Tuesday , March 10 2026
Breaking News

Belgaum Varta

‘महात्मा बसवेश्वर’च्या कुर्ली शाखेतर्फे सत्कार समारंभ

  निपाणी (वार्ता) : येथील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेच्या कुर्ली शाखेतर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी शाखेचे अध्यक्ष विनायक तेली होते. शाखेचे संचालक कुमार माळी यांनी प्रास्ताविक केले. शाखा संचालक प्रदिप बुधाळे यांची कागल येथील सर पिराजिराव प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. …

Read More »

मातोश्री बाहेर मोठा घातपात करणार?; महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला फोन

  मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर मोठा घातपाताचा प्रयत्न करणार असल्याचा फोन महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला आल्याची माहिती मिळत आहे. धमकी देणारे 4 ते 5 जण उर्दूत बोलत होते, अशी माहिती कंट्रोल रुमला फोन करणाऱ्या व्यक्तीनं दिली आहे. त्याचं संपूर्ण संभाषण ऐकल्याचा दावाही …

Read More »

…तर कानडी लोकांसाठींच्या महाराष्ट्रातील योजना रद्द करू : मंगेश चिवटे

  चंदगड : महाराष्ट्र सरकारने सीमा भागातील मराठी भाषिकांना लागू केलेल्या योजनेला विरोध केला तर महाराष्ट्रातील कानडी लोकांसाठी लागू केलेल्या योजना देखील रद्द केल्या जातील असा इशारा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे विशेष प्रतिनिधी मंगेश चिवटे यांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या आरोग्य योजनांना कर्नाटक प्रशासनासह कन्नड संघटनांनी विरोध …

Read More »

17 जानेवारी हुतात्मा दिवस गांभीर्याने पाळावा; युवा समितीच्या बैठकीत निर्णय

  बेळगाव : आज महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांची व्यापक बैठक अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. 17 जानेवारी हुतात्मा दिवस गांभीर्याने पाळावा व मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन युवा समितीच्या वतीने करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने सीमाभागातील नागरिकांना मुख्यमंत्री आरोग्य योजना व …

Read More »

१७ जानेवारी रोजी हुतात्मा दिनानिमित्त कडकडीत हरताळ पाळा

  बेळगाव : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रत्येक नागरिकाला राज्य कारभार कसा चालावा हे समजण्यासाठी भाषावार प्रांतरचना करण्याचा निर्णय घेण्यात आला व फाजल अली कमिशनची नियुक्ती करण्यात आली. त्या कमिशनने भाषावार प्रांतरचनेचा अहवाल दिनांक १६ जानेवारी १९५६ला जाहीर केला. त्या अहवालात बेळगांव, कारवार, सुपा, हल्याळ, खानापूर, निपाणी, बीदर, भालकी, संतपूर हा …

Read More »

ज्येष्ठ पत्रकार प्रशांत बर्डे यांचे निधन

  बेळगाव : पाचहून अधिक दशके बेळगावच्या पत्रकारिता क्षेत्रात कार्य करीत आपली वेगळी ओळख निर्माण केलेले ज्येष्ठ पत्रकार प्रशांत तुकाराम बर्डे यांचे रविवार दि. 14 जानेवारी रोजी नेहरू नगर येथील निवासस्थानी दुःखद निधन झाले. निधन समयी ते 70 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात एक भाऊ, सहा बहिणी, पुतणे आणि नातेवाईक असा …

Read More »

जय जय स्वामी समर्थ गजरात स्वामींच्या पालखी आणि पादुकांचे पुजन

  बेळगाव : अक्कलकोटहून निघालेल्या आणि काल बेळगावात आगमन झालेल्या स्वामी समर्थांच्या पालखीचे काल शनिवारी सायंकाळी महाद्वार रोड येथील श्री स्वामी समर्थ आराधना केंद्राच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.सवाद्य निघालेल्या पालखी मिरवणुकीत बसवाणी बँड, ढोल पथक, जुना भाजी मार्केट व ज्योती नगर कंग्राळी येथील भजनी मंडळे सहभागी झाली होती. संपूर्ण …

Read More »

वेदगंगा नदी पुलावर भराव करू नये

  शेतकरी बचाव कृती संघर्ष समिती; ज्योतिरादित्य सिंधिया यांना निवेदन निपाणी (वार्ता) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. यमगरणी जवळील वेदगंगा नदी पूल ते मांगूर फाटा पर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. यावेळी या परिसरात भराव घातला जाणार आहे. त्यामुळे परिसरासह महाराष्ट्रातील अनेक गावासह शेतींना पुराच्या पाण्याचा …

Read More »

क्रांतिवीर संगोळ्ळी रायाण्णा उत्सव ज्योतीचे निपाणीत स्वागत

  निपाणी (वार्ता) : कर्नाटक शासनातर्फे बुधवारी (ता. १७) होणाऱ्या क्रांतिवीर संगोळी रायाण्णा उत्सवानिमित्त उत्सवानिमीत्त मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाचा प्रसार करण्यासाठी बेळगांव जिल्ह्यातील १५ तालुक्यातून क्रांतीवीर संग्गोळी रायण्णा उत्सव ज्योतीचे स्वागत करण्यात येत आहे. शनिवारी (ता.१३) सकाळी येथे चिक्कोडी जिल्हा काँग्रेस …

Read More »

बेळगाव केसरी मॅटवरील कुस्ती स्पर्धांना उत्साहात प्रारंभ

  बेळगाव : मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना यांच्या वतीने प्रतिवर्षी जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित केले जात असते. यावर्षी शनिवार दिनांक 13 व आज रविवार दिनांक 14 जानेवारी रोजी प्रथमच गुणांवर आधारित मॅटवरील भव्य कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. काल सायंकाळी भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्या हस्ते फीत कापून तसेच …

Read More »