Wednesday , March 26 2025
Breaking News

शिरोली येथील बेकायदेशीर वृक्षतोडी प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा; डॉ. अंजली निंबाळकर यांचे वनमंत्री ईश्वर खंड्रे यांना निवेदन

Spread the love

खानापूर : खानापूर तालुक्यातील शिरोली येथील सर्वे नंबर 97 मध्ये खासगी जमिनीत बेकायदेशीररित्या वृक्ष तोडीसंदर्भात माजी आमदार व आयआयसीसीच्या सचिव डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी दखल घेतली असून कर्नाटक वन मंत्री ईश्वर खंड्रे यांना एक निवेदन सादर करून बेकायदेशीर वृक्षतोडी प्रकरणात कोण अधिकारी सामील आहेत, या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी अशी विनंती त्यांच्याकडे त्यांनी केली आहे.

यासंदर्भात माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी ट्विटरवर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खानापूर तालुक्यातील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वनक्षेत्रातील बेकायदेशीर वृक्षतोडीवर कारवाई का केली नाही? साग आणि तीळ लाकूड चोरीला. ते कोणाचे रक्षण करत आहेत? रस्त्यांसाठी सर्वसामान्य नागरिक त्रस्त असताना कोणाच्या खासगी जमिनीवर रस्ता बनवण्याची परवानगी दिली? वैयक्तिक फायद्यांसाठी हे आंतरविभाग, कव्हरेज का सुरू आहे? ॲट्रॉसिटीचा खटला टाकण्याची धमकी देणारा अधिकारी कोण? ५ महिन्यांपूर्वी गुन्हा घडला असताना एफआयआर नोंदवण्यास उशीर का? खानापूर ब्लॉक काँग्रेसला हस्तक्षेप करावा लागला. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी आरएफओ, एसीएफ खानापूर यांच्यावर कारवाई करा, असेही त्यांनी नमूद केले आहे.

शिरोली येथील खासगी सर्वे नंबर 97 मध्ये कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना वृक्षतोड करून एक प्रकारे वन खात्याला आवाहन करण्यात आल्याचे दिसून येत आहे. शिवाय सहा महिन्यापूर्वी येथील वन खात्याच्या जमिनीशी लगत असलेल्या बांधाचा दगडही काढण्यात आला होता त्याची कल्पना असूनही त्यावर कारवाई केली नसल्याने खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसने यावर आवाज उठवून यावर चौकशी करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी वन मंत्र्यांना ट्विटर वरून एक निवेदन सादर करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा असे नमूद केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

हलगा ग्राम पंचायत अध्यक्षपदी सुनील पाटील; रणजीत पाटील गटाचा एकतर्फी विजय

Spread the love  खानापूर : हलगा पंचायतीच्या अध्यक्षपदी सुनील मारुती पाटील यांची बिनविरोध निवड झाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *