Sunday , March 8 2026
Breaking News

Belgaum Varta

महायुती जागावाटपावर अंतिम निर्णय शक्य; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने आज दिल्ली गाठणार

  कोल्हापूर : राज्यात जागावाटपावरून महायुतीमध्ये ठिणग्यांवर ठिणग्या पडत असतानाच आज (8 मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्ली गाठणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी हातकणंगले तालुक्यातील कोरोचीमध्ये महिला मेळावा त्यांच्या उपस्थितीत होत आहे. या कार्यक्रमात बोलताना कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच दिल्लीला …

Read More »

मराठी शाळा देसूरमध्ये माता-पिता पूजन व विज्ञान प्रयोगालयाचे थाटात उद्घाटन!

  बेळगाव : मराठी शाळा देसूरमध्ये माता-पिता पूजन व विज्ञान प्रयोगालयाचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थीनींनी सादर केलेल्या सुमधुर अशा ईशस्तवन व स्वागतगीताने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती फोटो पूजन करून श्रीफळ महेश गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. …

Read More »

राज्यघटना वाचविण्यासाठी केंद्रात काँग्रेसची सत्ता आवश्यक : राजेंद्र पवार-वड्डर

  गळतगा येथे पत्रकार परिषद निपाणी (वार्ता) : देश आणि भारतीय राज्यघटना वाचवायची असेल तर केंद्रात काँग्रेस पक्ष सत्तेवर येणे गरजेचे आहे. त्यासाठी दीनदलित, गोरगरीब व मागासवर्गीयांनी येत्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करून केंद्रात काँग्रेसची सत्ता आणावी,असे असे आवाहन भोज माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर -पवार यांनी केले. गळतगा …

Read More »

ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाचा महिला दिनी अनोखा उपक्रम!

  खानापूर : मराठा मंडळ शिक्षण संस्था बेळगाव नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्वाचे दिन साजरे करून समाजासमोर एक वेगळा आयाम निर्माण करत आलेली एक आदर्शवत शिक्षण संस्था आहे. मराठा मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा डॉक्टर सौ. राजश्री नागराजू हलगेकर या अशा उपक्रमाबद्दल अग्रही भूमिका निभावत असतात. तसं पाहिलं तर …

Read More »

शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व सदिच्छा समारंभ उत्साहात संपन्न

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ नुकताच उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष श्री. नारायण पाटील. तर प्रमुख वक्ते म्हणून ज्योती कॉलेजचे माजी प्राचार्य एम. बी. निर्मळकर सर आणि प्रमुख पाहुणे म्हणून ज्योती …

Read More »

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कर्नाटक सरकार विरोधात युवा समितीच्या वतीने पत्र

  बेळगाव : कर्नाटक सरकारने कन्नड अभिवृद्धी समग्र कायदा विधानसभेत आणून सीमाभागात ६० टक्के कन्नड भाषा सक्ती राबविण्याचे धोरण अवलंबिले आहे. याचा फटका सीमाभागातील मराठी भाषिक उद्योजक, व्यापारी, कारखानदार यांना बसत आहे. देशाच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून सीमावासियांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने गृहमंत्री अमित …

Read More »

पट्टणकुडीत पाण्याच्या टाकीत पडून चार वर्षाच्या बालकाचा मृत्यू

  चिक्कोडी : नजीकच्या पट्टणकुडी (ता. चिक्कोडी) येथे पाण्याच्या टाकीत पडून चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. ७) सायंकाळी घडली. सक्षम भरतेश उपाध्ये असे मयत झालेल्या बालकाचे नाव आहे. घटनेची नोंद खडकलाट पोलिसात झाली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, उपाध्ये कुटुंब यांचे जैन बस्ती परिसरात घर आहे. …

Read More »

उत्साळीतील शेतकऱ्याचा मूलगा झाला कर निर्धारण अधिकारी; एकाच महिन्यात दोनदा अधिकारी

  तेऊरवाडी (एस. के. पाटील) : यश मिळवण्यासाठी मनात उच्य ध्येय असेल तर कोणतीच परिस्थिती आड येत नाही. आईवडील शेतकरी असतानाही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आकाशाला गवसणी घालता येथे याची प्रत्यक्ष प्रचिती उत्साळी (ता. चंदगड) येथील स्वप्नील कदम या शेतकऱ्या मुलांने सिद्ध केले. एकाच महिन्यात दोन वेगवेगळ्या पदांची परीक्षा उत्तीर्ण केल्याने …

Read More »

शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीसाठी तगादा लावल्यास आंदोलन

  रयत संघटनेचा इशारा; जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक निपाणी (वार्ता) : राज्यातील सरकारने अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. पण एकाही शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाईची रक्कम दिलेली नाही. आता मार्च एंडच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या कर्जाची सक्तीने वसुली केली जात आहे. ही वसुली तात्काळ न थांबवल्यास रयत संघटनेतर्फे बँकांच्या समोर आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचे …

Read More »

निपाणी नगरपालिकेत पाच शासननियुक्त नगरसेवक

  माजी मंत्री वीरकुमार पाटील : नगरसेवकांनी शहराचा विकास साधावा निपाणी (वार्ता) : कर्नाटकात काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर शासननियुक्त पदांच्या निवडी व्हाव्यात यासाठी आपणासह माजी आमदार काकासाहेब पाटील, चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी एकत्रित चर्चा केली. सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळावी, यासाठी या पदांवर योग्य नावांची शिफारस केली. त्यानुसार …

Read More »