Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

कारवार मतदासंघातून निरंजन सरदेसाई यांचा अर्ज दाखल

  खानापूर : कारवार लोकसभा मतदार संघातून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निरंजन सरदेसाई यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी अर्ज दाखल करण्यासाठी कारवार येथे मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा देत कारवार वासियांचे लक्ष वेधून घेतले. अर्ज दाखल करण्यासाठी रवाना …

Read More »

शिव-भीम शक्तीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

  बेळगाव : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती उत्सव महाराष्ट्र एकीकरण समिती व दलित संघटनेच्यावतीने बेळगाव रेल्वे स्थानकात साजरी करण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर, लोकसभा निवडणुकीचे उमेदवार महादेव पाटील व मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिल्प कलाकृतीला …

Read More »

काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांचा अर्ज दाखल

  बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी सोमवारी (दि. 15) उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांच्याकडे सादर केला. यावेळी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, माजी मंत्री आमदार लक्ष्मण सवदी, आमदार अशोक पट्टण, आमदार महांतेश कौजलगी, आमदार असिफ (राजू) …

Read More »

डॉ. अंजलीताई निंबाळकर उद्या अर्ज भरणार!

    खानापूर : कारवार लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर उद्या मंगळवार दि.16/04/224 रोजी सकाळी 10.30 वाजता कारवार जिल्हाधिकारी कार्यालयात शक्तिप्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून काँग्रेसकडून त्याची जोरदार तयारी सुरू करण्यात येत आहे. यावेळी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. पहिल्यांदाच खानापूर तालुक्याला लोकसभेची …

Read More »

भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

  बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी आज सोमवारी सकाळी जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केले. याप्रसंगी त्यांच्या समवेत माजी मंत्री रमेश जारकीहोळी, खासदार मंगला अंगडी, माजी आमदार अनिल बेनके आणि विधान परिषद सदस्य हणमंत निराणी उपस्थित होते. शुक्रवारपासून नामांकन पत्र अर्थात …

Read More »

हर हर महादेवच्या गजरात श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा संपन्न

  पाच हजारहून अधिक भाविकांनी इंगळ खेळून फेडला नवस बोरगाव (सुशांत किल्लेदार) : बिदरळ्ळी येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाच्या यात्रेस बुधवार दिनांक 13 एप्रिलपासून प्रारंभ झाला असून गुरुवार दि.14 रोजी यात्रेचा मुख्य दिवस होता. मुख्य दिवशी इंगळ खेळला जातो. यावेळी हर हर महादेवच्या गजरात सुमारे पाच हजारांहून अधिक भाविकांनी आपला …

Read More »

निलजी येथे उद्यापासून श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन

  सांबरा : निलजी (ता. बेळगाव) येथे श्रीराम नवमी उत्सवानिमित्त श्रीराम वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळ व श्रीराम मंदिर ट्रस्ट यांच्यावतीने मंगळवार दि. १६ एप्रिलपासून श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवर्य हभप वै. आप्पासाहेब तात्यासाहेब वासकर महाराज व हभप वै. बाळाराम महाराज यांच्या कृपाशीर्वादाने होणाऱ्या श्री ज्ञानेश्वरी पारायण …

Read More »

‘भारत माता की जय’ म्हणण्याची परवानगी मागायची का?’

  पंतप्रधान मोदींचा सवाल; म्हैसूर येथील मेळाव्यात काँग्रेसवर घणाघात बंगळूर : काँग्रेसवर थेट हल्लाबोल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशात भारत माता की जय म्हणायला परवानगी मागायची का, असा सवाल केला. देशात सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी दिवसे दिवस तापत असताना प्रचाराचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या …

Read More »

समितीच्या उमेदवारांना पाठबळ देऊन निवडून आणू; मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत निर्णय

  बेळगाव : मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी मराठी भाषिकांनी समितीच्या पाठीशी उभे राहून बेळगाव आणि कारवार लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना पाठबळ देऊन निवडून आणा, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी रविवारी मराठा मंदिर येथे मध्यवर्ती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार …

Read More »

रोहितची शतकी खेळी व्यर्थ; पथिरानाच्या गोलंदाजीमुळे चेन्नईचा मुंबईवर दणदणीत विजय

  मुंबई : मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर चेन्नईने मुंबईचा २० धावांनी दणदणीत पराभव केला आहे. चेन्नईने दिलेल्या २०७ धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा संघ ६ बाद १८६ धावाच करू शकला. मुंबईच्या पराभवामुळे रोहित शर्माचे झंझावती शतक व्यर्थ गेले. रोहित शर्माने ६१ चेंडूत १०० धावा केल्या. पण पाथिरानाच्या भेदक गोलंदाजीपुढे मुंबईचे …

Read More »