Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

‘दंगल’ फेम अभिनेत्री सुहानी भटनागरचं निधन, अवघ्या १९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

  नवी दिल्ली : आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटात छोट्या बबिता फोगाटची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागर हिचं अवघ्या १९ व्या वर्षी निधन झालं आहे. अभिनेत्रीच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीयांसह तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ‘दंगल’ चित्रपटानंतर ती मोठ्या पडद्यापासून दूर होती. याशिवाय सुहानी सोशल मीडियावर देखील सक्रिय नव्हती. जागरणने दिलेल्या …

Read More »

बैलहोंगल तालुक्यातील होसुर गावात तरुणाची हत्या

  बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील होसुर गावात शुक्रवारी सायंकाळी एका २५ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. मंजू कोलकार असे हत्या झालेल्या युवकाचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे. वकुंद गावातील मंजू आपल्या मित्रासोबत बहिणीला औषध देण्यासाठी होसुर येथे गेला होता. खून मित्रानेच केल्याचा संशय असून मुरुगोड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास …

Read More »

११४ कोटींच्या घोटाळ्यात चंद्राबाबू नायडू मुख्य आरोपी; सीआयडीकडून आरोपपत्र दाखल

  नवी दिल्ली : आंध्र प्रदेशमध्ये विरोधकाची भूमिका निभावणारे तथा माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या अडचणी वाढल्या आहेत. साधारण ११४ कोटी रुपयांच्या कथित एपी फायबरनेट घोटाळ्यात गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) त्यांना मुख्य आरोपी केले आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने विजयवाडाच्या एसीबी न्यायालयात शुक्रवारी (१६ फेब्रुवारी) एपी फायबरनेट घोटाळ्याबाबत आरोपपत्र दाखल केले. …

Read More »

वीर सौध योगा केंद्रातर्फे रथसप्तमी जागतिक सूर्यनमस्कार दिन‌ साजरा

  टिळकवाडी : येथील वीर सौध योगा केंद्रातर्फे जागतिक सूर्यनमस्कार दिन‌ व‌ रथसप्तमी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. उषा दळवी यांनी अग्निहोत्र करून विधीवत मंत्रोच्चार केले. वाय. पी. नाईक यांनी प्रास्ताविक करुन उपस्थितांचे स्वागत केले. रथसप्तमी भगवान सूर्यनारायण चा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. पद्मपुराणानुसार या दिवशी पहिल्यांदाच सूर्याची किरणे …

Read More »

न्याय निवाडा लोकनेता फाऊंडेशन, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी प्रा. डॉ. नागेंद्र जाधव

  कोल्हापूर : न्याय निवाडा लोकनेता फाऊंडेशन रजि. दिल्ली, मुख्यालय हुपरी जि. कोल्हापूर संस्थापक अध्यक्ष नामदेवराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आजरा येथे झालेल्या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी प्रा. नागेंद्र जाधव यांच्या निवडीचे पत्र व ओळखपत्र देण्यात आले. यापूर्वी प्रा. जाधव हे न्याय निवाडा लोकनेता फाऊंडेशन कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदी कार्यरत होते. …

Read More »

कोल्हापूरच्या सुपुत्री लीना नायर यांना ग्लोबल इंडियन पुरस्कार

  मुंबई : कोल्हापूरच्या सुपुत्री फ्रान्समधील जगप्रसिद्ध शॅनेल या फॅशन जगतातील बड्या कंपनीच्या सीईओ लीना नायर यांची यंदाच्या इकॉनॉमिक टाइम्सच्या ग्लोबल इंडियन पुरस्कारासाठी निवड झाली आहे. इकॉनॉमिक टाईम्सने कॉर्पोरेट जगतात उत्तम कामगिरी करणार्‍या व्यक्तींसाठी सात पुरस्कारांची घोषणा केली असून त्यात लीना नायर यांचा समावेश आहे. या पुरस्कारांत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर …

Read More »

मध्यवर्ती म. ए. समिती शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट!

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज सायंकाळी कोल्हापूर येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर सीमाप्रश्न आणि सीमाभागातील मराठी भाषिकांचे प्रश्न यासंदर्भात चर्चा केली. यावेळी महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री श्री. शंभूराज देसाई, उद्योग मंत्री श्री. उदय सामंत, श्री. भरत गोगावले, श्री. संजय राठोड, आमदार श्री. राजेश क्षीरसागर …

Read More »

बेळगाव शहरातील एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी 450 कोटी

  बेळगाव : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज शुक्रवारी आपला विक्रमी 15 वा अर्थसंकल्प सादर केला असून ज्यामध्ये बेळगाव शहरातील गर्दी कमी करण्यासाठी 450 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या सहकार्याने बेळगाव शहरात 4.50 कि.मी. लांबीच्या एलिवेटेड कॉरिडोरचे बांधकाम केले जाणार आहे. वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी शहरांमध्ये राष्ट्रीय महामार्ग …

Read More »

कर्नाटक विधानसभेत अर्थसंकल्प सादर; ‘विकसित कर्नाटक माॅडेल’साठी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांकडून संकल्प!

  बेंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज (16 फेब्रुवारी) अर्थमंत्री म्हणून त्यांचा विक्रमी 15वा आणि सध्याच्या काँग्रेस सरकारमधील दुसरा अर्थसंकल्प सादर केला. कर्नाटक विधानसभेला संबोधित करताना सिद्धरामय्या यांनी सरकार संविधानात अंतर्भूत न्याय, समानता आणि बंधुत्वाच्या तत्त्वांवर आधारित ‘विकासाचे कर्नाटक मॉडेल’ म्हणून ओळखले जाणारे विकासाचे नवीन मानक स्थापित करण्यासाठी प्रयत्नशील …

Read More »

डॉ. विनोद गायकवाड यांच्या ‘मिडल क्लास’ कादंबरीस राज्यस्तरीय मातृस्मृती पुरस्कार

  बेळगाव : येथील प्रसिद्ध कादंबरीकार डॉ. विनोद गायकवाड यांच्या ‘मिडल क्लास’ या कादंबरीला श्री कामेश्वरी साहित्य मंडळ व स्वातंत्र्यसैनिक बाळकृष्ण विष्णूजी पाटील सामाजिक संस्था, कामेरी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली यांच्यावतीने 2023 सालचा राज्यस्तरीय मातृस्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील यांनी संस्थेच्या वतीने एका पत्रकाद्वारे …

Read More »