निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात असलेल्या शाळांमध्ये अन्यायकारक शाळेचे शैक्षणिक शुल्क आकारले जाते आहे. शुल्क वसुली करताना जास्त रक्कम घेऊन कमी किमतीच्या पावत्या दिल्या जातात. याबाबत मानवाधिकार संघटनेने यापूर्वी राज्यातील शिक्षण खात्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी निपाणी येथील मानव अधिकार संघटना आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांना याबाबतचे पत्र लिहून …
Read More »पाल्याची कुवत ओळखून शिक्षण द्यावे
जुबेर बागवान; प्रेरणा दिनानिमित्त गुणवंतांचा सत्कार निपाणी (वार्ता) : शिक्षणाबरोबरच जीवन चांगल्या पद्धतीने जगण्याचे शिक्षण विद्यार्थ्यांनी घ्यावे. शिक्षणाने समाजाची सुधारणा होते.पालकांनी अनावश्यक अपेक्षांचे ओझे विद्यार्थ्यांवर न लादता पाल्याची कुवत ओळखून त्याला शिक्षण द्यावे. स्वतः जगत असताना इतरांनाही मदत करण्याचे आवाहन येथील सामाजिक कार्यकर्ते माजी सभापती जुबेर बागवान यांनी केले. …
Read More »निपाणीत अभुतपूर्व उत्साहात दुर्गामाता दौडीस प्रारंभ
निपाणी (वार्ता) : निपाणीत अभुतपुर्व उत्साहात दुर्गामाता दौडीस छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून प्रारंभ करण्यात आला. यावेळी पहाटे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तिचे पूजन ध्वज पूजन आणि शस्त्र पूजन, जगदेंबेची आरती श्रीमंत विजयराजे देसाई निपाणकर सरकार यांच्या हस्ते करून श्री दुर्गामाता दौड निपाणकर वड्यातून मार्गस्थ झाली. तेथून सटवाई रोड, कोठीवाले …
Read More »बेळगाव – दिल्ली विमानफेरीच्या वेळापत्रकात बदल
बेळगाव : बेळगाव – दिल्ली विमानफेरीला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार विमानफेरीच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार आता हे विमान सकाळच्या सत्रात बेळगावमध्ये दाखल होणार आहे. ५ ऑक्टोबरपासून बेळगाव- दिल्ली विमानफेरीचा शुभारंभ झाला. या दोन्ही शहरांतर्गत प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे विमानफेरीला उत्तम प्रतिसाद …
Read More »खोट्या कागदपत्रांद्वारे जमीन बळकावल्याप्रकरणी एकाची निर्दोष सुटका
बेळगाव : खोटी कागदपत्रे तयार करून स्वतःच्या भावालाच फसविल्याच्या आरोपातून एकाची खानापूर येथील जेएमएफसी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. संभाजी मारुती ओऊळकर (वय ७०, रा. गौळवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी विलास मारुती ओऊळकर आणि संशयित संभाजी हे सख्खे भाऊ आहेत. …
Read More »ज्येष्ठांनी घेतला सहलीचा आनंद…..
बेळगाव : टिळकवाडी -बेळगाव, येथील वीर सौध योगा केंद्रातर्फे एक दिवसाची सहल आयोजित करण्यात आली होती. बेळगाव ते नरसोबाची वाडी असा बसने प्रवास करण्यात आला. गुरुवार हा श्री दत्ताचा दिवस. हे औचित्य साधून आनंद घेतला. एस.टी. बस मोफत सेवेचा लाभ घेतला. रोज योगा करत असल्याने शरीर तंदुरुस्त होते. महिला, …
Read More »स्वामी विवेकानंद यांच्या बेळगाव भेटी स्मरणार्थ रामकृष्ण मिशन आश्रमातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन
बेळगाव : स्वामी विवेकानंदांनी बेळगावला दि. १६ ऑक्टोबर १८९२ रोजी भेट दिली होती. या भेटीच्या स्मरणार्थ रामकृष्ण मिशन आश्रमातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रिसालदार गल्लीतील स्वामी विवेकानंद स्मारक येथे दि. १६ रोजी सायंकाळी ५.४५ ते रात्री ८.३० या वेळेत विशेष सत्संग आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला …
Read More »प्रदेश काँग्रेसची पुनर्रचना करण्याच्या हालचाली
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर निर्णय बंगळूर : आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून प्रदेश काँग्रेसची पुनर्रचना करण्याच्या हालचाली सुरू आहेत. केपीसीसीसाठी नवीन कार्याध्यक्षासह नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव नेत्यांनी मांडला आहे. पुढील लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केलेल्या काँग्रेस पक्षाने निवडणुकीत अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी स्वत:ची रणनीती आखली असून, त्यानुसार केपीसीसीनेही पुनर्रचनेसाठी पावले …
Read More »व्ही. एस. पाटील हायस्कूलमधील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात
बेळगाव : मच्छे येथील व्ही. एस. पाटील हायस्कूलमधील सन 1993 ते 2003 या कालावधीतील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन नुकतेच खेळीमेळीत उत्साहाने पार पडले. स्नेहसंमेलनाची सुरवात राष्ट्रगीतानंतर शाळेचे दिवंगत विद्यार्थी व शिक्षकांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. त्यानंतर पहिले ते दहावीपर्यंत आपल्याला शिकवलेल्या शिक्षकांचे माजी विद्यार्थ्यांनी स्वागतगीत आणि ईशस्तवन सादर करून स्वागत …
Read More »हायव्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानला ७ विकेटने चिरडले
अहमदाबाद : अहमदाबाद येथील हायव्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा सात विकेटने सहज पराभव केला. आधी गोलंदाजांनी भेदक मारा करत पाकिस्तानला १९१ धावांत रोखले. त्यानंतर रोहित शर्माच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर १९२ धावांचे आव्हान ३०.३ षटकात ७ विकेट राखून सहज पार केले. भारताकडून रोहित शर्माने ८६ धावांची खेळी केली. त्याशिवाय श्रेयस अय्यर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta