Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

पावसाचा जोर लक्षात घेऊन उद्या एक दिवसाची सुट्टी जाहीर!

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून बेळगाव जिल्ह्यात विद्यार्थ्यांना शाळांमध्ये जाणे अवघड होणार असल्याची दखल घेऊन बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना उद्या बुधवार दिनांक 24 जुलै रोजी आणखी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध पत्रकानुसार बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव आणि खानापूर तालुक्यांमध्ये अंगणवाडी ते बारावी पर्यंतच्या सर्व …

Read More »

खानापूर तालुक्यातील रस्त्यांच्या समस्यांबाबत तालुका समितीच्या वतीने निवेदन

  खानापूर : खानापूर तालुक्यातील खानापूर-अनमोड व्हाया हेम्माडगा रस्ता, खानापूर-असोगा-मणतुर्गे रस्ता, गर्लगुंजी-इदलहोंड रस्ता, लालवाडी-चापगाव-अवरोळी रस्ता, हलशी-हलगा-मेरडा-नागरगाळी रस्ता नव्याने पुनर्बांधणी करण्याबाबत खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने आज दि. २३ जुलै रोजी खानापूर तहसीलदार प्रकाश गायकवाड तसेच जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन देण्यात आले. खानापूर-अनमोड व्हाया हेम्माडगा या रस्त्यावरुन गोव्याला जाणारी अवजड …

Read More »

खानापूर तालुक्यात वैद्यकीय सेवा आणि वाहतूक पायाभूत सुविधांचा अभाव: डॉ. सोनाली सरनोबत

  बेळगाव : केएलई हॉस्पिटलला नुकत्याच दिलेल्या भेटीने खानापूर तालुक्यातील सुधारित वैद्यकीय सेवा आणि वाहतूक पायाभूत सुविधांची नितांत गरज अधोरेखित केली. मंगळवारी डॉ. सरनोबत यांनी केएलई हॉस्पिटलमध्ये जाऊन खानापूर तालुक्यातील हर्षदा घाडी या महिलेची भेट घेऊन विचारपूस केली. या रुग्णाला आमगाव (ता. खानापूर) येथून अत्यंत गंभीर अवस्थेत बांबूच्या सहाय्याने तिरडीप्रमाणे …

Read More »

सागर बी.एड्. महाविद्यालयात गुरूपौर्णिमेनिमित्त स्वरांजली सुगम संगीत मैफल उत्साहात

  बेळगाव : सागर शिक्षण (बी.एड्.) महाविद्यालयात गुरूपौर्णिमेनिमित्त स्वरांजली सुगम संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले. संगीत प्रा. विनायक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थींनी विविध सुमधूर प्रार्थना गीते, भजने, भावगीते, भक्तीगीते, लोकगीते, सिनेगीते, देशभक्तीगीते उत्कृष्टपणे प्रस्तुत करून उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळविली. कार्यक्रमाची सुरूवात प्रशिक्षणार्थींच्या सुमधूर प्रार्थनेने झाली. प्रा. एस. पी. नंदगाव यांनी …

Read More »

आमगावच्या महिलेला डॉ. अंजलीताई फाउंडेशनची मदत

  खानापूर : मागील दोन दिवसांपूर्वी खानापूर तालुक्यातील आमगाव गावात हर्षदा घाडी नावाच्या महिलेला छातीत दुखत असल्याने सदर महिलेला मुसळधार पावसात गावकऱ्यांच्या सहकार्याने खांद्यावर उचलून रुग्णालयात घेऊन जाण्याची वेळ आली. खानापूरमधील असुविधांमुळे सातत्याने असे प्रकार पुढे येत असून घडल्या प्रकारचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला. जन्म-मृत्यूशी झुंज देणाऱ्या महिलेला गावकरांनी …

Read More »

जमिनीच्या वादातून एकमेकांवर हल्ला; दोघांचाही मृत्यू

  बेळगाव : जमिनीच्या वादातून दोघांनी एकमेकांवर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने दोघे गंभीर जखमी झाल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना अथणी तालुक्यात घडली. हणमंत रामचंद्र खोत (३४) आणि खंडोबा तानाजी खोत (३२) यांचा मृत्यू झाला आहे. दोघेही अथणी तालुक्यातील खोतवाडी गावातील रहिवासी आहेत. दोघांमध्ये अनेक दिवसांपासून जमिनीवरून वाद सुरू होता, गावातील …

Read More »

सर्वसामान्यांना मिळणार हक्काचे घर; ३ कोटी नागरिकांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा

  नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना एक मोठी घोषणा केली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३ कोटी लोकांना हक्काचे घर मिळणार, असं निर्मला सीतारामन यांनी सांगितले. ही योजना शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागांसाठी असल्याचं निर्मला सीतारामन म्हणाल्या. त्यांच्या या घोषणेमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला …

Read More »

विद्यार्थ्यांना मिळणार 10 लाखांचे शैक्षणिक कर्ज

  नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (मंगळवारी) संसदेत मोदी सरकार 3.0 चा अर्थसंकल्प सादर करत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी सादर केलेला हा सातवा अर्थसंकल्प आहे. यापूर्वी, हे निवडणुकीचे वर्ष असल्याने, 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात कोणतेही महत्त्वपूर्ण धोरणात्मक बदल दिसून आलेले नाहीत. तसेच मध्यमवर्गीयांसाठी …

Read More »

शेतकऱ्यांसाठी गिफ्ट; कृषीसाठी 1.52 लाख कोटींची तरतूद

  नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पाची प्रतीक्षा सर्वांनाच उत्सुकता होती. आज (दि. २३) आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. गरीब, महिला, युवा आणि शेतकरी या चार समाजघटकांवर आपण …

Read More »

अवजड वाहनांना वाहतुकीसाठी वेळ निश्चित!

  बेळगाव : सततच्या पावसामुळे सर्वत्र डोंगर कोसळण्याच्या घटना घडत असून बेळगाव जांबोटी रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. खानापूर तालुक्यातील जांबोटी ते बेळगाव शहराला जोडणाऱ्या जांबोटी-पिरनवाडी रस्त्यावर (राष्ट्रीय महामार्ग 54) अवजड वाहनांना बंदी आणि खानापूर ते जांबोटी (राज्य महामार्ग 31) यांना जोडणाऱ्या रस्त्यावर अवजड वाहनांच्या वाहतुकीच्या वेळा जारी …

Read More »