Sunday , March 8 2026
Breaking News

Belgaum Varta

लक्ष्मीबाई जयवंत कोंडुस्कर प्रतिष्ठानच्या वतीने पहिलीच्या विद्यार्थ्यांना दप्तर (स्कूल बॅग)चे वाटप

  बेळगाव : समाजाचे आपणही काहीतरी देणं लागतो या भावनेने नेहमी समाजहितासाठी कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते श्रीरामसेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर तसेच त्यांचे बंधू चंद्रकांत कोंडुस्कर यांनी लक्ष्मीबाई जयवंत कोंडुस्कर प्रतिष्ठानच्या वतीने मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दप्तर (स्कूल बॅग)चे वाटप करण्यात आले. दि. 1 जुलै रोजी …

Read More »

मुसळधार पावसाची शक्यता; सतर्कतेचा इशारा

  बेंगळुरू : आठवड्याभरात कर्नाटक राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दक्षिण कन्नड, उडुपी, उत्तर कन्नड जिल्हे आणि डोंगराळ प्रदेशातील शिमोगा आणि चिक्कमंगळूरू जिल्ह्यांसारख्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे उत्तर कन्नड, दक्षिण कन्नड, उडुपी, चिक्कमंगळूरू आणि शिमोगा आदी जिल्ह्यात यलो अलर्ट …

Read More »

एल. एन. कंग्राळकर यांच्या “हेची माझे सुख” पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

  बेळगाव : येथील निवृत्त मुख्याध्यापक एल. एन. कंग्राळकर यांनी लिहिलेल्या “हेची माझे सुख” या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा गेल्या शनिवारी हॉटेल नेटिव्हच्या सभागृहात संपन्न झाला. शब्दशिवार प्रकाशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रा. सुभाष सुंठणकर हे होते. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर इंद्रजीत घुले यांनी प्रास्ताविकात …

Read More »

जायन्ट्स ग्रुपतर्फे डॉक्टर्स डे साजरा

  बेळगाव : “मनुष्याच्या जीवनात दोन व्यक्तींना अनन्यसाधारण महत्त्व आहे त्या म्हणजे शिक्षक आणि डॉक्टर, शिक्षक हा माणसाला घडवतो तर डॉक्टर हा माणसाला वाचवतो, त्यामुळे डॉक्टर हा पृथ्वीवरचा देवच आहे, त्याने फक्त सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून काम करावे” असे आवाहन प्रा. संध्या देशपांडे यांनी बोलताना केले. येथील जायन्ट्स ग्रुप ऑफ …

Read More »

पोलिसांच्या भीतीने कृष्णा नदी ओलांडताना बोट उलटली; ६ जण बुडाले

  देवरहिप्परगी : विजयपूर जिल्ह्यातील कोल्हार तालुक्यातील बळोती जॅकवेलजवळील कृष्णा नदीत बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, कृष्णा नदीकाठी एक टोळके जुगार खेळत होते. याचा सुगावा लागताच पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांच्या भीतीने टोळक्याने लागलीच नदीत असलेल्या बोटीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. …

Read More »

पद्मश्री कॉ. प्रेमा पुरव यांचे निधन

  पुणे : गोवामुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, सीमालढा याचबरोबर मुंबईतील श्रमजीवी जनतेच्या लढ्यात अग्रभागी राहून लढलेल्या नेत्या पद्मश्री कॉ. प्रेमा पुरव यांचे मंगळवार दि. २ जुलै रोजी पहाटे निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात डॉ. मेधा सामंत पुरव, विशाखा पुरंदरे व माधवी कोलंकारी या तीन कन्या, जावई, …

Read More »

बेळगावात बनावट नोटा छापणारी टोळी गजाआड

  बेळगाव : गोकाक-बेळगाव रस्त्यावरील कडबगट्टी गावातून जाणाऱ्या रस्त्याने प्रवास करणाऱ्या कारची तपासणी केली असता, 100 व 500 रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्याने पाच जणांना अटक करण्यात आली, अशी माहिती बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमा शंकर गुळेद यांनी दिली. सकाळच्या गस्तीवरील पोलिसांनी केलेल्या तपासणीत हे प्रकरण उघडकीस आले. मुडलगी …

Read More »

रोटरी क्लब ऑफ बेळगाव इलाईटतर्फे सीए आणि डॉक्टर्स डे साजरा

  बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव इलाईटतर्फे सीए आणि डॉक्टर्स डे दि. १ जुलै रोजी श्रीराम इन्होवेशन्सच्या सभागृहात पार पडला. याप्रसंगी डॉ. अरुणकुमार जमदाडे, डॉ. अभिनंदन हंजी, सीए राजेंद्र बर्वे आणि सीए राजेंद्र मुंदडा यांचा सत्कार करण्यात आला. सुरुवातीला अध्यक्ष सचिन हंगिरगेकर यांनी सर्वांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. त्यानंतर …

Read More »

आमदार सतेज पाटील यांच्याकडून पाटील कुटुंबियांचे सांत्वन

  निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, कोल्हापूरचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी बोरगाव येथे भेट देऊन रावसाहेब पाटील कुटुंबियांचे सांत्वन केले. आमदार बंटी पाटील यांनी, रावसाहेब पाटील हे अत्यंत संघर्षमय जीवन जगले. त्यातून आलेल्या अनुभवातून सहकार, सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रात यश मिळवले. कोणत्याही पदाची अपेक्षा न …

Read More »

सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन १०० हून अधिक जणांचा मृत्यू

  हाथरस : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशाच्या हाथरस येथील रतिभापूर गावात ही घटना घडली. या गावात आज साकार विश्व हरी भोले बाबा …

Read More »