कोलकाता : वनडे वर्ल्डकपच्या राऊंड रॉबीन लीगमध्ये भारतानंतर दुसर्या क्रमांकाचा यशस्वी संघ म्हणून गणला गेलेल्या दक्षिण आफ्रिकन संघाने ऐन मोक्याच्या क्षणी कच खाल्ली. कोलकाता येथे सेमीफायनल लढतीत ऑस्ट्रेलियाने त्यांच्यावर 3 विकेट्सने निसटता विजय मिळवून आठव्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला. आता 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर तीनवेळचा विश्वविजेता भारत आणि …
Read More »शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर शिंदे-ठाकरेंचे कार्यकर्ते भिडले, दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी
मुंबई : शिवसेना प्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले. दोन्ही बाजूंनी धक्काबुक्की आणि घोषणाबाजी झाल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करून गेल्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये राडा झाला. सध्या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून पोलिसांचा मोठा फौजफाटा …
Read More »खानापूर मेडिकल असोसिएशनतर्फे दलित महामंडळ अध्यक्ष लक्ष्मण मादार यांचा सत्कार
खानापूर : खानापूर मेडिकल असोसिएशनकडून दलित महामंडळाचे अध्यक्ष श्रीमान लक्ष्मण मादार यांचा सत्कार समारंभ पार पडला. कार्यक्रमाला असोसिएशनचे अधिकारी तसेच ज्येष्ठ डॉक्टर उपस्थित होते. लक्ष्मण मादर यांच्या कार्याचा आढावा घेतला आणि त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पाहुण्यांचा सत्कार असोसिएशनचे अध्यक्ष नाडगौडा यांच्या हस्ते करण्यात आला. व्यासपीठावर …
Read More »वडगाव चावडी, जनावरांचा दवाखाना समस्यांच्या विळख्यात
बेळगाव : वडगाव चावडी आणि जनावरांचा दवाखाना एकाच इमारतीत आहे. सदर इमारत मनपाच्या अखत्यारीत येते. त्याठिकाणी जनावरांचा दवाखाना आणि तलाठी कार्यालय आहे. मात्र या इमारतीत वीज जोडणी नाही की जनावरांना लागणारी औषधे ठेवण्यासाठी फ्रीजची सोय नाही. वारंवार मागणी करून देखील संबंधित लोकप्रतिनिधी किंवा शासकीय अधिकाऱ्यांनी देखील या मागणीकडे दुर्लक्ष …
Read More »महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडून बेळगावच्या पत्रकारांचा अपमान
बेळगाव : पत्रकार विरोधी वक्तव्य केल्याने बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात बेळगावातील पत्रकारांनी ठराव केला असून याची तक्रार प्रदेश काँग्रेस आणि एआयसीसीकडे करणार आहेत. महिला बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेळगावचे पत्रकार नालायक असल्याचं अत्यंत निंदनीय आणि अपमानास्पद वक्तव्य केलं होतं. त्याचा निषेध करण्यासाठी गुरुवारी कन्नड …
Read More »समाधीमठ गो शाळेला १० टन ऊस निपाणी व्यापारी वर्गाकडून अर्पण
निपाणी (वार्ता) : हिंदू धर्मामध्ये दीपावलीचा सण हा सर्वात मोठा सण मानला जातो. हा सण आपल्या परिवारासोबत साजरा करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपल्या परिवारासोबतच असते. या आनंदापेक्षा गोमातेच्या सेवेला महत्त्व देवून गो सेवा हीच ईश्वर सेवा, समजून हिंदू हेल्पलाइनच्या माध्यमातून ‘मी हिंदू धर्म रक्षक अभियान’ प्राणलिंग स्वामींनी चालू केले होते. …
Read More »निपाणीत चोरट्यानी घरातून ५१ हजाराचा मुद्देमाल लांबविला
चव्हाणवाडी येथील घटना निपाणी (वार्ता) : चोरट्यानी लक्ष्मीपूजनला पुजलेले एक तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र व एक हजाराची रोकड असा ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. गणेश बाळासाहेब शिंदे (रा. चव्हाणवाडी) असे चोरी झालेल्या घरमालकाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी, गणेश शिंदे यांच्या घरात …
Read More »खानापुरात उद्यापासून शस्त्र प्रदर्शन
खानापूर : खानापुर येथील शिव -स्वराज जनकल्याण फाउंडेशनच्या उद्घाटना निमित्त फाउंडेशनतर्फे लोकमान्य भवन येथे १७ ते १९ नोव्हेंबर पर्यंत शिवकालीन शस्त्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे प्रदर्शनाबाबत तालुक्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली असुन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांसह इतर मान्यवर मंडळींच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. शस्त्र …
Read More »लायन्स क्लब ऑफ बेळगाव टिळकवाडी सुवर्ण महोत्सव 18 नोव्हेंबरला
अरविंद संगोळी यांची माहिती बेळगाव – लायन्स इंटरनॅशनलची स्थापना 1917 मध्ये झाली होती. जगभरात लायन्सच्या वतीने सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. बेळगावत 1974 साली स्थापन झालेल्या लायन्स क्लब ऑफ बेळगाव टिळकवाडीचा सुवर्ण महोत्सव 18 नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे, अशी माहिती लायन्स क्लब ऑफ बेळगाव टिळकवाडीचे अध्यक्ष अरविंद …
Read More »मोहम्मद शामीचा विकेट्सचा ‘सत्ता’, भारत फायनलमध्ये
मुंबई : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करत भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतीय संघ चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. यापूर्वी टीम इंडिया 1983, 2003 आणि 2011 मध्ये या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. भारताने टॉस जिंकून पहिला फलंदाजी केली. त्यानंतर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta