Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

पालकमंत्र्यांनी घेतली पाटील पिता-पुत्रांची भेट

  निपाणी (वार्ता) : बेळगांव ज़िल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बोरगाव येथील सहकाररत्न रावसाहेब पाटील यांची रविवारी (ता.७) त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी अरिहंत बँकेचे कार्याध्यक्ष अभिनंदन उर्फ बच्चू पाटील, सहकाररत्न उत्तम पाटील त्यांच्याशी विविध विषयावर सविस्तर चर्चा केली. जारकीहोळी यांच्या भेटीमुळे राजकीय गोटातून चर्चेला ऊत आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या …

Read More »

कारवार लोकसभा मतदारसंघातून निरंजन सरदेसाई म. ए. समितीचे उमेदवार!

  खानापूर : कारवार लोकसभा मतदार संघातून महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे निरंजन सरदेसाई यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून निवडणुकीच्या माध्यमातून समितीला पुन्हा नव्याने बळ मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बेळगाव आणि कारवार लोकसभा मतदार संघातून महाराष्ट्र एकीकरण समितीने निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यातून …

Read More »

सुवर्णसौधजवळ भीषण अपघात; शेतकऱ्याचा मृत्यू

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील सुवर्णसौधजवळील बस्तवाड गावच्या हद्दीत रविवारी झालेल्या भीषण अपघातात कोथिंबिरीची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. मालवाहू वाहन आणि कोथिंबीर घेऊन जाणारा ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या अपघातात बस्तवाड गावातील मल्लप्पा दोड्डकल्लन्नवर (४१) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. बेळगावच्या बाजारपेठेत कोथिंबीर घेऊन जात असताना मागून आलेल्या मालवाहू वाहनाने ट्रॅक्टरला …

Read More »

भारत विकास परिषदेच्या बेळगाव अध्यक्षपदी विनायक मोरे तर कर्नाटक प्रांत अध्यक्षपदी स्वाती घोडेकर यांची निवड

  बेळगाव : भारत विकास परिषदेच्या बेळगाव शाखा नूतन अध्यक्षपदी श्री. विनायक मोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच कर्नाटक उत्तर प्रांत अध्यक्षपदी बेळगांव शाखेच्या सौ. स्वाती घोडेकर यांची सार्थ निवड करण्यात आली. बेळगाव शाखा सेक्रेटरी म्हणून श्री. के. व्ही. प्रभू व खजिनदार म्हणून श्री. डी. वाय. पाटील यांची निवड …

Read More »

मोहन कारेकर यांची जायंट्स विशेष समिती सदस्यपदी पुनर्निवड

  बेळगाव : बेळगावमध्ये जायंट्सची पाळेमुळे रोवण्यासाठी परिश्रम घेतलेल्या संस्थापक सदस्य मोहन कारेकर यांची जागतिक स्तरावर काम करणाऱ्या जायंट्स इंटरनॅशनल या सेवाभावी संस्थेच्या विशेष समिती सदस्यपदी २०२४ सालाकरिता पुन्हा एकदा निवड करण्यात आली. बेळगाव जायंट्स मध्ये त्यांनी अनेक पदे भूषविल्या नंतर गोवा कर्नाटक फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट काम केले त्यानंतर …

Read More »

विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होणं गरजेचं : पी. पी. बेळगावकर

  बेळगाव : विद्यार्थी हा मातीचा गोळा असतो, त्याला घडवणं हे शिक्षकांचं काम असतं. त्यांच्या अंतरंगातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी अशा स्पर्धा घेणं गरजेचं आहे मनन, चिंतन करून वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कार्य करावे. उद्याचा नागरिक हा राष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्नशील असायला हवा. ग्रंथ वाचन, लेखन करणे भावी वाटचालीसाठी …

Read More »

“फूड पार्क” एकाच छताखाली विविध खाद्यपदार्थांची चवं चाखण्याची संधी…

  बेळगाव : खवय्यांना एकाच छताखाली देश-विदेशातील विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची एकत्रित चवं चाखता यावी, यादृष्टीकोनातून बेळगाव नेहरूनगर येथील ‘फूड पार्कने’ स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांसह पुनरागमन केले आहे. याबाबत शनिवार (दि. ६ एप्रिल) रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल रायबागी आणि ध्रुव पटेल यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. या पत्रकार परिषदेत ‘फूड पार्क’ …

Read More »

राष्ट्रीय प्यारा जलतरण स्पर्धेत ओम व संचिताला सुवर्णपदके

  बेळगाव : नुकत्याच मध्य प्रदेश येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय पेरा ऑलिम्पिक तसेच मांड्या म्हैसूर येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धेत बेळगावच्या आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटुनी सहा सुवर्ण पदके पटकाविली. कुमार ओम जुवळी याने मांड्या म्हैसूर येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय स्पेशल ऑलिम्पिकमध्ये कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करताना 100 …

Read More »

बटलरच्या नाबाद शानदार शतकाच्या जोरावर राजस्थानकडून आरसीबीचा सहा गडी राखून पराभव

  जयपूर : आयपीएल २०२४ मधील १९ वा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने होते. ज्यामध्ये राजस्थानने आरसीबीचा विकेट्सनी पराभव करत यंदाच्या हंगामातील सलग चौथा विजय नोंदवला. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने विराट कोहलीच्या नाबाद शतकाच्या जोरावर …

Read More »

चंद्रकांत कोंडुसकर, प्रा. आनंद आपटेकर यांचे म. ए. समितीकडे अर्ज दाखल

  बेळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी समितीच्या वतीने उमेदवारी अर्ज मागवण्यात आले होते. आज शनिवार दि. ६ एप्रिल रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीकडे चंद्रकांत कोंडुसकर आणि आनंद आपटेकर यांनी अर्ज दाखल केला. समिती नेते मदन बामणे, अंकुश केसरकर व श्रीकांत कदम यांनी अर्ज स्वीकारला. महाराष्ट्र एकीकरण समितीने लोकसभा निवडणुक लढविण्याचा निर्धार …

Read More »