Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

उत्तरकार्याला रोपांचे वाटप करून पर्यावरणपूरक उपक्रम

  निपाणी (वार्ता) : उत्तरकार्याला रोपांचे वाटप करून पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले आणि शिक्षिका अपूर्वा चौगुले दांपत्याने उत्तर कार्याला १२५ रोपे वाटप करून पर्यावरण पूरक उपक्रम राबविला आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे समाजाला नवा आदर्श मिळाला आहे. यरनाळ येथील कमल रामचंद्र वास्कर यांचे निधन झाले. निपाणी येथील विद्यामंदिर शाळेच्या शिक्षिका …

Read More »

‘क्वॉलिफायर१’च्या सामन्यात आज कोलकातासमोर हैदराबादचे आव्हान, अंतिम फेरीचे लक्ष्य!

  अहमदाबाद : तडाखेबंद फलंदाजांचा समावेश असलेले कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद हे संघ इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या ‘क्वॉलिफायर-१’मध्ये आज, मंगळवारी आमनेसामने येणार आहेत. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीतील विजेत्या संघाला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांचे दमदार कामगिरीचे लक्ष्य असेल. कोलकाताच्या …

Read More »

कागलजवळील महामार्ग कधी सुरु होणार

  नागरिकांतून उपस्थित होतोय सवाल कोगनोळी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुक आयोगाच्या सुचनेनुसार कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य सीमेवर नेमण्यात आलेली विविध खात्याची स्थिर पथके लोकसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर हटविण्यात आली. मात्र निवडणुक काळात बॅरिकेडस लावून हा महामार्ग बंद करण्यात आला आहे. अद्यापही बंद असलेल्या आरटीओ चेक पोस्ट नाक्यामधूनच वाहने सुसाट वेगाने धावत …

Read More »

कर्ज फेडण्यास विलंब झाल्याने पत्नी- मुलाला ठेवले नजरकैदेत; कंटाळलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या

  हुक्केरी : कर्जफेडीला दिरंगाई केल्याने महिलेने शेतकऱ्याच्या पत्नी आणि मुलाला आपल्या घरात नजरकैदेत ठेवल्याने एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना हुक्केरी येथील इस्लामपूर येथे घडली. राजू खोतगी असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, गावातील सिद्धव्वा बायन्नावर नावाच्या महिलेकडे मयत राजू यांनी ५ …

Read More »

तलावातील गाळ काढण्याचा केवळ फार्स

  माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद ; माजी नगराध्यक्ष, नगरसेवक संघटनेची बैठक निपाणी (वार्ता) : स्थानिक आमदार खासदारांची निपाणी नगरपालिका, राज्य आणि केंद्रात सत्ता होती. या काळात जवाहर तलावातील गाळ काढता आला नाही. नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी गाळ काढण्याचा केवळ फोर्स केला. त्यांच्या नियोजन अभावी आता शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याचा आरोप …

Read More »

हेस्कॉमचा झटका, कोगनोळीत उपकरणे जळाली

  कोगनोळी : अचानक उच्च दाबाने विद्युत पुरवठा झाल्यामुळे विद्युत उपकरणे जळाल्याची घटना घडली असून यामध्ये नागरिकांना हजारो रुपयांचा फटका बसला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास घडली. शुक्रवारचा आठवडी बाजार होता. ७ वाजण्याच्या दरम्यान उच्च दाबाने विद्युत पुरवठा झाला. त्यामुळे दुप्पट प्रकाश पडला. अचानक काही घरातील, दुकानातील …

Read More »

खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार

  पणजी : राज्यात रविवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसावेळी भरसमुद्रात २४ पर्यटक असलेली बोट अडकली. बोटीवर पर्यटकांसह दोन कर्मचारी असा २६ जणांचा गट होता. याबाबत माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी धाव घेत त्यांचे जीव वाचवले. मुरगाव बंदरनजीक दोनतास हे ‘रेस्क्यू ऑपरेशन’ चालले होते. पणजीहून रविवारी सायंकाळी ‘नेरुल पॅराडाईज’ या …

Read More »

पाचव्या टप्प्यात ५९ टक्क्यांहून अधिक मतदान; पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराचे गालबोट

  नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशात ५९.०६ टक्के मतदान झाले. या टप्प्यात ४९ मतदारसंघांमध्ये मतदान घेण्यात आले. पश्चिम बंगालमधील तुरळक हिंसाचार आणि ओदिशातील मतदान यंत्रातील कथित बिघाड-गोंधळ वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले. महाराष्ट्रात सुमारे ६० टक्के मतदानाची नोंद झाली, तर सर्वाधिक ७३.१४ …

Read More »

कृष्णा नदीच्या पाणी पातळीची मंत्री सतीश जारकीहोळींनी केली पाहणी

  चिक्कोडी : कुडची शहराजवळील कृष्णा नदी पात्रातील पाणी पातळीची मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्थानिक नेते आणि विविध अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी केली. गेल्या आठवड्याभरापासून सुरु असलेल्या पावसामुळे महाराष्ट्र सरकारने कोयना जलाशयातून कृष्णा नदी पात्रात पाणी सोडण्यासाठी कर्नाटक सरकारने महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना पात्र पाठवले होते. या मागणीला प्रतिसाद देत महाराष्ट्र सरकारने कृष्णा …

Read More »

कपिलेश्वर तलाव परिसरातील समस्यांकडे महापालिका व हॅस्कॉमचे दुर्लक्ष

  बेळगाव : बेळगाव शहरातील कपिलेश्वर मंदिरच्या पाठीमागे असलेल्या कपिलेश्वर तलाव परिसरातील समस्यांकडे महानगरपालिकेचे तसेच हॅस्कॉमचे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे. कपिलेश्वर तलावात परिसरातील लहान मुले तसेच तरुण वर्ग नेहमीच पोहण्याचा आनंद लुटत असतात. सध्या उन्हाळी सुट्टी असल्यामुळे बालचमू कपिलेश्वर तलावात पोहण्यासाठी गर्दी करताना दिसून येत आहेत. मात्र या …

Read More »