविंदराव घोरपडे जन्मशताब्दी सोहळ्यात माननीय शरद पवार यांनी अर्जुनराव घोरपडे यांच्या कार्याचा आढावा घेताना उपरोक्त गौरवोद्गार काढले. कै. अर्जुनराव …

Read More »

नादुरुस्त रस्त्यामुळे खानापूरात एकाचा बळी!

  खानापूर : खानापूर तालुक्यातील मेरडा येथील रहिवासी व माजी आमदार अरविंद पाटील यांचे वाहन चालक संतोष परशराम मादार (वय 46) यांचे रात्री अपघाती दुःखद निधन झाले. याबाबत समजलेली माहिती अशी की, दोन दिवसापूर्वी संतोष मादार हे आपल्या दुचाकीवरून आपल्या गावाकडे जात असताना नंदगड-नागरगाळी मार्गावर हलशी गावापासून काही किलोमीटर अंतरावर …

Read More »

कै. अशोकराव मोदगेकर हे एक असामान्य व्यक्तिमत्त्व

  बेळगाव : कै. अशोकराव मोदगेकर यांनी बेळगावच्या पूर्व भागात मराठी भाषा व मराठी संस्कृती संवर्धनासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे. मराठी शाळा स्थापन करून शिक्षणाची ज्ञानगंगा प्रवाहित करण्याचे पवित्र कार्य त्यांनी केले, हे त्यांचे मराठी भाषेबद्दल असलेले निसिम प्रेम भावी समाजाला प्रेरणादायी आहे, असे विचार बेळगावचे माजी महापौर श्री. मालोजी …

Read More »

केपीएससीच्या परीक्षा पुन्हा घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

  प्रश्नपत्रिकेतील भाषांतरात त्रुटी आढळून आल्याने गोंधळ बंगळूर : नुकत्याच झालेल्या केपीएससी प्राथमिक परीक्षेत भाषांतरातील त्रुटी आढळून आल्याने राज्य सरकारने तीव्र नाराजीला बळी पडल्यानंतर व्यक्त केल्या व मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केपीएससी परीक्षा दोन महिन्यांत पुन्हा घेण्याचे निर्देश दिले. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना यापूर्वीच सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. आगामी परीक्षा …

Read More »

ज्येष्ठ पत्रकार मनोहर कालकुंद्रीकर यांचा वाढदिवस उत्साहात

  बेळगाव : ज्येष्ठ पत्रकार व दैनिक रणझुंझारचे संपादक मनोहर कालकुंद्रीकर यांचा ७४ वा वाढदिवस येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी संभाजी संताजी यांनी मनोहर कालकुंद्रीकर यांच्या कार्याचा आढावा घेतला व उपस्थितांचे स्वागत केले. विशाल इन्फ्राबिल्डचे संचालक विजय पाटील, ड्रीम इंडिया कंपनीचे एम डी विजय पाटील, ज्येष्ठ पत्रकार …

Read More »