जालना : राज्यात पुन्हा एकदा मराठा आंदोलनाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. पोलिसांनी उपोषणाला परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. पोलिसांनी परवानगी नाकारली तरी मी आमरण उपोषणावर ठाम असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. यावेळी जरांगेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस हे चांगलं काम …
Read More »लोकशाहीवरील विश्वास उडवण्याचा प्रयत्न, विरोधकांचे मोठे षडयंत्र; पंतप्रधान मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेतेपदी आज निवड झाली आहे. त्यानंतर त्यांनी महायुतीतील सर्व मित्रपक्षांचे आभार मानले आहेत. तसेच यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले आहे. पंतप्रधान मोदी त्यांच्या भाषणात म्हणाले की, इंडिया आघाडी ४ जूनपूर्वी सतत ईव्हीएमला नावं ठेवत होती. जनतेचा भारताच्या …
Read More »हलशी येथील छत्रपती शिवाजी विद्या मंदीर हायस्कूल येथे वृक्षारोपण
खानापूर : वृक्ष संवर्धनासाठी सर्वांनी पुढे येणे गरजेचे असून वृक्ष लागवड करून न थांबता त्यांची वाढ चांगल्या प्रकारे व्हावी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुख्याध्यापक किरण देसाई यांनी केले आहे. पर्यावरण दिनानिमित्त हलशी येथील छत्रपती शिवाजी विद्या मंदीर हायस्कूल येथे विविध झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना …
Read More »एकनाथ शिंदेंचे आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात
मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक निकालांनी संपूर्ण देशाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. राज्यातील जनतेनं महाविकास आघाडीच्या बाजूनं कौल दिल्याचं निवडणूक निकालाअंती पाहायला मिळालं. महायुतीला राज्यात अवघ्या 17 जागा मिळाल्या आहेत, तर महाविकास आघाडीचा 31 जागांवर विजय झाला आहे. आता लोकसभेच्या निवडणूक निकालांनंतर राज्यातील काही राजकीय समीकरणं बदलण्याच्या चर्चा सुरू …
Read More »मच्छे येथे शिवराज्याभिषेक दिन विविध उपक्रमांनी साजरा
बेळगाव : मच्छे (तालुका बेळगाव) येथे शिवराज्याभिषेक दिन विविध उपक्रमाद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या महिलांच्या हस्ते करण्यात आले. गावच्या विकासासाठी झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. गावच्या स्मशानभूमीमध्ये संपूर्ण स्वच्छता करून पाण्याची सोय, वृक्षारोपण व सुंदर बाग …
Read More »कॅनडास्थित स्वप्ना तेंडुलकर यांच्यातर्फे निपाणीत वृक्षारोपण
निपाणी (वार्ता) : गोरेगाव (मुंबई) येथील मनीषा मेहता यांच्या कॅनडास्थित भगिणी स्वप्ना तेंडुलकर यांनी येथील उद्यानाला पर्यावरण दिनानिमित्त २५ हजार रुपयांची विविध प्रकारची रोपे दिली. पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले आणि शिक्षिका अपूर्वा चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. येथील लेटेक्स कॉलनीमधील नियोजित विश्वकर्मा उद्यानामध्ये पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या हस्ते …
Read More »निपाणी मतदारसंघाचा कायापालट करणार : खासदार प्रियांका जारकीहोळी
निपाणीत शुभेच्छांचा वर्षाव निपाणी (वार्ता) : चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील निपाणी विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी आपल्यावर विश्वास ठेवून लोकसभेमध्ये पाठवले आहे. त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी निपाणी मतदारसंघाचा विकासाच्या माध्यमातून कायापालट करण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही नूतन खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी दिली. खासदारपदी निवड झाल्यानंतर प्रियांका जारकी होळी यांनी पहिल्यांदाच निपाणी मतदारसंघात …
Read More »सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेचा पाकिस्तानवर विजय
न्यूयॉर्क : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अमेरिकेने पाकिस्तानला पराभवाचे पाणी पाजले. यजमान अमेरिकेने सुपर ओव्हरमध्ये अनपेक्षित निकाल नोंदवला. अ गटातील अमेरिकेचा हा सलग दुसरा विजय ठरल्याने ते ४ गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचले आहेत आणि त्यांच्या सुपर 8 च्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या सामन्यात नितीश कुमार गेमचेंजर ठरला.. शेवटच्या …
Read More »सीआयएसएफ महिला जवानाने लगावली कंगना रणौतच्या कानशिलात!
चंदीगड : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या चर्चेत आली आहे. कंगना रणौत मंडी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली असून ती आज दिल्लीला रवाना झाली. चंदीगड विमानतळावर सीआयएसएफच्या महिला जवानाने कंगना रणौतच्या कानशिलात लगावल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा अभिनेत्री कंगना रणौत चंदिगड विमानतळावर पोहोचली तेव्हा एका महिला सीआयएसएफच्या …
Read More »अपघात घडवून केला खून; पाच जणांना अटक
बेळगाव : खुन करण्याच्या उद्देशाने रस्त्याने पायी जाणाऱ्या बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमधील चीफ डेप्युटी फार्मासिस्ट वीरुपाक्षप्पा हर्लापूर यांचा कारने धडक देऊन ठार केल्याच्या गुन्ह्याचा छडा बेळगाव शहर रहदारी आणि एपीएमसी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी लावला असून खुनाच्या गुन्ह्याखाली 5 जणांना अटक केली आहे. गदग जिल्ह्यातील बेटगेरी येथील रहिवासी असलेल्या सुरेश हर्लापूर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta