बेळगाव : प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि नर्सच्या हलगर्जीपणामुळे एका बाळंतीण महिलेचा आणि तिच्या नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. संतीबस्तवाड येथील या महिलेची किणये प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती झाल्यानंतर थोड्याच वेळात अतिरक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आलाय. बेळगाव तालुक्यातील संतीबस्तवाड गावातील २८ वर्षीय लक्ष्मी …
Read More »एसएसएलसी परीक्षा केंद्राभोवती २०० मीटर परिसरात संचारबंदी: जिल्हाधिकारी नितेश पाटील
बेळगाव : परीक्षेतील अनियमितता, अनावश्यक गोंधळ व गैरसोय होणार नाही यासाठी परीक्षा कर्मचाऱ्यांनी नीटनेटकी यंत्रणा निर्माण करून जबाबदारीने काम करावे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक ती तयारी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिल्या. शिक्षण विभागाच्या वतीने कुमार गंधर्व कला मंदिरात आज सोमवारी (१८ मार्च) आयोजित एसएसएलसी वार्षिक …
Read More »२०१६ पासून राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयुक्तांची नियुक्तीच नाही- माहिती अधिकारातून माहिती उघड
बेळगाव : कर्नाटक सरकार आपल्या राज्यातील विविध अल्पसंख्याक भाषिक समुदायाला दुय्यम वागणूक देत त्यांच्यावर कानडी वरवंटा फिरवीत आहे, राज्यात मराठी, तुळू ,कोकणी, तेलगू, तमिळ, मल्याळम, उर्दू इत्यादी भाषिक कर्नाटक राज्यात अल्पसंख्यांक आहेत, अलीकडेच कर्नाटक सरकारने कन्नड भाषा समग्र अभिवृद्धी कायदा करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक प्रशासन जनतेला वेठीस धरत …
Read More »लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बोरगाव चेकपोस्टवर वाहनांची कसून तपासणी
निपाणी (वार्ता) : लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर बोरगाव सर्कल येथे तालुका प्रशासन व पोलीस खात्यातर्फे चेकपोस्ट उभारणी करण्यात आली असून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. निवडणूक काळात पैसे, भेट वस्तू, मद्याची गैर वाहतूक होऊ नये. या वाहतुकीवर नजर असावी. यासाठी या ठिकाणी चेक …
Read More »मातृभाषेचे ऋण फेडण्याची शेवटची संधी…
(५) जितक्या सहजतेने सीमाभागातील लोक शासकीय आणि राजकीय गुलामगिरीत स्वतःला झोकून देत आहेत. तितकीच भीषण अवस्था भविष्यात मराठी भाषेची होणार आहे. मराठी भाषेच्या अस्तित्वावर आता अखेरची घंटा वाजत असताना राष्ट्रीय पक्षाच्या दावणीला बांधले गेलेले मराठी भाषिक मात्र वैयक्तिक आयुष्यात मश्गूल आहेत. त्याच्या दहापट जास्त भयानक आणि गंभीर अवस्था येणाऱ्या …
Read More »पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर वाठारजवळ अपघात; चार ठार
पेठवडगाव/नवे पारगाव/कोल्हापूर : पुणे-बंगळुरू महामार्गावर वठार तर्फ वडगाव येथे सेवा रस्त्यावर काँक्रीट मशीन लावताना भरधाव ट्रकने टेम्पोला पाठीमागून धडक दिली. रविवारी (दि. १७) रात्री साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चार सेंट्रिंग कामगार ठार झाले, तर दोन महिलांसह आठजण जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर सीपीआरमध्ये उपचार सुरू …
Read More »सीमाप्रश्नी पत्र मोहिमेत दिल्लीतील दाम्पत्याचाही सहभाग
बेळगाव : केंद्रीय गृहमंत्रालयाला १०१ पत्रांची मोहीम गेल्या चार दिवसापूर्वी राबविली होती, सीमाभागाच्या विविध भागातून नोंदणीकृत पत्र देशाच्या गृहमंत्र्यांना पाठवून केंद्राने हस्तक्षेप करावा, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, बेळगाव येथील समिती कार्यकर्ते किरण हुद्दार, रोहन लंगरकांडे, शिवाजी मेणसे आदींनी राबविलेल्या मोहिमेत …
Read More »ट्रॅक्टर-कार यांच्यात भीषण अपघात; तीन मुलांसह ७ जणांचा मृत्यू
पटना : बिहारमधील खगारिया येथे ट्रॅक्टर आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात तीन मुलांसह ७ जणांचा मृत्यू झाला. चौथम ब्लॉक परिसरात एका लग्नातून परतत असताना कार ट्रॅक्टरला धडकली. या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना गाडीतून बाहेर …
Read More »लोकअदालतीत ५ जोडपी विवाह बंधनात
निपाणीत राष्ट्रीय लोकअदालत; अनेक प्रकरणे निकाली निपाणी (वार्ता) : येथील अक्कोळ रोडवरील न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत झाली. त्यामध्ये वकिलांनी समुपदेशन करून घटस्फोटीत व घरगुती भांडणातून विभक्त झालेल्या ५ जोडप्यांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कागदपत्रांची पूर्तता करून या जोडप्यांचा पुनर्विवाह लावण्यात आला. वरीष्ठस्तर न्यायाधीश प्रेमा पवार यांनी ५ …
Read More »दीडशे वर्षांच्या प्रतीक्षेला लाभले भाग्य!
येळ्ळूर : सरकारी मराठी उच्च प्राथमिक माॅडेल शाळा येळ्ळूर शाळेची स्थापना सन् 1874 साली झाली. बरोबर 2024 यावर्षी शाळेला दीडशे वर्षे पूर्ण होतात. पण शाळेला आजपर्यंत क्रीडांगण नव्हते. सध्या शाळेची परिस्थिती पाहता शाळा भौतिक रूपाने गुणवत्तेने, अगदी समृद्ध आहे. पण विद्यार्थ्यांच्या शारीरिक गुणवत्तेत भर पाडण्यासाठी आणि एकंदरीत विद्यार्थ्यांच्या शारीरिक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta