Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

बेकायदेशीर दारू साठ्यावर पोलिसांचा छापा; एकाला अटक

  बेळगाव : गोव्यातील दारू साठा बेळगावात साठवून बेकायदेशीर मार्गाने विक्री करणाऱ्या आरोपीच्या घरावर बेळगाव पोलिसांनी छापा टाकून दारू जप्त करून आरोपीला अटक केली. शहापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. अटक केलेल्या आरोपीचे नाव सुभाष सुधीर डे (४६ रा. महाद्वार रोड) असे आहे. त्याने शहापूर येथील हुलबत्ते कॉलनीतील पहिल्या …

Read More »

बोलेरो आणि परिवहन बस यांच्यात भीषण अपघात: एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

  यादगिरी : यादगिरी जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील मद्दरकी जवळ राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री बोलेरो आणि परिवहन बस यांच्यात भीषण अपघात झाला असून यात चार जण जागीच ठार झाले आहेत. शरणप्पा (30), सुनिता (19), सोमव्वा (50) आणि थंगम्मा (55) अशी मृतांची नावे आहेत, ते सर्व वर्कनहळ्ळी गावातील रहिवासी आहेत. इतर अनेक …

Read More »

संस्कारच आयुष्यभर उपयोगी पडतील : आप्पासाहेब गुरव

  बेळगाव : “बालपणीच मुलांवर संस्कार केले तर आयुष्यभर ते उपयोगी ठरतात. आज संपन्न होत असलेल्या शिबिरामध्ये अनेक विद्यार्थ्यांवर योगाबरोबरच जे संस्कार करण्यात आले ते त्यांना आयुष्यभर उपयोगी पडतील” असे विचार मराठा मंदिर चे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव यांनी बोलताना व्यक्त केले. योग विद्याधाम फाउंडेशनच्या वतीने मराठा मंदिर ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात …

Read More »

बेळगावात अमानुष घटना; दारू पाजून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

  बेळगाव : गेल्या तीन वर्षांपासून नराधम व अल्पवयीन मुलगी यांच्यात मैत्री होती. या मैत्रीचा गैरफायदा घेऊन अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उशिरा उघडकीस आली आहे. बेळगाव येथील औरंगजेब (23) याचे गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना ओळख होती. ओळखीतून मैत्री झाली. नराधम वारंवार दारूच्या नशेत मुलीच्या घरात …

Read More »

भगवान महावीर जयंतीची भव्य शोभायात्रा उत्साहात!

  बेळगाव  : भगवान श्री महावीर जयंती निमित्त बेळगावात भव्य शोभयात्रा, काढण्यात आली. शोभयात्रेत हजारो अबालवृद्ध सहभागी झाले होते. शहरातील भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव समितीच्यावतीने आयोजित आजच्या शोभायात्रेला धर्मवीर संभाजी चौकातून प्रारंभ झाला. शोभायात्रेत शहरातील दिगंबर, श्वेतांबर, मूर्ती पूजक स्थानकवासी (तेरापंथी) जैन समाजातील अबालवृद्ध शेकडोच्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये …

Read More »

भगवान महावीर जन्म कल्याण निमित्त निपाणीतील शोभायात्रेला समाज बांधवांची गर्दी

  निपाणी (वार्ता) : अहिंसा परमो धर्मः असा संदेश देणाऱ्या तसेच संपूर्ण जगाला पंचशील तत्त्वे देणाऱ्या भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक सोहळा गुरूवारी (ता.१०) शहरासह परिसरात साजरा करण्यात आला. यावेळी ठिकठिकाणी भगवान महावीर यांच्या प्रतिमेची मिरवणूक आणि शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील गुजरी पेठ येथील चंद्रप्रभू श्वेतांबर बस्तीमध्ये भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव …

Read More »

चांद शिरदवाड येथे १४ पासून पंचकल्याण महोत्सवाचे आयोजन

  डॉ. अविनाश पाटील; ७ दिवसात विविध कार्यक्रम निपाणी (वार्ता) : चांद शिरदवाड (ता. निपाणी) येथे १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात नूतन १००८ सुपार्श्वनाथ तीर्थंकर मूर्ती प्रतिष्ठापना पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव सोमवार (ता.१४) ते रविवार (ता.२०) अखेर होणार आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर कमिटीचे …

Read More »

कणकुंबी शाळेचा 129 वा शतकोत्तर रौप्यमहोत्सव कार्यक्रम 15 एप्रिलला

  खानापूर : कणकुंबी, ता. खानापूर – सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा, कणकुंबी (ता. खानापूर) ही शाळा आपल्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने 15 एप्रिल 2025 मंगळवार रोजी एक भव्य कार्यक्रम आयोजित करीत आहे. या शाळेची स्थापना 1895 साली झाली असून, या संस्थेने 129 वर्षांची गौरवशाली वाटचाल पूर्ण केली आहे. या सोहळ्यासाठी …

Read More »

26/11 चा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आणले

  नवी दिल्ली : 26/11 च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आले आहे. तहव्वुर राणा याला आणणारे स्पेशल विमान इंडियन एअरस्पेसमध्ये दाखल झाले आहे. दिल्लीत हे विमान लँड झाले आहे. पालम विमानतळावरून त्याला एनआयएच्या हेडक्वॉर्टरला नेलं जाणार आहे. पालम विमानतळावर सुरक्षा यंत्रणांचा अभूतपूर्व बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चार इनोव्हा, …

Read More »

पुस्तके वाचून आंबेडकर, फुले जयंतीचा संकल्प डॉ. आंबेडकर विचार मंचचा उपक्रम

  निपाणी (वार्ता) : समाजातील शोषित आणि वंचितांना माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या महापुरुषाने आयुष्य घालवले अशा महापुरुषांनी अपार हाल अपेष्टा सोसून वास्तवादी वाचनाचा संकल्प केला आहे. या वाचनातून त्यांना समाजातील भीषण परिस्थिती समजली आणि म्हणूनच त्यांनी समाजातील जातीय व्यवस्था व वर्णव्यवस्था याविरुद्ध संघर्ष केला. सामान्यातल्या सामान्य माणसाला माणूस म्हणून जगण्याचा …

Read More »