Sunday , July 26 2026
Breaking News

…तर कानडी लोकांसाठींच्या महाराष्ट्रातील योजना रद्द करू : मंगेश चिवटे

Spread the love

 

चंदगड : महाराष्ट्र सरकारने सीमा भागातील मराठी भाषिकांना लागू केलेल्या योजनेला विरोध केला तर महाराष्ट्रातील कानडी लोकांसाठी लागू केलेल्या योजना देखील रद्द केल्या जातील असा इशारा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे विशेष प्रतिनिधी मंगेश चिवटे यांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या आरोग्य योजनांना कर्नाटक प्रशासनासह कन्नड संघटनांनी विरोध चालवला आहे. त्यामुळे शनिवारी महाराष्ट्राच्या आरोग्य योजनांसाठी सुरू केलेल्या सेवा केंद्रांना कुलूप लावण्यात आले आहे. त्याला मराठी भाषिकांतून तीव्र विरोध होत आहे. तसेच माणुसकीच्या दृष्टिकोनातून कर्नाटक सरकारने आरोग्य योजनांना विरोध करू नये अशी मागणी वाढू लागली आहे.

बेळगाव शहर परिसरातील सेवा केंद्र बंद करण्याची सूचना करण्यात आल्यानंतर याबाबतची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे विशेष प्रतिनिधी मंगेश चिवटे यांनी काल रविवारी शहर आणि परिसरातील कार्यकर्त्यांची चंदगड येथे भेट घेतली. येणाऱ्या काळात महाराष्ट्र सरकारकडून कोणत्या प्रकारच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत याची माहिती त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिली.तसेच याबाबत महाराष्ट्रातील खासदार लवकरच आवाज उठवणार आहेत. त्यासंदर्भातील सूचना करण्यात आलेल्या आहेत. कर्नाटकाने आपल्या प्रशासनाला वेळी सूचना देऊन येणाऱ्या काळात वाद वाढू नये याची काळजी घ्यावी. अन्यथा महाराष्ट्र सरकार देखील आवश्यक त्या उपाययोजना करेल असेही चिवटे यांनी यावेळी स्पष्ट केले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *