बेळगाव : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचा पारितोषिक वितरणाचा समारंभ दिनांक 9/10/2024 रोजी मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या सभागृहात पार पडला. या समारंभाला सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर आणि सदा सरवणकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बेळगावची कन्या अनुष्का आपटे हिने “सं. लावणी भुलली अभंगाला” या भरत नाट्य संशोधन मंदिर, पुणे …
Read More »नोएल टाटा होणार रतन टाटा यांचे उत्तराधिकारी
मुंबई : रतन टाटा यांनी उत्तुंग उंचीवर नेऊन ठेवलेल्या टाटा ट्रस्टचा नवा उत्तराधिकारी अखेर निवडण्यात आला आहे. टाटा ट्रस्टच्या संचालकांच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत रतन टाटा यांचे सावत्र बंधू नोएल टाटा यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे आता नोएल टाटा हे टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष असतील. रतन टाटा हे 1991 …
Read More »उचगाव मराठी साहित्य संमेलन १२ जानेवारी रोजी
बेळगाव : उचगाव मराठी साहित्य अकादमी आयोजित २३ वे उचगाव मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी भरविण्याचा निर्णय अकादमीच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी अकादमीचे अध्यक्ष लक्ष्मणराव होनगेकर हे होते. यावर्षी दिग्गज अशा साहित्यिकांच्या उपस्थितीमध्ये हे संमेलन साजरे करण्यात येणार आहे. यावेळी बैठकीमध्ये इतर साधक, बाधक …
Read More »श्री दुर्गा माता दौडीतून नारीचा शक्तीचा संदेश!
बेळगाव : देव देश आणि धर्म जागृतीचा संदेश देत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे बेळगावात अखंड श्री दुर्गा मातादौडचे २६ वे वर्ष पार पडले. आज ९ व्या दिवशी श्री दुर्गा माता दौडीला बेळगाव शहरातील ताशिलदार गल्ली, श्री सोमनाथ मंदिर येथून श्री सिद्धिदात्रीच्या पूजेसह प्रदक्षिणा घालण्यात आली. श्री दुर्गामाता दौड …
Read More »कडोली साहित्य संमेलन ५ जानेवारीला
कडोली : येथील मराठी साहित्य संघातर्फे होणारे ४० वे कडोली मराठी साहित्य संमेलन रविवार दि. ५ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे. साहित्य संघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष भरमाणी डोंगरे होते. बैठकीत 40 व्या संमेलनाच्या आयोजनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. संमेलनातील विविध सत्रे, साहित्यिक, पाहूणे …
Read More »प्रवाशांना लुटणाऱ्या आरोपींना अटक : सात लाखाचे दागिने जप्त
बेळगांव : प्रवाशांना लुटून सोने पळविणाऱ्या आरोपींना अटक करण्यात मार्केट पोलिसांना यश आले आहे. मार्केट पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार रिजवान सिराज पठाण (वय ४०, विद्यानगर, एपीएमसी, बेळगाव), मलिकजान दस्तगीरसाब शेख (वय २६, मूळचा गोकाक सध्या राहणार एपीएमसी) आणि विनायक अरुण हिंडलगेकर (वय ३२, सध्या राहणार जुने गांधीनगर) …
Read More »रेणुकास्वामी हत्या प्रकरण : दर्शनच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण; १४ ला निकाल
बंगळूर : चित्रदुर्गातील रेणुकास्वामी खून प्रकरणात अटकेत असलेला अभिनेता दर्शनच्या जामीन अर्जावर न्यायालयाने गुरुवारी सुनावणी पूर्ण केली आणि १४ ऑक्टोबरपर्यंत निकाल राखून ठेवला. ५७ व्या सीसी न्यायालयाने दर्शनने दाखल केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी केली आणि आरोपीचे वकील सी. व्ही. नागेश आणि एसपीपी प्रसन्न कुमार यांचा प्रदीर्घ युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय …
Read More »कोविड घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना
मंत्रिमंडळाचा निर्णय; भाजप सरकारच्या काळातील गैरव्यवहार बंगळूर : भाजप सरकारच्या काळात झालेल्या कोविड घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील यांनी सांगितले. गुरुवारी विधानसौध येथे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बोलताना ते म्हणाले …
Read More »सिद्धरामय्या कोणत्याही क्षणी राजीनामा देऊ शकतात : विजयेंद्र
बेळगाव : सिद्धरामय्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील आणि याबाबतचे सत्य लवकरच समोर येईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र म्हणाले. बेळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना विजयेंद्र म्हणाले की, हरियाणातील जनतेने मोदींच्या हमीभावावर विश्वास ठेवून काँग्रेसला नाकारले आहे. हा विजय महाराष्ट्राच्या निवडणुकीतही भाजपचा वरचष्मा ठरेल, असा विश्वास विजयेंद्र यांनी व्यक्त केला. जम्मूमध्ये भाजपचा …
Read More »देशाचे अनमोल ‘रतन’ अनंतात विलीन
मुंबई : उद्योगपती रतन टाटा पंचत्वात विलीन झाले आहेत. वरळी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. त्यामुळे अमित शाह वरळी येथील स्मशानभूमीत रतन टाटा यांच्या अंत्यविधीसाठी आले. यावेळी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta