Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

काँग्रेसला मताधिक्य मिळेल!

  केपीसीसी प्रवक्ते मुनीर : बुथ प्रतिनिधींना प्रशिक्षण निपाणी (वार्ता) : निपाणी मतदारसंघात २४८ बुथ आहेत. प्रत्येक बुथवर काँग्रेसला मताधिक्य मिळेल, यासाठी बुथ प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी सूक्ष्म नियोजन करावे. पक्षांव्यतिरिक्त जे सामान्य मतदार आहेत, त्या मतदारांपर्यंत काँग्रेस सरकारच्या योजना आणि भाजप सरकारचे अपयश याबाबत जागृती करावी, अशा सूचना कर्नाटक प्रदेश …

Read More »

पश्चिम बंगालमध्ये रामनवमीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत दगडफेक

  कोलकाता : रामनवमीनिमित्त देशभर जल्लोष साजरा करण्यात आला. परंतु, या जल्लोषाला पश्चिम बंगालमध्ये गालबोट लागले आहे. रामनवमीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत दगडफेक करण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद येथील शक्तीपूर परिसरात हा हिंसाचार घडला. यामुळे या भागात १४४ कलमान्वये संचारबंदी लागू करण्यात आली. या घटनेचे व्हीडिओ समोर आले आहेत. त्यानुसार, मिरवणुकीत …

Read More »

उन्हाळी मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ

  बेळगाव : हॉकी बेळगावतर्फे उन्हाळी मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिरास दि. 10 एप्रिल पासून प्रारंभ झाला आहे. सदर शिबिर दररोज सकाळी 6.30 ते 8.30 व सायंकाळी 4.30 ते 6.30 नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान (लेले ग्राउंड) येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणार्थी मुला-मुलींना दररोज नारी शक्तींच्या केळी, दुध व अंडी देण्यात …

Read More »

वाढत्या उष्म्यामुळे वकीलांना कोट न घालता कामकाज करता येणार

  बेळगाव: सर्वत्र उन्हाळा चालू आहे. वाढत्या उन्हामुळे अनेकांना उष्माघाताच्या आजारांना देखील सामोरे जावे लागत आहे. बेळगावात देखील जवळपास तापमान 40° पर्यंत जाऊन पोहोचले आहे. अशा स्थितीत वकीलाने काळा कोट परिधान करून न्यायालयीन कामकाजात सहभाग घेणं त्रासदायक होत होते. त्या अनुषंगाने राज्य वकील संघटनेने वकीलांना होणारा त्रास ओळखून उच्च न्यायालयाकडे …

Read More »

दिल्लीचा आयपीएलमधील सर्वात मोठा विजय, घरच्या मैदानावर गुजरातचा ६ विकेट्सनी उडवला धुव्वा

  अहमदाबाद : आयपीएलच्या १७व्या हंगामातील ३२वा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने होते. ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सवर ६ विकेट्सनी एकहाती विजय मिळवला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करायला उतरलेला गुजरातचा संघ दिल्लीच्या गोलंदाजांसमोर फलंदाजी करताना हतबल दिसला. ज्यामुळे गुजरात …

Read More »

कारवारमधून समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांचा अर्ज दाखल

  खानापूर : कारवार लोकसभेसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार निरंजन उदयसिंह सरदेसाई यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. कारवार लोकसभा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौ. मानकर यांच्याकडे रीतसर उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी, नंदगड विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे उपाध्यक्ष रमेश धबाले, महाराष्ट्र एकीकरण …

Read More »

खासदार ते पंचायत सदस्यापर्यंत सगळी पदे माझ्याच घरी… कार्यकर्ते फक्त धुणीभांडी करी…

  भारतात घराणेशाहीचा मुद्दा हा कायमच चर्चेत राहिला आहे. पक्ष कोणताही असो प्रस्थापित नेता आपल्या कुटुंबातील लोकांना पुढे करून पदे लाटण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करतात. पद मिळाले नाही की पक्ष चांगला नाही तर पक्षाला राम राम करून नवीन घरोबा थाटतात. असाच एक घराणेशाहीचा उदय बेळगावमध्ये झाला आहे. सगळी पदे आपल्यालाच मिळावी …

Read More »

समितीचे उमेदवार महादेव पाटील शुक्रवारी अर्ज दाखल करणार

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोकसभेचे उमेदवार महादेव पाटील यांचा उमेदवारी अर्ज शुक्रवार दि. 19 रोजी शक्तीप्रदर्शनाने दाखल करण्यात येणार आहे. बेळगाव शहरातील धर्मवीर संभाजी महाराज चौकातून शुक्रवारी सकाळी दहा वाजता मिरवणुकीने जिल्हाधिकारी कार्यालयांकडे आज दाखल करण्यात येणार आहे. बेळगावसह सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, …

Read More »

भव्य शक्तिप्रदर्शनाने जगदीश शेट्टर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

  बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी बुधवारी आपला उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी जोरदार रोड शो द्वारे निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला. येथील समादेवी गल्ली येथून निघालेला रोड शो खडेबाजार, शनिवार खुट, काकतीवेस रोड, राणी चन्नम्मा सर्कल मार्गे पुढे जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या …

Read More »

सार्वजनिक वाचनालयातर्फे विद्यार्थ्यांसाठी “आम्ही वाचतो” कार्यक्रम

  बेळगाव : येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दि.23 एप्रिल दिवशी ‘पुस्तक दिवस’ साजरा करण्यात येणार असून विद्यार्थ्यांसाठी “आम्ही वाचतो” या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अलीकडे तरुणपिढी मोबाईलकडे वळली असल्याने ते वाचनालयाकडे वळत नाहीत, एवढेच नव्हे तर कार्यक्रमातही तरुणांची उपस्थिती अभावाने जाणवते. पण शिक्षक व प्राध्यापकांची निरीक्षणे याबाबतीत वेगळी …

Read More »