बेळगाव : रेणुकास्वामी खून प्रकरणातील A14 आरोपी प्रदोषला बेंगळुरू येथून बेळगाव हिंडलगा कारागृहात हलवण्यात आले आहे. या हत्याकांडातील १४ वा आरोपी प्रदोष कारागृहात ब्लँकेट आणि बॅग घेऊन आला असता, या बॅगेत सिरप ही आढळून आले. दोन बॅगमधील कपडे आणि साहित्य तपासल्यानंतर हिंडलगा तुरुंगातील कर्मचाऱ्यांनी प्रदोषला आत सोडले.
Read More »निपाणी नगरपालिकेवर भाजपची एकहाती सत्ता
नाट्यमय घडामोडीने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेपासून दूर निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या निपाणी नगरपालिकेवर बालेकिल्ला अबाधित राखण्यात भाजपाला यश आले आहे. नगराध्यक्षपदी भाजपाच्या नगरसेविका सोनल राजेश कोठडीया यांची तर उपनगराध्यक्षपदी संतोष हिंदुराव सांगावकर यांची निवड झाली. यामध्ये कोठडीया व सांगावकर यांना १७ तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …
Read More »तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी मनोहर किणेकर यांची निवड
बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी निवडण्यासंदर्भात आज कार्यकारिणी सदस्यांची महत्वपूर्ण बैठक मराठा मंदिर येथे पार पडली व नवीन पदाधिकारी निवडण्यात आले. बेळगाव तालुका म. ए. समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माजी आमदार मनोहर किणेकर यांच्याकडे सर्वांनुमते सोपविण्यात आली. नूतन पदाधिकारी खालीलप्रमाणे अध्यक्ष : मनोहर किणेकर. कार्याध्यक्ष : आर. …
Read More »गणेश चतुर्थी आणि ईद-मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांची बैठक
बेळगाव : श्रीगणेश चतुर्थी आणि ईद-मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांची बैठक आज पार पडली. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना आगामी उत्सव काळात घ्यावयाच्या खबर्दारीसंदर्भात सूचना देण्यात आल्या. दरवर्षीप्रमाणे यंदाही सणासुदीत शांतता व सुव्यवस्था राखणे तसेच जनतेच्या समस्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. एडीजीपी आर. हितेंद्र यांनी, सण कसे साजरे केले पाहिजेत, …
Read More »ग्रामीण विकास योजनेतून अनेक कार्यक्रम
बेळगाव : धर्मस्थळ धर्माधिकारी वीरेंद्र हेगडे हे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामविकास योजनेंतर्गत अनेक कार्यक्रम करत असल्याचे ज्येष्ठ वकील जी. आर. सोनेर यांनी सांगितले. हिंडलगा गणेश सभाभवन येथे श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्राम विकास प्रकल्पाच्या स्वयंअर्थसहाय्यित संस्थांतर्फे सामूहिक श्रीवरमहालक्ष्मी पूजन व पदग्रहण कार्यक्रमाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. श्रावण महिन्यात वरमहालक्ष्मीची सामुहिक …
Read More »सुभाषचंद्र नगरात श्रावण उत्सव साजरा
बेळगाव : नवी पिढी संस्कृती, सणवार विसरत चालली आहे हे लक्षात घेऊन सुभाषचंद्रनगरातील महिला, मुली व लहान मुलांना एकत्रित करून त्यांना हिंदू संस्कृतीतील उत्सवांची माहिती द्यावी या उद्देशाने सुभाषचंद्र नगर महिला मंडळाच्या वतीने समुदाय भवनांमध्ये नुकताच श्रावण उत्सव साजरा केला. श्रावण महिन्यातील सोमवारची शंकराची पूजा, मंगळागौरीची पूजा, नागपंचमी, नारळी …
Read More »बेळगावात गिरीस्तुती चेकमेट स्कुल ऑफ चेसतर्फे राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धा
बेळगाव : गिरीस्तुती चेकमेट स्कुल ऑफ चेस फौंडेशन, बेळगाव या संस्थेच्यावतीने कर्नाटक राज्य 11 वर्षांखालील खुल्या गटाकरिता फिडे रेटेड चेस चॅम्पियनशिप-2024 तसेच कर्नाटक राज्य मुलींकरिता 11 वर्षांखालील वयोगटासाठी बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शास्त्रीनगर-बेळगाव येथील गुजरात भवन येथे शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट ते रविवार दिनांक 1 सप्टेंबर पर्यंत …
Read More »पायोनियर बँकेला दोन कोटीचा निव्वळ नफा : चेअरमन प्रदीप अष्टेकर यांची माहिती
बेळगाव : येथील पायोनियर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने गेल्या आर्थिक वर्षात दोन कोटी 5 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला असून बँकेची 118 वी वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या शनिवार दि. 31 ऑगस्ट 2024 रोजी लोकमान्य रंगमंदिर, कोनवाळ गल्ली, बेळगाव येथे संपन्न होत आहे, अशी माहिती बँकेचे चेअरमन श्री. प्रदीप अष्टेकर यांनी …
Read More »सहकार महर्षी कै. अर्जुनराव घोरपडे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचे २ सप्टेंबर रोजी आयोजन
बेळगाव : सहकार महर्षी कै. अर्जुनराव घोरपडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सोमवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी मराठा मंडळ येथे जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार उपस्थित राहणार आहेत. कै. अर्जुनराव घोरपडे यांनी बेळगाव सहकार क्षेत्राला एक नवीन दिशा दाखवून दिली आहे. …
Read More »आंतरराज्य दुचाकी चोरट्याला निपाणी पोलिसांकडून अटक
बेळगाव (वार्ता) : निपाणी पोलिसांनी एका अट्टल आंतरराज्य चोरट्याला अटक करून 10 मोटरसायकली जप्त केल्या असून गडहिंग्लज तालुक्यातील करंबळी गावातील विशाल संजय मोरे असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. निपाणी हालसिद्धनाथ मंदिराजवळ निपाणी बसवेश्वर पोलीस ठाण्याचे पीएसआय रमेश पवार हे ड्युटीवर असताना हा मोटरसायकल चोर पोलिसांच्या हाती लागला. पडलीहाळ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta