नागपूर : पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्श कारने धडक देऊन दोघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच राज्यात आणखीही हिट अँड रनच्या दुर्दैवी घटना घडल्याचे समोर येत आहे. नागपूरमध्येही हिट अँड रनचा आणखी एक प्रकार उघडकीस आला असून भरधाव वेगाने आलेल्या कारने फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडल्याचे समोर आले आहे. या …
Read More »मालगाडीची कंचनजंगा एक्सप्रेसला धडक; पाच जणांचा मृत्यू, २५ जखमी
पश्चिम बंगालमध्ये मालगाडीने कंचनजंगा एक्सप्रेसला धडक दिल्याने रेल्वेचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास न्यू जलपाईगुडी येथे ही घटना घडली. दरम्यान, मालगाडीने धडक दिल्यानंतर कंचनजंगा एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरले होते. एएनआयने दिलेल्या …
Read More »मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला इंधन दरवाढीचा बचाव
विकास कामासाठी वापराची ग्वाही बंगळूर : लोकसभा निवडणुकीत हमी योजनांचा काँग्रेसला फारसा फायदा झाला नाही. दरम्यान, राज्यात विकासाची गती मंदावली असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, राज्य सरकारने काल इंधनाच्या दरात तीन रुपयांची वाढ जाहीर केली होती. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या निर्णयाचा बचाव केला. दरवाढ होऊनही राज्यातील इंधनाचे दर देशातील …
Read More »सिक्कीमध्ये हाहा:कार; महाराष्ट्रातील २८ जण संकटात अडकले
सिक्कीम येथे ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. या पावसामुळे १५०० ते २००० पर्यटक अडकले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील देखील अनेक पर्यटक अडकले आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडकलेल्या पर्यटकांपैकी काही जणांशी फोनवरुन संवाद साधला. या सर्व अडकलेल्या पर्यटकांची विचारपूस करुन त्यांना मुख्यमंत्र्यांनी धीर दिला आहे. सिक्कीममधील …
Read More »गंगास्नान करायला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; १७ जणांना घेऊन जाणारी बोट नदीत बुडाली
पाटणा : बिहारची राजधानी पाटणामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गंगास्नान करण्यासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातलाय. १७ जणांना घेऊन जाणारी बोट गंगा नदीत बुडाली. ११ जणांचे प्राण वाचले. पण ६ जण बेपत्ता झाले आहे. स्थानिक नागरिक आणि रेस्क्यू टीमकडून बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे. बचावकार्य युद्धपातळीवर …
Read More »बेळगावात मर्यादेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ३० हून अधिक ऑटो जप्त
बेळगाव : बेळगाव शहरात वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवून विहित मर्यादेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक करून नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली ३० हून अधिक ऑटो जप्त केले आहेत. नुकत्याच शाळा सुरू झाल्या असून शाळेतील मुलांना शाळेत सोडणे हे पालकांसमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना शाळेत सोडण्यासाठी ऑटो रिक्षा आणि विविध …
Read More »अर्भक विक्री प्रकरणाला धक्कादायक वळण; डॉक्टरच्या फार्महाऊसमध्ये आढळले तीन भ्रूण
बेळगाव : अर्भक विक्री प्रकरणाला धक्कादायक वळण लागले असून आरोपी असलेला डॉक्टर अब्दुलगफार लाड खान यांच्याकडून भ्रूण हत्या झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या सूचनेवरून पोलीस, आरोग्य विभाग आणि एफएसएल पथकाने आज (१६ जून) कित्तूर तालुक्यातील तिगडोळी गावाजवळील बनावट डॉक्टराच्या फार्महाऊसची तपासणी केली असता शेतात …
Read More »चलवेनहट्टी येथे बटाटा लावणी जोमात
बेळगाव : चलवेनहट्टी येथे बटाटा लावणी जोमात असून बटाटा लावणीसाठी शेतकऱ्यांचा धावपळ सुरु आहे. आठवड्याभरापूर्वी पावसाने दमदार हजेरी लावून उघडीप दिल्याने बटाटा लावणीला योग्य हंगाम निर्माण झाले आहे.आडीज ते तीन महिन्यात येणारे हे पीक चलवेनहट्टी, अगसगे हंदिगनूर, म्हाळेनहट्टी, मण्णीकरे, केदनूर, कडोली, बोरकेनहट्टी या भागात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सध्या …
Read More »“लक्ष्या- बाळ्या” हटाव मोहिमेचा खरा सूत्रधार “दिग्गुभाई”च!
बेळगाव शहरात सध्या चर्चेत असणाऱ्या “त्या” बँकेच्या अध्यक्षांचे प्रताप हे दिवसागणिक आणखीनच उघडे पडत आहेत. मुळात अध्यक्ष झाल्यानंतर केलेला गैरकारभार हा ट्रेलरच म्हणावा लागेल कारण खरा पिक्चर तर अध्यक्ष होण्याआधीपासूनच “दिग्गुभाई”ने सुरू केला होता. 2020 साली पार पडलेल्या बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या आदल्या रात्री “दिग्गुभाई”ने लक्ष्या-बाळ्या हटाव (समाजाच्या नावाची) बँक …
Read More »येळ्ळूरच्या महिला कुस्तीपटूंचे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत यश
बेळगाव : गोवा येथे राष्ट्रीय स्तरावर खेळ प्राधिकरण टी ए एफ् आय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत येळ्ळूरच्या महिला कुस्तीपटूनी घवघवीत यश संपादन केले. म्हापसा येथील पेडम स्पोर्टस कॉम्प्लेक्स गोवा येथे आयोजित कुस्ती स्पर्धेत बेळगाव, गोवा, केरळ, आंध्रप्रदेशातील स्पर्धकांनी भाग घेतला होता. यात कु. आराध्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta