Monday , September 21 2026
Breaking News

हलशी येथील छत्रपती शिवाजी विद्या मंदीर हायस्कूल येथे वृक्षारोपण

Spread the love

 

खानापूर : वृक्ष संवर्धनासाठी सर्वांनी पुढे येणे गरजेचे असून वृक्ष लागवड करून न थांबता त्यांची वाढ चांगल्या प्रकारे व्हावी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुख्याध्यापक किरण देसाई यांनी केले आहे.
पर्यावरण दिनानिमित्त हलशी येथील छत्रपती शिवाजी विद्या मंदीर हायस्कूल येथे विविध झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक देसाई यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या भागात देखील वृक्ष लागवड करून त्याचे महत्त्व आपल्या परिसरात सांगावे. दरवर्षी ठिकठिकाणी वृक्ष लागवड केली जाते मात्र त्याचे संवर्धन केले जात नसल्याचे दिसून येते त्यामुळे वृक्ष लागवड करण्याबरोबरच त्याचे संवर्धन व्हावे यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले.
प्रारंभी सह शिक्षिका पी. के. काकतकर व भाग्याग्री दळवी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. स्वागत शंकर रागी पाटील यानी केलें शशीकांत कांबळे, एस. जी. दड्डीकर व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *