नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेतेपदी आज निवड झाली आहे. त्यानंतर त्यांनी महायुतीतील सर्व मित्रपक्षांचे आभार मानले आहेत. तसेच यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले आहे. पंतप्रधान मोदी त्यांच्या भाषणात म्हणाले की, इंडिया आघाडी ४ जूनपूर्वी सतत ईव्हीएमला नावं ठेवत होती. जनतेचा भारताच्या लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास उडवण्याचा विरोधकांचा प्रयत्न होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ईव्हीएमने ईव्हीएमने त्यांना गप्प केले. हीच भारताच्या लोकशाहीची ताकद असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. एनडीए आघाडी ही भारतातील सर्वात यशस्वी निवडणूकपूर्व आघाडी आहे. मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. एवढ्या मोठ्या गटाचे स्वागत करण्याची संधी मला मिळाली, ही आनंदाची बाब आहे, विजयी झालेले सर्व मित्र अभिनंदनास पात्र असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.
विरोधी इंडिया आघाडीवर निशाणा साधत मोदी म्हणाले की, निवडणुकीदरम्यान दर तिसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाचे दरवाजे ठोठावले जात होते. त्यात अडथळे कसे निर्माण करता येतील, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात होते. निवडणुकीदरम्यान आयोगाने प्रचंड खर्च केला होता. कोर्टात वेळ गेलो, हे विरोधकांचं मोठं षडयंत्र आहे. यासाठी देश त्यांना माफ करणार असा घणाघात मोदींनी इंडिया आघाडीवर केला आहे. दहा वर्षांनंतरही काँग्रेस शंभरचा आकडा गाठू शकली नाही. गेल्या तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसला जितक्या जागा मिळाल्या आहेत, तितक्याच जागा या निवडणुकीत भाजपला मिळाल्या आहेत.
मोदी म्हणाले की, २०२४च्या लोकसभेचे निकाल जगाने स्वीकारले आहे. हा एनडीएचा मोठा विजय आहे. गेल्या दहा वर्षांत मी सभागृहातील चर्चेला मुकलो होतो. आता मला आशा आहे की, विरोधी पक्षनेते राष्ट्रहितासाठी चर्चा करतील. ते आमच्या विरोधी पक्षात आहेत, देशाच्या विरोधात नसल्याचं देखील मोदींनी म्हटलं आहे. तुम्ही मला पुन्हा एकदा जबाबदारी देत आहात, याचा अर्थ असा की आपच्यातील विश्वासाचा नातं अतुट आहे, असं मोदी म्हणाले आहेत.